Author Archives: Kokanai Digital
सांगली : विद्यमान सरकाराच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेवरची विघ्ने संपताना दिसत नाही. या महामार्गा विरोधात सांगली सोलापूर, कोल्हापूर या तीनच जिल्ह्यातून १ हजार ३११ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. शक्तीपीठाला समांतर महामार्ग उपलब्ध असताना पिकाउ जमिनीतून महामार्गाचा प्रकल्प राबविण्यास एकसंघपणे विरोध करण्याचा निर्णय सांगली येथील कवलापूर येथे शेतकर्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या महामार्गाची कोणीही मागणी केली नव्हती. सध्या नागपूर रत्नागिरी हा महामार्ग नियोजित प्रकल्पाला समांतर असताना पुन्हा हा नव्याने महामार्ग प्रस्तावित करण्याचे काहीच कारण नाही. माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत, मारण्यासाठी नाहीत. या मार्गाने शेतकर्यांसह अनेक समाजघटक देशोधडीला लागणार आहेत. केवळ मूठभर लोकांचे हित त्यामागे लपले आहे. संघर्ष समितीने महामार्गबाधित शेतकर्यांच्या २२ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्या, तरच शेतकरी संमती देतील. हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे. शेतकर्यांची एकजुटच शासनाला नमवेल. महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. असे यावेळी या बैठकीचे निमंत्रक दिगंबर कांबळे म्हणालेत
प्रस्तावित महामार्गाबाबत सांगलीतून ६११, कोल्हापूरमधून ४५० आणि सोलापूरमधून २५० अशा १ हजार ३११ हरकती शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. या हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.




मुंबई दि. २९:कोकण रेल्वे मार्गावर चालू करण्यात आलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीही दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे. त्यामुळे या गाडीचे डबे वाढविण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीतर्फे करण्यात आली आहे.
मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा सध्या चालविण्यात येणारा रेक आठ डब्यांचा आहे. देशात सुरु करण्यात आलेल्या यशस्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये तिची गणना केली जात आहे. ही गाडी सातत्याने सुमारे ९५% क्षमतेने Occupancy धावत आहे. या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीच या गाडीला असलेली लोकप्रियता दाखवून देत आहे. तथापि, मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रवासांचा हिरमोड होत आहे.
या मार्गावरील प्रवासाची उच्च मागणी लक्षात घेता, या समस्येवर त्वरित लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे, आम्ही रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला विनंती करू इच्छितो की, मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची 16 डब्यांची रेक तैनात करून डब्यांची क्षमता वाढविण्याचा विचार करावा.
अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी ट्रेनची क्षमता वाढवल्याने सध्याची सीटची कमतरता तर दूर होईलच पण एकूण प्रवासाचा अनुभवही वाढेल. शिवाय, ते मुंबई आणि गोवा दरम्यान कार्यक्षम आणि आरामदायी वाहतूक पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करता येईल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की या प्रस्तावाचा अनुकूलपणे विचार करा आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचला. आगामी उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन हा बदल करण्यात यावा अशी मागणी कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेलद्वारे रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला केली आहे.
Loksabha Election 2024:लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. 22 जागा मिळाव्यात यासाठी शिंदे गट आग्रही होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना 12 ते 13 जागांवरच समाधान मानावं लागू शकतं. अशातच पहिल्या यादीत शिंदे गटाने केवळ आठच उमेदवार जाहीर केले आहे.
जाहीर केलेले उमेदवार
मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
कोल्हापूर – संजय मंडलिक
शिर्डी – सदाशिव लोखंडे
बुलढाणा – प्रतापराव जाधव
हिंगोली – हेमंत पाटील
रामटेक – राजू पारवे
हातकणंगले – धैर्यशील माने
मावळ – श्रीरंग आप्पा बारणे
हे आठ उमेदवार शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आहेत.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी#Shivsena#LokasabhaElection2024#marathiNews #मराठीबातम्या #MaharashtraNews #बातम्या pic.twitter.com/pKBFCAQtww
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) March 28, 2024
PRS Downtime : रेल्वेच्या संकेतस्थळावरून आज रेल्वे प्रवासासाठी तिकिट आरक्षित करण्याचा तुमचा बेत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज रात्री रेल्वेची पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (Railway PRS system) पाच तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
भारतीय रेल्वे आता आपल्या टिकिट सिस्टिम आणि ट्रेन क्रमांक अपग्रेड करण्यासाठी तांत्रिक बदल करणार आहे. त्यासाठी तिकिट आरक्षण यंत्रणा आज रात्री ठीक ११:४५ ते उद्या पहाटे ०४:४५ वाजेपर्यंत बंद असणार आहे. या मध्य रेल्वे, पाश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे आणि पाश्चि मध्य रेल्वेचे प्रवासी तिकीट आरक्षण, टिकिट रद्द करणे, रेल्वेबाबतची चौकशी आदी सेवाही बंद असणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने या बाबतची माहिती ट्विटर X वर पोस्ट केली आहे.
DOWNTIME OF PASSENGER RESERVATION SYSTEM (PRS)
for PNR compression from 23.45 hrs of 28.3.2024 to 4.45 hrs on 29.3.2024 over Central Railway, Western Railway, Konkan Railway & West Central Railway.During this time, Internet Booking of Tickets for Trains, Refund, Touch Screen,… pic.twitter.com/xikh5IoEAo
— Central Railway (@Central_Railway) March 28, 2024
ठाणे, दि. २८: ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट रुंदीकरणाच्या कामामुळे येथून जाणार्या काही गाड्यांचे सध्या असलेले फलाट Platform बदलण्यात आले आहेत. फलाट क्रमांक पाचवर येणार्या गाड्या सात नंबर फलाटावर वळविण्यात आल्या आहेत.
या गाड्यांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेस (10103)ठाणे स्थानकातून आज दिनांक 28 मार्च 2024 पासून 06 एप्रिल 2024 पर्यत फलाट क्रमांक(05) पाच ऐवजी सात (07)वरून सोडण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघ (रजि.) तर्फे देण्यात आली आहे. ठाण्यातील प्रवाशांनी या बदलाची दखल घेऊन आपला त्रास टाळावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.