Author Archives: Kokanai Digital

Ratnagiri: कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी आता थेट नवा मार्ग; मुंबईतील ‘सीलिंक’ च्या धर्तीवर केबल स्टे ब्रिजही उभारला जाणार

   Follow us on        
रत्नागिरी:कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी आता थेट नवा मार्ग होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन प्रांताना जोडण्यासाठी केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत आहे. या ब्रिजमुळं सातारा आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. तसंच, या ब्रिजवर पर्यटकांसाठी व्ह्यूविंग गॅलरीदेखील उभारण्यात येणार आहे. त्यामुळं सह्याद्रीतील कोयनेचे बॅकवॉटर आणि सनराइज व सनसेटही पर्यटकांना पाहता येणार आहे.
या नवीन मार्गामुळं कोयना खोऱ्यातील दुर्गम भागांना जोडणारा आहे. हा पूल साताऱ्यातील तापोळा ते पलीकडेल गाढवली आहिरपर्यंत होणार आहे. त्याच्याजवळच घाटमार्ग असून या पुलामुळं रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरचे अंतर सुमारे 50 किमीने कमी होणार आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाटमार्गे या पुलावरुन सातारा व महाबळेश्वर असा प्रवास करता येणार आहे.
मुंबईतील सीलिंकप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकाराचा ब्रिज होणार आहे. हा ब्रिज 540 मीटर लांब आणि 14 मीटर रुंदीचा पूल असणार आहे. मध्यवर्ती भागात 43 मीटर उंचीची पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी उभारली जाणार आहे. त्यामुळं आता रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा आंबेनळी घाटमार्गाऐवजी नवा मार्ग प्रवाशांना खुला होईल. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटमार्गाने नव्या ब्रिजवरुन पलीकडे तापोळामार्गे महाबळेश्वर व थेट तापोळा कासमार्गे सातारा असा प्रवास करता येणार आहे. याच मार्गावर बामणोली ते आपटी हा आणखी एक पूल उभारला जात आहे. त्यामुळं तापोळा ते सातारा हे अंतर 10 ते 15 किमीने कमी होईल.

Cyclone Alert: अरबी समुद्र खवळण्याची शक्यता, 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन!

   Follow us on        
Cyclone Alert: महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात बुधवार, 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांनी घ्यावयाची सावधगिरी
* हवामान खात्याच्या अपडेट्स नियमितपणे तपासत राहावेत.
* स्थानिक प्रशासन व मच्छीमार सहकारी संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
* खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे पूर्णतः टाळावे.
* लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्यालगतच कार्य करावे.
* सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने (लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेट) जवळ बाळगावीत.
* संभाव्य वाऱ्याचा वेग व लाटांचा जोर लक्षात घेऊन किनाऱ्यावरील होड्या व बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्यात.
* समुद्र खवळलेला असताना मासेमारी टाळून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी.

२१ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 27:25:15 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 18:59:18 पर्यंत
  • करण-तैतुल – 16:16:41 पर्यंत, गर – 27:25:15 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-वैधृति – 24:34:06 पर्यंत
  • वार=बुधवार
  • सूर्योदय-06:04
  • सूर्यास्त-19:06
  • चन्द्र राशि-कुंभ
  • चंद्रोदय-26:03:59
  • चंद्रास्त-13:18:59
  • ऋतु-ग्रीष्म
जागतिक दिन :
  • जागतिक ध्यान दिवस
  • जागतिक मासे स्थलांतर दिन
  • आंतरराष्ट्रीय चहा दिवस
  • सांस्कृतिक विविधतेसाठी जागतिक दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1881 : वॉशिंग्टन (डी.सी.) मध्ये अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना झाली.
  • 1904 : फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (FIFA) ची पॅरिसमध्ये स्थापना झाली.
  • 1927 : चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग एक अमेरिकन विमानचालक आणि लष्करी अधिकारी होता. त्यांनी न्यूयॉर्क शहर ते पॅरिस पर्यंत 3,600 मैल (5,800 किमी) चे पहिले नॉनस्टॉप उड्डाण केले, 33.5 तास एकट्याने उड्डाण केले.
  • 1932 : अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर पार करणारी पहिली महिला ठरली.
  • 1991 : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या.
  • 1992 : चीनने 1,000 किलोटन अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
  • 1994 : मिस इंडिया सुष्मिता सेनने ४३व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. ही पदवी मिळवणारी ती पहिली भारतीय आहे.
  • 1996 : सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1916 : ‘हेरॉल्ड रॉबिन्स’ – अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 1997)
  • 1923 : ‘अर्मांड बोरेल’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑगस्ट 2003)
  • 1928 : ‘ज्ञानेश्वर नाडकर्णी’ – कला समीक्षक व लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 2010)
  • 1931 : ‘शरद जोशी’ – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 5 सप्टेंबर 1991)
  • 1956 : ‘रविन्र्द मंकणी’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1958 : ‘नइम खान’ – भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर यांचा जन्म.
  • 1960 : ‘मोहनलाल’ – दक्षिण भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • 1971 : ‘आदित्य चोप्रा’ – भारतीय चित्रपट निर्माता यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1471 : ‘हेन्‍री (सहावा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1421)
  • 1686 : ‘ऑटो व्हॉन गॅरिक’ – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1602)
  • 1979 : ‘जानकीदेवी बजाज’ – स्वातंत्र्य वीरांगना यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1893)
  • 1991 : ‘राजीव गांधी’ – भारताचे माजी पंतप्रधान यांची हत्या. (जन्म: 20 ऑगस्ट 1944)
  • 1998 : ‘आबासाहेब बाबूराव किल्लेदार’ – इंटकचे सोलापुरातील नेते यांचे निधन.
  • 2000 : ‘मार्क आर. ह्यूजेस’ – हर्बालाइफ कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1956)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळित

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर वेरवली स्थानका नजीक दरड कोसळून या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ही दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या वेळेस कोणतीही गाडी या ठिकाणावरून जात नव्हती त्यामुळे धोका टळला आहे.

ही दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. वाहतुक ठप्प झाल्याने अनेक गाड्या रखडल्या होत्या . मात्र आताच आलेल्या माहितीनुसार दरड बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. दोन्ही बाजूने वाहतुक सुरू करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून या मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ गाडीच्या नेहमीच्या ‘लेटमार्क’ मुळे प्रवासी नाराज

   Follow us on        
Konkan Railway: एलटीटी – मडगाव दरम्यान चालविण्यात येणारी ११०९९/ १११०० एलटीटी मडगाव एक्सप्रेस नेहमीच उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मध्यरात्री १२:४५ वाजता एलटीटी येथून सुटणारी मडगाव एक्सप्रेस मुळातच दोन तास उशिराने सुटते. त्यानंतर पुढे ढकलत ढकलत चालते. परिणामी दररोज चार ते पाच तास विलंबाने धावते. गावी जायची ओढ असल्यामुळे कोकणी माणूस निमूटपणे हा त्रास सहन करत आहे. या गाडीच्या नेहमीच्या लेटमार्क मुळे ८/१० तासांचा प्रवास १४ ते १६ तासांवर जातो. ही गाडी नेहमीच उशिराने चालवली जात असल्याने या गाडीची विश्वासहर्तता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. काहीच पर्याय नसल्याने कोकणकरांना या गाडीने प्रवास करावा लागत आहे.
या गाडीच्या लेटमार्कबद्दल अनेक चाकरमान्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या. पण फारसे गांभीयनि घेतले जात नाही. कोकणवासीयांना होणाऱ्या या त्रासाबद्दल सिंधुदुर्ग रत्नागिरीमधील राजकीय नेत्यांनीच नाही तर मुंबईत विविध पक्षात कार्यरत असलेल्या नेत्यांनीही कोकण रेल्वेसह मध्य रेल्वे प्रशासनाचे कोकणवासीयांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.  हे असे सुरू राहिले तर मग मात्र कोकणी माणूस रस्त्यावर उतरून रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याची चिन्हे आहेत.
मुंबई LTT मडगाव (अप आणि डाऊन) रेल्वेगाडी गेले आठवडाभर 5 ते 10 तास उशिराने धावत आहे. Where is my train app वर गेल्या 8 दिवसांचे वेळापत्रक आपण तपासून पाहू शकता. प्रवाशांना याचे मेसेज गाडी सुटायच्या वेळेवर येतात. त्यामुळे लोक सामान, बोजा आणि परिवारासोबत प्लॅटफॉर्मवर पोहोचलेले असतात व रात्रंदिवस ताटकळत गाडीची वाट पाहत राहतात. याठिकाणी प्रवाशांच्या वेळेचे मोल शून्य गृहीत धरले जातेय. रेल्वे प्रशासन कधी जागे होणार? विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करणारे रेल्वे प्रशासन मात्र स्वतःच्या चुकीवर प्रायश्चित्त घ्यायला किंवा शिक्षा भोगायला तयार आहे का? कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा टीव्ही माध्यमांवर याविषयी बातमी नाही, याचेही मोठे आश्चर्य वाटते. या विलंबाचे कारण काय? यार्गावरील अन्य गाड्या मात्र थोड्या विलंबाने का होईना धावत आहेत.  याकरिता कोकणवासीयांसाठी सावंतवाडी टर्मिनस होणे फार गरजेचे आहे. कोकणी माणूस संयमी, समजूतदार व सहनशील असल्याने त्याचा हा छळ होत असेल तर जनआंदोलन उभे राहिल्यास आश्चर्य वाटायला नको.
– गणेश चमणकर, वेंगुर्ले   
मध्य रेल्वेची कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात बेभरवशाची १११०० मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आज (१८ मे, २०२५) मडगावहून तब्बल ९ तास ५६ मिनिटे उशिराने सुटली. मध्य रेल्वेने आता या गाडीला स्वतंत्र रेक उपलब्ध करावा. अन्यथा ही गाडी वेळेत चालणे शक्य नाही.
– अक्षय महापदी, कळवा  
मध्य आणि कोकण रेल्वे ११०९९/१११०० ही सेवा गेली दोन वर्षे नीट चालवत नाही. त्यांनी ही गाडी पश्चिम रेल्वेला चालविण्यास द्यावी १०११५/१०११६ व ११०९९/१११०० या दोन्ही गाड्या एकत्र करून एक नियमित गाडी संध्याकाळी ६ तें १० या वेळेत वांद्रे किंवा नवीन होणाऱ्या जोगेश्वरी टर्मिनस येथून सोडण्याबाबत विचार व्हावा.
– केशव नाईक, सावंतवाडी 

Kudal: डंपरची एसटी बसला जोरदार धडक बसून अपघात

   Follow us on        
चौके: कुडाळ येथून मालवणच्या दिशेने दुपारी 12.30 वाजता सुटणारी कुडाळ मालवण एसटी बस आणि चौके वरून धामापूरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर यांच्यात चौके नारायण वाडी या ठिकाणी मंगळवारी दुपारी समोरासमोर जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक व प्रवासी सुदैवाने बचावले मात्र एसटी बसच्या चालकाच्या बाजूने दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
मालवण डेपोची एसटी बस (MH-14 BT-3063) मंगळवारी दुपारी कुडाळ वरून मालवणच्या दिशेला येत असताना चौके नारायण वाडी येथे एसटी बस आणि चौके वरून धमापुरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर (MH-07- AJ-2810) यांच्यामध्ये एसटी चालकाच्या बाजूने जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावला. बसमधील प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या.. मात्र झालेल्या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले. चालक वाहक आणि किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. बसचालक आणि वाहक यांनी अपघाताची खबर मालवण एसटी आगारात दिली असून एसटी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू आहे.

Covid-19 Updates: ‘कोरोना’ पुन्हा येतोय?

   Follow us on        

Covid-19 Updates: एकेकाळी संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण निर्माण करणारा कोरोना पुन्हा येत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिकडच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या काही आठवड्यात सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये #COVID19 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, ही प्रकरणे बहुतेक सौम्य आहेत, असामान्य तीव्रता किंवा मृत्युदराशी संबंधित नाहीत.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य सेवा महासंचालक (DGHS) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), आपत्कालीन वैद्यकीय मदत (EMR) विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि केंद्र सरकारी रुग्णालयांमधील तज्ञांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत असा निष्कर्ष काढण्यात आला की भारतातील सध्याची कोविड-१९ परिस्थिती नियंत्रणात आहे. १९ मे २०२५ पर्यंत, भारतात सक्रिय कोविड-१९ प्रकरणांची संख्या २५७ आहे, जी देशाच्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता खूपच कमी आहे. यापैकी जवळजवळ सर्व प्रकरणे सौम्य आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) आणि ICMR द्वारे कोविड-१९ सह श्वसन विषाणूजन्य आजारांवर देखरेख ठेवण्यासाठी एक मजबूत प्रणाली देशात अस्तित्वात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी सतर्क आणि सक्रिय आहे, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जात आहेत याची खात्री करत आहे.

२० मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 28:58:48 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 19:33:23 पर्यंत
  • करण-बालव – 17:31:32 पर्यंत, कौलव – 28:58:48 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-इंद्रा – 26:49:36 पर्यंत
  • वार-मंगळवार
  • सूर्योदय-06:05
  • सूर्यास्त-19:06
  • चन्द्र राशि-मकर – 07:36:34 पर्यंत
  • चंद्रोदय-25:26:00
  • चंद्रास्त-12:22:59
  • ऋतु-ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक मधमाशी दिन World Bee Day
  • आंतरराष्ट्रीय क्लिनिकल चाचण्या दिवस International Clinical Trials Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1498 : पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कालिकत (कलकत्ता) भारतीय बंदरावर आला.
  • 1540 : छायाचित्रकार अब्राहम ऑर्टेलियस यांनी पहिले आधुनिक ॲटलस थिएटरम ऑर्बिस टेरारम प्रकाशित केले.
  • 1873 : लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याच्या बटणांसह निळ्या जीन्सचे पेटंट घेतले.
  • 1891 : थॉमस एडिसनने किनेटोस्कोपचा पहिला नमुना प्रदर्शित केला
  • 1902 : क्युबाला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1927 : सौदी अरेबियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1948 : चियांग काई शेक यांची चीन प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
  • 1990 : हबल स्पेस टेलिस्कोपने अंतराळातून पहिली छायाचित्रे पाठवली.
  • 1996 : देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द’इयर हा पुरस्कार जाहीर.
  • 2000 : राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.
  • 2001 : चित्रपट निर्माते आणि लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2011 : झारखंडच्या गिर्यारोहक प्रेमलता अग्रवाल यांनी माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला होण्याचा मान मिळवून गिर्यारोहणाच्या क्षेत्रात नवा इतिहास रचला.

 

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1818 : ‘विल्यम फार्गो’ – अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 1881)
  • 1850 : ‘विष्णूशास्त्री चिपळूणकर’ – केसरी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 17 मार्च 1882)
  • 1851 : ‘एमिल बर्लिनर’ – ग्रामोफोन रेकॉर्ड चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 1929)
  • 1860 : ‘एडवर्ड बकनर’ – आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑगस्ट 1917)
  • 1884 : ‘पांडुरंग दामोदर गुणे’ – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 25 नोव्हेंबर 1922)
  • 1900 : ‘सुमित्रानंदन पंत’ – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी यांचा जन्म. (मृत्यू: 28 डिसेंबर 1977)
  • 1913 : ‘विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट’ – हेव्हलेट-पॅकार्ड चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 12 जानेवारी 2001)
  • 1915 : ‘मोशे दायान’ – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑक्टोबर 1981)
  • 1944 : ‘डीट्रिख मत्थेकित्झ’ – रेड बुल चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1952 : ‘रॉजर मिला’ – कॅमेरुनचा फूटबॉलपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1506 : ‘ख्रिस्तोफर कोलंबस’ – इटालियन दर्यावर्दी व संशोधक यांचे निधन.
  • 1571 : ‘केशवचैतन्य’ ऊर्फ बाबाचैतन्य – राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु यांनी जुन्‍नरजवळील ओतूर येथे समाधी घेतली.
  • 1766 : ‘मल्हारराव होळकर’ – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी यांचे निधन. (जन्म: 16 मार्च 1693)
  • 1878 : ‘कृष्णशास्त्री चिपळूणकर’ – समाजसुधारक व संस्कृत विद्वान यांचे निधन.
  • 1932 : ‘बिपिन चंद्र पाल’ – स्वातंत्र्यसेनानी यांचे निधन. (जन्म: 7 नोव्हेंबर 1858)
  • 1961 : ‘भाई विष्णूपंत चितळे’ – कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते यांचे निधन.
  • 1992 : ‘डॉ. लीला मूळगांवकर’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1916)
  • 1994 : ‘के. ब्रम्हानंद रेड्डी’ – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 28 जुलै 1909)
  • 1997 : ‘विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर’ – इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील यांचे निधन.
  • 2012 : ‘लीला दुबे’ – भारतीय मानववंशशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 27 मार्च 1923)
  • 2012 : ‘यूजीन पॉली’ – रिमोट कंट्रोल चे शोधक यांचे निधन. (जन्म: 29 नोव्हेंबर 1915)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Zee Cine Awards 2026: २०२६ चा ‘झी सिने अवॉर्ड’ सोहळा सिंधुदुर्गात होणार

   Follow us on        
Mumbai: सिंधुदुर्ग वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. झी समूहाने ‘झी सिने अवॉर्ड 2026’ सिंधुदुर्गमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणाला एक राष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे.
अलीकडेच मुंबईत पार पडलेल्या ‘झी सिने अवॉर्ड 2025’ या कार्यक्रमास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुढील वर्षीचा ‘24वा झी सिने अवॉर्ड 2026’ सिंधुदुर्ग येथे घेण्याची अधिकृत घोषणा केली. ही बातमी समजताच कोकणात उत्साहाचं वातावरण पसरलं असून, सर्व स्तरांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
नितेश राणे म्हणाले, ‘हा केवळ एक पुरस्कार सोहळा नसेल, तर संपूर्ण सिंधुदुर्ग आणि कोकणातील जनतेच्या स्वप्नांची पूर्तता करणारा ऐतिहासिक क्षण असेल. बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार, निर्माता-दिग्दर्शक कोकणात येतील. इथल्या सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेतील. यामुळे कोकणातील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.’
राणेंनी या घोषणेसोबतच एक व्हिडिओदेखील आपल्या सोशल मीडिया एक्स (पूर्वीचा ट्विटर) हँडलवर शेअर केला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोकणातील नैसर्गिक सौंदर्य, पारंपरिक लोककला, खाद्यसंस्कृती आणि माणुसकीने नटलेली कोकणची माती या सगळ्याचा स्पर्श या कार्यक्रमात दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘झी सिने अवॉर्ड’सारखा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेला कार्यक्रम कोकणात घेण्याचा निर्णय हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून कोकणच्या विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरेल. स्थानिक कलाकारांना या निमित्ताने मोठ्या व्यासपीठावर आपली कला सादर करता येईल आणि कोकणची संस्कृती देशभर पोहोचवता येईल.
सध्या झी समूह आणि राज्य सरकार यांच्यात कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी नियोजन सुरू झाले असून, याची अधिकृत माहिती लवकरच दिली जाणार आहे. कोकणातील जनतेसाठी हा निश्चितच गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

Khed: इर्टिगा कार जगबुडी नदीपात्रात कोसळली, पाच जणांचा मृत्यू

देवरुख येथे अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबियांवरच काळाने झडप घातली.

   Follow us on        

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीपात्रात इर्टिगा कार कोसळून पाच जणांचा दुःखद अंत झाला. सोमवारी पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला.

चालकासह अन्य एक सुदैवाने बचावला आहे. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. मिताली विवेक मोरे, मिहार विवेक मोरे, परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर (सर्व रा. मिरा रोड-मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णतः चुराडा होऊन प्रवासी आतमध्येच अडकले होते.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search