ठाणे: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची हक्काची गाडी असलेल्या ‘दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस’च्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने एक बदल केला आहे. रेल्वे गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी आणि वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नव्या वेळापत्रकानुसार या गाडीची वेळ आता ‘प्रीपोन’ म्हणजेच नियमित वेळेच्या काही मिनिटे आधी करण्यात आली आहे. हे सुधारित बदल १० जानेवारी २०२६ ऐवजी १२ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.
नव्या बदलांनुसार, ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस आता दिवा स्थानकावरून पूर्वीच्या वेळेपेक्षा साधारण १० ते १५ मिनिटे लवकर सुटेल. रोहा स्थानकावर ही गाडी सध्या सकाळी ०९:०० वाजता पोहोचत होती, ती आता सकाळी ०८:५० वाजता पोहोचेल आणि ०८:५५ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. याचप्रमाणे परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, ही गाडी रोहा स्थानकावर संध्याकाळी ५:२० ऐवजी ५:०५ वाजता पोहोचेल.
![]()


