रुपेश मनोहर कदम/ सायले: संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधांचा कायम पाठपुरावा करणाऱ्या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुप च्या सदस्यांनी आज दि. ७ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी येथील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मा. श्री. शैलेश बापट यांची भेट निवेदन सादर केले. संगमेश्वर तालुक्यातील १९६ गावातील रेल्वे प्रवाशांच्या होळी उत्सवातील सुखकर प्रवासाचा विचार करून हे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी चर्चा करताना संगमेश्वर स्थानकात प्रवाशांची वाढती संख्या ध्यानात घेऊन, उत्पन्न वाढी सोबत सुखकर प्रवास आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावर नाण्याची दुसरी बाजू म्हणजे फुकट्या प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनाचा रेल्वेला बसणारा फटका, त्यामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल यादृष्टीने उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या चर्चेत ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, रुपेश मनोहर कदम, अशोक मुंडेकर हे सहभागी झाले होते.कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळाला तर दररोज हजारोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या तालुक्यातील रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास नक्कीच सुखकर होणार!


