



चिपळूण : गणेशोत्सव २०२५ दरम्यान वाढलेल्या प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने खास निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी चिपळूण–पनवेल–चिपळूण दरम्यान अतिरिक्त अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
गाड्यांचा तपशील :
गाडी क्रमांक ०११६० चिपळूण–पनवेल मेमू विशेष
दिनांक : ५, ६ व ७ सप्टेंबर २०२५
प्रस्थान : चिपळूण येथून सकाळी ११:०५ वाजता
आगमन : पनवेल येथे दुपारी ४:१० वाजता
गाडी क्रमांक ०११५९ पनवेल–चिपळूण मेमू विशेष
दिनांक : ५, ६ व ७ सप्टेंबर २०२५
प्रस्थान : पनवेल येथून संध्याकाळी ४:४० वाजता
आगमन : चिपळूण येथे रात्री ९:५५ वाजता
गाड्यांना अंजनी, खेर्डी, दिवाणखवटी, विंहेरे, करंजडी, वेअर, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, पेण, आपटा अशा महत्वाच्या स्थानकांवर थांबे असतील.
या गाड्यांची रचना ८ मेमू कोचेसची असून सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.