



मुंबई, दि. १९ ऑगस्ट २०२५ – मुंबई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पाणी साचल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासावर परिणाम झाला आहे. कोकण रेल्वेने जारी केलेल्या माहितीनुसार अनेक गाड्या उशिराने सुटणार असून काही गाड्यांचे गंतव्यस्थानही बदलण्यात आले आहे.
गाड्यांचे वेळापत्रक बदल
गाडी क्रमांक १२६१९ लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस ही गाडी दुपारी ३:१० वाजता सुटण्याऐवजी संध्याकाळी ५:०० वाजता सुटेल.
गाडी क्रमांक २२११३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्सप्रेस ही गाडी दुपारी ४:४५ वाजता सुटण्याऐवजी संध्याकाळी ६:०० वाजता सुटेल.
गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन
गाडी क्रमांक १०१०४ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस ही गाडी मुंबईपर्यंत न येता पनवेल येथेच थांबवली जाणार आहे.
आरंभ स्थानकात बदल
गाडी क्रमांक २०१११ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी आज मुंबईऐवजी पनवेल स्थानकातून सुटणार आहे.
यामुळे प्रवाशांना गैरसोय होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले असून प्रवाशांनी वेळापत्रकातील बदल लक्षात घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.