मुंबई: मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर आज, १७ मार्च २०२६ रोजी सकाळी एक थरारक घटना घडली. CSMT हून कल्याणच्या दिशेने जाणारी ९५७११ क्रमांकाची जलद एसी लोकल भांडुप स्थानकात निर्धारित वेळेत पोहोचली खरी, मात्र प्लॅटफॉर्मवर थांबण्याऐवजी ती वेगाने पुढे निघून गेली. स्थानकात प्रवेश करताना गाडीचा वेग अधिक होता आणि मोटरमनने ब्रेक लावूनही गाडीचे अनेक डबे प्लॅटफॉर्मच्या पलीकडे ओव्हरशूट झाले. या अनपेक्षित प्रकारामुळे गाडीतील प्रवाशांमध्ये प्रचंड भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद झालेली नाही.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या ओव्हरशूटच्या घटनेमुळे ट्रेनला सुमारे ६ मिनिटांचा उशीर झाला. दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवाशांची ने-आण करणाऱ्या मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत, विशेषतः ब्रेकिंग आणि स्पीड कंट्रोलच्या तांत्रिक बाबींवर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, भविष्यात अशा धोकादायक घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
बंद दरवाजे असल्याने अनर्थ टळला.
सुदैवाने ही एसी लोकल असल्याने तिचे दरवाजे बंद होते, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला; अन्यथा वेगातील गाडीतून प्रवासी खाली पडण्याची भीती होती.
Moving faster than the timetable!!!
A Kalyan-bound fast AC local train overshot Bhandup station going ahead by a few coaches on Tuesday morning. “The 9:29am Kalyan local from Bhandup entered the platform at a high speed and missed the platform despite rigorous braking, but by… pic.twitter.com/cVstRMLqPg
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) March 17, 2026


