



मुंबई, दि. ८ ऑक्टोबर : मुंबईवरून मडगावकडे जाणाऱ्या १२०५१ जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांमध्ये आज तीव्र संतापाची लाट उसळली. प्रवाशांकडे कन्फर्म तिकीटे असलेला DL-1 डबा गाडीला लावण्यातच आलेला नव्हता.
या अनपेक्षित घटनेमुळे गाडीत गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांना जागा न मिळाल्याने प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला. परिस्थिती हाताळताना रेल्वेतील टीसी आणि कर्मचारी देखील अडचणीत सापडले.
टीसींनी प्रवाशांना या प्रकरणाची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे नोंदविण्याचा सल्ला दिला असून, प्रवाशांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रवाशांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली असून, हा प्रकार रेल्वेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे