दि. २७ फेब्रुवारी २०२६: कोकण रेल्वे प्रशासनाने चिपळूण – दिवा – चिपळूण मार्गावरील मेमू अनारक्षित विशेष गाडी क्रमांक ०११६० / ०११५९ च्या धावण्याच्या प्रारंभ तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०११६० ही चिपळूण येथून पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ०१ मार्च २०२६ पासून धावणार होती; मात्र सुधारित नियोजनानुसार ती आता ०२ मार्च २०२६ ते ०८ मार्च २०२६ या कालावधीत धावेल. त्यानुसार दिवा येथून सुटणारी गाडी क्रमांक ०११५९ च्याही सेवेत तदनुरूप बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी सुधारित तारखांची नोंद घेऊन आपला प्रवास नियोजित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
होळी २०२६ निमित्त पनवेलहुन कोकणात जाणाऱ्या अजून एका होळी विशेष गाडीची घोषणा
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने Indian Railways प्रशासनामार्फत मडगाव जं.–पनवेल–मडगाव जं. दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक 01106 / 01105 मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. साप्ताहिक विशेष
गाडी क्रमांक 01106 मडगाव जं.–पनवेल विशेष ही गाडी दि. 04 मार्च 2026 (बुधवार) रोजी मडगाव जंक्शन येथून सायं. 16:30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे 04:00 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01105 पनवेल–मडगाव जं. विशेष ही गाडी दि. 05 मार्च 2026 (गुरुवार) रोजी पनवेल येथून सकाळी 05:45 वाजता सुटेल व त्याच दिवशी सायं. 18:10 वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.
थांबे खालीलप्रमाणे असतील :
करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेन.
रचना (Composition) :
एकूण 20 डबे – 18 स्लीपर कोच व 2 एसएलआर डबे.
गाडी क्रमांक 01106 साठी आरक्षण दि. 28/02/2026 पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट तसेच IRCTCच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी व सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी प्रवाशांनी Indian Railwaysच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
होळीच्या सणासाठी कोकण व मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाडीचा मोठा दिलासा मिळणार आहे.


