पुणे, १८ ऑगस्ट : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांच्या प्रवासाची सोय लक्षात घेऊन फ्लाय९१ (FLY91) या विमानसेवेने पुणे–सिंधुदुर्ग–पुणे मार्गावरील उड्डाणांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेश चतुर्थीच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी फ्लाय९१ने विशेष उड्डाणांची घोषणा केली आहे. २४ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट तसेच ५ व ७ सप्टेंबर २०२५ या दिवशी अतिरिक्त उड्डाणे सुरू राहतील.
या विशेष उड्डाणांची तिकिटे फ्लाय९१च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रवाशांनी लवकरात लवकर आरक्षण करून घ्यावे, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.
“गणेशोत्सव हा आमच्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाचा काळ आहे. अनेक जण आपल्या कुटुंबासह कोकणात प्रवास करतात. पुणे–सिंधुदुर्ग मार्गावरील उड्डाणांची संख्या वाढवल्याने प्रवाशांना अधिक सोयी, लवचिकता आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे.” फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको म्हणाले,
यामुळे पुण्यातील कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवास आणखी सुलभ व सुखकर होणार आहे.
👆🏻आपला स्पॉट आजच बुक करा आणि उत्तम प्रतिसाद मिळवा