



मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. गट-ब आणि गट-क मधील एकूण १७९ रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून, या पदांसाठी मिळणारे वेतन आकर्षक आहे. काही पदांसाठी वेतन ₹१,४२,४००/- पर्यंत आहे.
पदांचा आणि वेतनाचा तपशील:
गट-ब (अराजपत्रित):
विधी सहायक: वेतनश्रेणी ₹३८,६०० ते ₹१,२२,८०० (S-13)
लघुलेखक-उच्च श्रेणी: वेतनश्रेणी ₹४४,९०० ते ₹१,४२,४०० (S-16)
लघुलेखक-कनिष्ठ श्रेणी: वेतनश्रेणी ₹४१,८०० ते ₹१,३२,३०० (S-14)
गट-क:
निरीक्षक: वेतनश्रेणी ₹३५,४०० ते ₹१,१२,४०० (S-13)
वरिष्ठ लिपिक: वेतनश्रेणी ₹२५,५०० ते ₹८१,१०० (S-8)
महत्वाच्या तारखा:
अर्ज सुरू होण्याची तारीख: ११ सप्टेंबर २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०३ ऑक्टोबर २०२५ (रात्री ११:५५ वाजेपर्यंत)
परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२५ दरम्यान
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:
प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा भिन्न आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आहे, तर आरक्षित प्रवर्गासाठी ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया:
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://charity.maharashtra.gov.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा.
ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि परीक्षा शुल्क जमा करणे अनिवार्य आहे.
खुला प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क ₹१०००/- आणि मागासवर्गीय/अनाथ उमेदवारांसाठी ₹९००/- आहे.
या भरतीसाठी अधिक माहिती व सविस्तर जाहिरात धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.