मुंबई: प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची सोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (Central Railway) मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर-मडगाव, दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर धावणाऱ्या सहा विशेष गाड्यांच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ १ मार्च २०२६ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लागू असेल.
विशेष म्हणजे, या गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये झाली वाढ:
नागपूर – मडगाव विशेष (०११३९): ही गाडी आता दर बुधवार आणि शनिवारी धावेल.
मडगाव – नागपूर विशेष (०११४०): ही गाडी आता दर गुरुवार आणि रविवारी धावेल.
दादर – गोरखपूर विशेष (०१०२७): ही गाडी आठवड्यातून चार दिवस म्हणजे दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावेल.
गोरखपूर – दादर विशेष (०१०२८): ही गाडी दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावेल.
दादर – बलिया विशेष (०१०२५): ही गाडी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल.
बलिया – दादर विशेष (०१०२६): ही गाडी दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावेल.
प्रवाशांसाठी सूचना:
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांनी सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांच्या माहितीसाठी enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES (National Train Enquiry System) अॅपचा वापर करावा. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्ट्या किंवा इतर सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


