मडगाव: आठवडा अखेरीस होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने मडगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे खालीलप्रमाणे आहेत:
गाडी क्र. ०१००४ / ०१००३ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष
गाडी क्र. ०१००४ (मडगाव – LTT): ही गाडी २२ मार्च २०२६ (रविवार) रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
गाडी क्र. ०१००३ (LTT – मडगाव): ही गाडी २३ मार्च २०२६ (सोमवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल
थांबे: मडगाव जंक्शन, करमळी, थिविम, सावंतवाडी टर्मिनस, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस.
डब्यांची रचना: एकूण २० डबे (१८ स्लीपर क्लास आणि २ एसएलआर).
आरक्षण: गाडी क्र. ०१००४ साठीचे आरक्षण १९ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर (PRS), इंटरनेट आणि IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू होईल.
कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


