Author Archives: Kokanai Digital

लोकलमधून उतरता न आल्याने चाकूहल्ला; ३ प्रवासी जखमी

   Follow us on        

Mumbai Local: गर्दीमुळे लोकलमधून डोंबिवली स्थानकात उतरता न आल्याने संतापलेल्या एका प्रवाशाने दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. इतर प्रवाशांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

बुधवारी सकाळी कल्याणकडून दादरकडे जाणाऱ्या जलद लोकलमधून शेख जिया हुसेन (१९) प्रवास करीत होता. डोंबिवली स्थानकात पोहोचण्यापूर्वी आपण जलद लोकलमध्ये असल्याने ती मुंब्रा स्थानकात थांबणार नसल्याचे त्याच्यालक्षात आले. त्यामुळे तो डोंबिवली स्थानकात उतरण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, एका प्रवाशाला धक्का लागून वाद सुरू झाला. त्यातच धक्काबुक्की होऊन हुसेनला काही प्रवाशांनी मारहाण केली. त्यावर संतापलेल्या हुसेनने खिशातील चाकू काढत प्रवाशांवर हल्ला केला. यामध्ये अक्षय वाघ, हेमंत कांकरिया, राजेश चांगलानी जखमी झाले. यानंतर काही प्रवाशांनी हुसेनला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

२१ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 12:00:33 पर्यंत
  • नक्षत्र-अनुराधा – 15:54:34 पर्यंत
  • करण-कौलव – 12:00:33 पर्यंत, तैतुल – 24:46:38 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-व्याघात – 11:58:00 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:05
  • सूर्यास्त- 18:39
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 26:08:59
  • चंद्रास्त- 12:16:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1804: पहिले सेल्फ-प्रोपेलिंग स्टीम लोकोमोटिव्ह – पहिले वाफेवर चालणारे इंजिन सुरु झाले.
  • 1842: जॉन ग्रिनो यांना शिलाई मशीनसाठी पहिले अमेरिकन पेटंट देण्यात आले.
  • 1878: कनेक्टिकटमधील न्यू हेवन येथे पहिली टेलिफोन डायरेक्टरी जारी करण्यात आली.
  • 1925: द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1972: सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना 20 हे चंद्रावर उतरले.
  • 1999: हा दिवस अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जाहीर केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1788: ‘फ्रान्सिस रोनाल्ड्स’ – ब्रिटीश शास्त्रज्ञ, पहिले कार्यरत इलेक्ट्रिक टेलीग्राफ बनवणारे अभियंते यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑगस्ट 1873)
  • 1894: ‘डॉ. शांतिस्वरुप भटनागर’ – वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जानेवारी 1955)
  • 1899: ‘सूर्यकांत त्रिपाठी निराला’ – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 15 ऑक्टोबर 1961)
  • 1911: ‘भबतोष दत्ता’ – अर्थतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 जानेवारी 1997)
  • 1942: ‘जयश्री गडकर’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑगस्ट 2008)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1829: ‘चन्नम्मा’ – कित्तूरची राणी यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1778)
  • 1975: ‘गजानन हरी नेने’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 18 सप्टेंबर 1912)
  • 1977: ‘रा. श्री. जोग’ – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत यांचे निधन. (जन्म: 15 मे 1903)
  • 1991: ‘नूतन बहल’ – चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 4 जून 1936)
  • 1998: ‘ओमप्रकाश बक्षी’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म: 19 डिसेंबर 1919)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादर पर्यंत नेण्यासाठी दिवा – दादर मार्गाची पाहणी करणार – मध्य रेल्वेकडून आश्वासन

   Follow us on        

मुंबई : दादर – रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादर येथूनच सोडावी तसेच दादर – सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याच्या या मागण्यांसाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (उबाठा) , रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांना दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादर वरून पुन्हा सुरू करण्यासाठी दादर दिवा मार्गाचे तीन दिवसात पाहणी करण्याचे आश्वासन देण्यात आले.

यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या प्रशासनाने संपूर्ण नकारघंटा वाजवलेली होती. परंतु आजच्या बैठकीमध्ये रेल्वे कामगार सेनेचे श्री. संजय जोशी, श्री बाबी देव यांनी दादर वरून गाडी कशी सोडता येईल आणि या गाडीमुळे इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, हे अभ्यासाअंती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री.मीना व उपस्थित सर्व अधिकारी यांच्यासमोर मांडले. शेवटी श्री. मीना यांनी श्री. संजय जोशी आणि श्री. बाबी देव यांनी सुचविलेल्या पर्यायाबाबत त्यांच्याबरोबर दादर ते दिवा पर्यंतच्या मार्गाची पाहणी येत्या तीन दिवसात करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.

शिष्टमंडळामध्ये खासदार – शिवसेना नेते श्री अरविंद सावंत, शिवसेना नेते माजी खासदार श्री. विनायक राऊत, श्री अरुणभाई दुधवडकर, आमदार श्री महेश सावंत, श्री.संतोष शिंदे, श्री. बाबी देव, श्री.संजय जोशी तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मोठी बातमी! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता उद्यापासून येणार;अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता

   Follow us on        

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून (Finance Department) 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता

डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, ती साधारणपणे 4 लाख असेल अशी माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. या कपातीमुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे.

नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे. वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.

 

कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी २ विशेष गाड्यांची घोषणा; आरक्षण या तारखेपासून सुरु

   Follow us on        
Konakn Railway:यंदा होळी सण साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणकरांसाठी  एक खुशखबर आहे. होळी सणा  दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने काही विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे
१) गाडी क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी- मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी विशेष:
गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. विशेष ही गाडी  गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी मुंबई सीएसएमटी येथून ००:२०  वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १३:३० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. .
गाडी क्र. ०११५२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी स्पेशल ही गाडी  गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी मडगाव जंक्शन येथून १४:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
ही गाडी गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची संरचना: एकूण २४ कोच : फर्स्ट एसी – ०१  कोच, कंपोझिट (फर्स्ट एसी + टू टायर एसी) – ०१  कोच, टू टायर एसी – ०२  कोच, थ्री टायर एसी – १० कोच, स्लीपर – ०४  कोच, जनरल – ०४  कोच, एसएलआर ०२
२) गाडी क्र. ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी)  – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी)  विशेष:
गाडी क्र. ०११२९  लोकमान्य टिळक (टी)- मडगाव जं. ही विशेष गाडी गुरुवार दिनांक १३/०३/२०२५ आणि २०/०३/२०२५ रोजी २२:१५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून विशेष सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12:45 वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्र. ०११३० मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) विशेष ही गाडी  शुक्रवार दिनांक १४/०३/२०२५ आणि २१/०३/२०२५ रोजी १३:४० वाजता मडगाव जंक्शन येथून  सुटेल आणि  दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ०४:०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकावर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ .
गाडी क्रमांक ०११५२ आणि ०११३० या गाड्यांचे आरक्षण दिनांक २४/०२/२०२५  रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली  आहे.

वैभववाडी: केळीच्या खोडा आणि पानांपासून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

   Follow us on        

वैभववाडी: वैभववाडी रेल्वे स्थानक येथे वैभववाडी रेल्वे कर्मचारीवृंद तर्फे काल सालाबादाप्रमाणे सत्यनारायण पूजा आणि शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात सर्वात मोठे आकर्षण ठरले ते सत्यनारायण पूजेच्या मखरासाठी केळीच्या खोडा आणि पानांपासून पूजेच्या मखरासाठी बनविण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा.

सावंतवाडीच्या निरवडे कोनापाल या गावातील आनंद यशवंत मेस्त्री या तरुणाने कल्पकतेने ही प्रतिमा साकारली होती. यापूर्वी त्याने अनेक ठिकाणी नावीन्यपूर्ण आणि आकर्षक मखर बनवले आहेत. त्याने श्री देव विठ्ठल, कोल्हापूरची महालक्ष्मी तसेच ईतर बर्‍याच कलाकृतींचे मखर बनवले आहेत आणि प्रशंसाही मिळवली आहे. एक छंद म्हणुन त्याने ही कला जोपासली आहे.

या उत्सवा दरम्यान दिवसभरात सत्यनारायण महापूजा, हळदीकुंकू आणि भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री ९ वाजता रेंबो फ्रेंड सर्कल, कवठणी प्रस्तुत “गावय” या दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती वैभववाडी रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी नारायण नाईक यांनी दिली.

 

 

 

२० फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 10:01:16 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 13:30:55 पर्यंत
  • करण-भाव – 10:01:16 पर्यंत, बालव – 23:05:00 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-घ्रुव – 11:32:47 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:06
  • सूर्यास्त- 18:39
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 25:12:59
  • चंद्रास्त- 11:33:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • सामाजिक न्याय दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1792: अमेरिकेत पोस्टल सर्व्हिस सुरू झाली.
  • 1935: कॅरोलिन मिकेलसेन – डॅनिश-नॉर्वेजियन एक्सप्लोरर, अंटार्क्टिकामध्ये पाऊल ठेवणारी पहिली महिला बनली.
  • 1962: जॉन ग्लेन – अमेरिकन मरीन कॉर्प्स एव्हिएटर, अंतराळवीर, पृथ्वीभोवती फिरणारे पहिले अमेरिकन बनले, त्यांनी चार तास, 55 मिनिटांत तीन कक्षा पूर्ण केल्या.
  • 1978: शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी पुरस्कार लिओनिड ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.
  • 1986: मीर अंतराळयान – सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केले.
  • 1987: मिझोराम हे भारताचे 23 वे राज्य बनले.
  • 2014: तेलंगणा हे भारताचे 29 वे राज्य बनले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1901: ‘मिसर मुहम्मद नागुईब’ – इजिप्त चे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑगस्ट 1984)
  • 1904: ‘अलेक्सी कोसिजीन’ – रशियाचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 18 डिसेंबर 1980)
  • 1923: ‘फोर्ब्स बर्नहॅम’ – गयानीज वकील आणि राजकारणी, गयाना देशाचे 2रे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 1985)
  • 1951: ‘गॉर्डन ब्राऊन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1962: ‘अतुल चिटणीस’ – भारतीय-जर्मन तंत्रज्ञ आणि पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 3 जून 2013)
  • 1920: ‘कार्ल अल्ब्रेक्ट’ – जर्मन व्यापारी, अल्दी सुपरमार्केट कंपनीचे सह-स्थापना यांचा जन्म. (मृत्यू : 16 जुलै 2014)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1950: ‘बॅ. शरदचंद्र बोस’ – स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे बंधू यांचे निधन.(जन्म: 6 सप्टेंबर 1889)
  • 1974: ‘के. नारायण काळे’ – नाट्यसमीक्षक यांचे निधन.
  • 1997: ‘श्री. ग. माजगावकर’ – पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक यांचे निधन.
  • 2001: ‘इंद्रजित गुप्ता’ – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1919)
  • 2012: ‘डॉ. रत्‍नाकर मंचरकर’ – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1943)
  • 2015: ‘गोविंद पानसरे’ – भारतीय लेखक आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 26 नोव्हेंबर 1933)
  • 2023: ‘एस. के. भगवान’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक – यांचे निधन. (जन्म: 5 जुलै 1933)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

“… तर विशेष गाड्यांतून प्रवास करणे परवडेल.” कोकण विकास समितीने रेल्वेकडे केली ‘ही’ मागणी…

   Follow us on        
Konkan Railway: हंगामाच्या आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने रेल्वे प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात काही विशेष गाड्या चालवून प्रवाशांना दिलासा देते. कोकण रेल्वे मार्गावर गणेश चतुर्थी, होळी, उन्हाळी सुट्टी तसेच ईतर हंगामाच्या कालावधीत विशेष गाड्या चालविण्यात येतात. या गाड्यांचा तिकीटदर नियमित गाड्यांच्या तिकीट दरापेक्षा जास्त असतो. काही स्थानकांदरम्यान हा दर दुपटी पेक्षा जास्त असतो. कोकण विकास समितीने याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविताना प्रवाशांना परवडेल अशा प्रकारे त्यांचे नियोजन करावे अशी विनंती केली आहे.
विशेष गाड्यांसाठी  २०१५ साली जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार नुसार या गाडय़ांचे तिकीटदर आकारले जातात.या नियमावली नुसार विशेष गाड्यांना तिकीटदरा व्यतिरिक्त  सेकंड क्लास श्रेणी साठी १०% तर ईतर श्रेणी करिता ३०% अतिरिक्त दर आकारले जातात.
अतिरिक्त तिकीट दर आकारणीची किमान आणि कमाल मर्यादा खालील टेबल नुसार आहे.
तसेच या विशेष गाड्यांच्या  तिकीटदरांसाठी किमान प्रवास अंतर ठरविण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे
या नियमावलीनुसार मुंबई ते माणगाव किंवा खेड प्रवास करणाऱ्या प्रवाशाला स्लीपर श्रेणी च्या डब्यातून प्रवास करण्यासाठी 500 किलोमीटर प्रवासाचे पैसे द्यावे लागत आहेत. कारण नियमावली नुसार स्लीपर श्रेणीच्या तिकीटदरांसाठी  किमान प्रवास अंतर ५०० किलोमीटर आहे. म्हणजे तुम्ही १०० किलोमीटर प्रवासाचे आरक्षण करायला गेलात तरी तुम्हाला ५०० किलोमीटरप्रमाणे तिकीट दर द्यावाच लागणार आहे. या कारणाने कमी अंतराच्या प्रवासासाठी विशेष गाड्यांचा तिकिटदर दुपटी पेक्षा जास्त वाढतो.
CSMT to KHED Fare for Regular Train Fare for Special Train
Sleeper (SL) ₹ 190 ₹ 385
Three Tier AC (3A)
₹ 505 ₹ 1,050
Two Tier AC (2A) ₹ 710 ₹ 1,440
मात्र सेकंड सीटिंग (2S) आणि एसी चेअर कार (CC) या साठी किमान अंतर अनुक्रमे 100 आणि 250 एवढे आहे. त्यामुळे कमी अंतरासाठी विशेष गाड्यांचा तिकीटदरांत नियमित गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये मोठा फरक नसतो. त्यामुळे मुंबई ते खेड, चिपळूण, रत्नागिरीसाठी स्लीपर क्लास आणि त्यावरील श्रेणीच्या गाड्या न चालविता सेकंड सीटिंग (2S) आणि एसी चेअर कार (CC) या श्रेणीचे डबे असलेल्या गाड्या चालविण्यात याव्यात अशी विनंती कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी समितीच्या वतीने ईमेल द्वारे रेल्वे प्रशासनला केले आहे.

सावंतवाडीहून गोव्याला जाणारी रुग्णवाहिका पेटली

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबोळी येथे रुग्णाला घेऊन जाणार्‍या 108 रुग्णवाहिकेने अचानक वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी रात्री 1 वा.च्या सुमारास कोलवाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. सुदैवाने रुग्णाला तात्काळ बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला.

गाडीत पुढे बसलेल्या डॉक्टरांना गाडीतून धूर येताना दिसला. त्यामुळे रुग्णांसह सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यानंतर म्हापसा येथील अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. रुग्णांना अन्य एका रुग्णवाहिकेने उपचारासाठी बांबोळीकडे नेण्यात आले. संबंधित रुग्णवाहिका ही दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या वेंगुर्ला -वजराठ येथील एका रुग्णाला लघवीचा त्रास जाणवत असल्यामुळे ती मागविण्यात आली होती. मात्र, तो रुग्ण स्टेबल असल्यामुळे घटना घडल्यानंतर चालत बाहेर आला. नेमकी कशामुळे रुग्णवाहिकेने पेट घेतला हे समजू शकलेले नाही.

 

१९ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 07:35:29 पर्यंत
  • नक्षत्र-स्वाति – 10:40:35 पर्यंत
  • करण-वणिज – 07:35:29 पर्यंत, विष्टि – 20:50:53 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वृद्वि – 10:47:20 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:07
  • सूर्यास्त- 18:39
  • चन्द्र-राशि-तुळ – 30:50:22 पर्यंत
  • चंद्रोदय- 24:18:59
  • चंद्रास्त- 10:52:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • रस्सीखेच दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1819: ब्रिटिश संशोधक विल्यम स्मिथ यांनी दक्षिण शेटलँड बेटे शोधून काढली.
  • 1878: थॉमस एडिसनने फोनोग्राफचे पेटंट घेतले.
  • 1913: पेड्रो लास्कुरेन – 45 मिनिटांसाठी मेक्सिकोचे अध्यक्ष बनले; कोणत्याही देशाच्या राष्ट्रपती म्हणून कोणत्याही व्यक्तीचा हा सर्वात कमी कालावधीचा कार्यकाळ आहे 1726: रशिया मध्ये सर्वोच्च प्रिव्ही कौन्सिलची स्थापना झाली.
  • 1942: पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी जपानी-अमेरिकन लोकांना बंदिवासात करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली.
  • 1960: चीनने आपले पहिले संशोधन रॉकेट, टी-7 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
  • 1985: विल्यम जे. श्रोडर हे रुग्णालयातून बाहेर पडणारे कृत्रिम हृदयाचे पहिले प्राप्तकर्ता बनले.
  • 2003: केंद्रीय मंत्रिमंडळाने तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला मान्यता दिली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1473: ‘निकोलस कोपर्निकस’ – सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 24 मे 1543)
  • 1630: ‘छत्रपती शिवाजी महाराज’ – यांचा जन्म. (मृत्यू: 3 एप्रिल 1680)
  • 1899: ‘बळवंतराय मेहता’ – गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1901: ‘मुहम्मद नगीब’ – इजिप्त देशाचे 1ले राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 28 ऑगस्ट 1984)
  • 1906: ‘माधव सदाशिव गोळवलकर’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक यांचा जन्म. (मृत्यू: 5 जून 1973)
  • 1919: ‘अरविंद गोखले’ – मराठी नवकथेचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑक्टोबर 1992)
  • 1922: ‘सरदार बियंत सिंग’ – पंजाबचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑगस्ट 1995)
  • 1941: ‘डेव्हिड ग्रॉस’ – नोबेल पारितोषिक विजेते,  अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1943: ‘टिम हंट’ – नोबेल पारितोषिक विजेते, इंग्रजी बायोकेमिस्ट यांचा जन्म.
  • 1947: ‘मोहम्मद अकबर लोन’ – भारतीय राजकारणी, खासदार, जम्मू आणि काश्मीरचे आमदार यांचा जन्म.     (मृत्यू : 5 मे 2022)
  • 1952: ‘डॅनिलो तुर्क’ – स्लोव्हेनिया देशाचे 3रे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1953: ‘क्रिस्टीना फर्नांडीझ डी किर्चनर’ – अर्जेंटिना देशाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा जन्म.
  • 1956: ‘रॉडरिक मॅककिनन’ – नोबेल पारितोषिक विजेते, अमेरिकन जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1818: ‘सरदार बापू गोखले’ – पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती यांचे निधन.
  • 1915: ‘गोपाळ कृष्ण गोखले’ – थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 9 मे 1866)
  • 1956: ‘केशव लक्ष्मण दफ्तरी’ – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि विचारवंत यांचे निधन. (जन्म: 22 नोव्हेंबर 1880)
  • 1978: ‘पंकज मलिक’ – गायक व संगीतकार यांचे निधन. (जन्म: 10 मे 1905)
  • 1997: ‘राम कदम’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1918)
  • 2003: ‘अनंत मराठे’ – पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
  • 2015: ‘नीरद महापात्रा’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक यांचे निधन.( (जन्म: 12 नोव्हेंबर 1947)
  • 2023: ‘मायिल सामी’ – भारतीय अभिनेते यांचे निधन.(जन्म: 2 ऑक्टोबर 1965)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search