Author Archives: Kokanai Digital

२२ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 15:21:09 पर्यंत
  • नक्षत्र-स्वाति – 26:35:03 पर्यंत
  • करण-कौलव – 15:21:09 पर्यंत, तैतुल – 28:34:08 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शूल – 28:36:48 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:23
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 25:37:00
  • चंद्रास्त- 12:20:00
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.
  • १९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
  • १९४७: भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर
  • १९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.
  • १९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९२: रॉबर्टा बॉन्डर ह्या अवकाशात जाणाऱ्या पहिला महिला ठरल्या.
  • १९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
  • २००१: ’आय. एन. एस. मुंबई’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.
  • २००६: इवा मोराल्स यांनी बोलीवियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
  • २०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५६१: सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)
  • १८७७: आसाम चे प्रमुख कार्यकर्ते तरुण राम फुकन यांचा जन्म.
  • १८९२: भारताचे स्वातंत्र्य सैनिक ठाकुर रोशन सिंह यांचा जन्म.
  • १८९६: कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म.
  • १८९७: भारताचे प्रसिद्ध गायक दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.
  • १८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.
  • १९०९: यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)
  • १९११: मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.
  • १९१६: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)
  • १९१६: सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक, चलती का नाम गाडी
  • १९२०: प्रा. ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (मृत्यू: ? ? ????)
  • १९२२: मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.
  • १९३४: विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
  • १९४९: त्रिपुरा चे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा जन्म.
  • १९५८: दोस्ती [१९६४], रात और दिन [१९६७], आंसू बन गये फूल [१९६९], जीवन मृत्यू [१९७०] हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (मृत्यू: ९ जून १९९३)
  • १९७३: अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने गर्भपाताला मान्यता दिली, कोणतीही महिला गर्भवती असताना ६ महिन्यांपर्यंत गर्भपात करू शकते.
  • १९९६: कॅलिफोर्निया च्या वेधशाळेतील शास्त्रज्ञांनी पृथ्वी पासून ३,५०,००० प्रकाश वर्ष इतक्या अंतरावर असलेल्या दोन नवीन ग्रहांचा शोध लावला.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १२९७: योगी चांगदेव समाधिस्थ (जन्म: ? ? ????)
  • १६६६: ५ वा मुघल सम्राट शहाजहान याचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन (जन्म: ५ जानेवारी १५९२)
  • १६८२: समर्थ रामदास स्वामी (जन्म: ? ? १६०८)
  • १७९९: होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे – ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक
  • १९०१: व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी, हिने ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य केले. हिच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे अशी ख्याती होती. व्हिक्टोरिया राणीच्या काळातच भारत इंग्लंडचा गुलाम झाला. (जन्म: २४ मे १८१९)
  • १९६७: डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)
  • १९७२: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (जन्म: ३ आक्टोबर १९०३)
  • १९७३: लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
  • १९७५: ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)
  • १९७८: हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)
  • २००४: भारतीय चित्रपट अभिनेत्री मेनका देवी यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती सावंतवाडी स्थानकावर साजरी

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तर्फे आज सावंतवाडी रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती सावंतवाडी स्थानकात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रमुख सल्लागार जगदीश मांजरेकर, अभिमन्यु लोंढे, नंदू तारी, पुंडलिक दळवी, सुभाष शिरसाट संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, सुधीर राऊळ, साईल नाईक, विहंग गोठोस्कर, मेहुल रेडीज, सागर तळवडेकर, रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि प्रवासी उपस्थित होते
कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते कोकणात रेल्वे आणण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे.  त्यांच्यामुळे कोकणात रेल्वे आणण्याचे अशक्य कार्य पूर्णत्वास आले. त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा यासाठी सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने लावून धरली आहे. या मागणी व्यतिरिक्त सावंतवाडी  टर्मिनस चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, या स्थानकावर महत्वाच्या नियमित गाडयांना थांबे देण्यात यावेत आणि इतर मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी संघटनेने येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला  ‘रेल रोको’ आंदोलन करायचे ठरविले आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेने केले आहे.

कोंकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती पनवेल स्थानकावर साजरी

   Follow us on        
पनवेल: कोंकण रेल्वेचे शिल्पकार माजी केंद्रीय मंत्री स्वगीय प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती आज मंगळवार दि.२१ जानेवारी,२०२५ रोजी पनवेल रेल्वे स्टेशनवर साजरी करण्यात आली. यासमयी पनवेल स्टेशन मॅनेजर केएस अग्रवाल व पनवेल रेल्वे पोलीस ठाणेचे पोनि तांबोळी यानी प्रतिमेस हार घालून आदराजली वाहीली,
यावेळी  महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी महासंघ  व नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेअर असो. अध्यक्ष तथा सेंट्रल कमिटी सदस्य ( ZRUCC Member ) श्री.अभिजीत  धुरत व आर.पी.आय्.(आर्.के )चे अध्यक्ष मा.राजाराम खरात साहेब,अश्वत्थामा ज्येष्ठ  नागरिक संघ नवीन पनवेलचे  अध्यक्ष श्री.प्रकाश विचारे,समाजसेविका रत्नमाला पाबळेकर,अॅड संजय गंगनाईक, डिप्टी स्टेशन मॅनेजर राकेश तिवारी, अॅड  यशवंत पाटील, महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे,रेणूका सांळुखे, संजीवनी पोसतांडेल सुरेन्द्र नेमळेकर,, श्रीविदया सरवणकर,एसके पाटील, डीजी मगरे, साहेबराव जाधव, काशीनाथ भोईर, चंदोदय वाघमारे इतर,मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी, रेल्वे कर्मचारी उपस्थित होते

Konkan Railway: तेजस एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

   Follow us on        

Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसचे इंजिन रत्नागिरी करबुडे दरम्यान बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. या एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडण्यात आल्याने एका तासाने या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. मात्र या मार्गावरील काही गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. तर आज प्रस्थान करणारी गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस आज संध्याकाळी १८.०५ वाजता पुनर्नियोजित Rescheduled करण्यांत आली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस ही रेल्वे गाडी रत्नागिरी करबुडे दरम्याने आली असता या गादीचे इंजिन अचानक बंद पडले. हा प्रकार मंगळवार २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या ठीक ठिकाणी थांबवण्यात आल्या. इंजिन नादुरुस्त झाल्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एका तास खोळंबा झाला.

रत्नागिरी रेल्वे स्थानकातून नवीन इंजिन मागवण्यात येऊन तेजस एक्सप्रेस ही गाडी एका तासानंतर मार्गस्थ करण्यात आली. तेजस या गाडीला दुसरे इंजिन जोडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या मार्गावरील दिवा – सावंतवाडी, सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस, मडगाव – सीएसएमटी मांडवी, सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस या  गाड्या २ ते ३ तास उशिराने धावत आहेत.

Mumbai Local: पाश्चिम रेल्वे मार्गावर रुळाला तडे; मोठा अनर्थ टळला, वाहतुक रखडली

 

   Follow us on        

Mumbai Local: पश्चिम रेल्वेच्या वैतरणास्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा स्थानकाजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या. वेळीच खबरदारी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने होणारी वाहतुक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामाला जाणार्‍या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रूळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

महत्वाचे: मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग उद्यापासून ‘या’ वेळे दरम्यान तीन दिवस बंद रहाणार

   Follow us on        

मुंबई: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर डोंगरगाव/ कुसगांव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू आहे. या कारणाने दि. 22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक ण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे. (Mumbai Pune Expressway)

द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या अधिकार्‍यां तर्फे करण्यात आले आहे.

 

रत्नागिरीत प्रथमच होणार क्षेत्रीय वैदिक संमेलन; १०० वैदिक पंडितांच्या उपस्थितीत होणार वेदमंत्रांचा जागर

   Follow us on        

रत्नागिरी:महर्षी हर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन दिनांक ७,८,९ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक या ४ राज्यांतून प्रमुख मंदिरांचे पुजारी आणि विविध वेद पाठशाळांमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत असणारे शिवाय वेदातील क्रमांत, घनांत असे अध्ययन पूर्ण केलेले वैदिक मान्यवर येणार आहेत. या ३ दिवसांच्या संमेलनात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या ४ वेदांच्या विशिष्ट शाखांचे सामूहिक पठण होणार आहे.

हे संमेलन रत्नागिरी शहरातील माधवराव मुळ्ये भवन येथे संपन्न होणार असून संमेलनात वेद, वेदविज्ञान या संबंधी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि त्यांचे महत्व जनमानसापर्यंत पोहचावे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हा संमेलनाला वेदप्रेमी रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने करण्यात आलेले आहे

२१ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तितिथि-सप्तमी – 12:42:52 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 23:37:32 पर्यंत
  • करण-भाव – 12:42:52 पर्यंत, बालव – 26:03:24 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-धृति – 27:48:37 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:23
  • चन्द्र-राशि-कन्या – 10:04:25 पर्यंत
  • चंद्रोदय- 24:45:59
  • चंद्रास्त- 11:46:59
  • ऋतु- शिशिरतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय आलिंगन दिन.
महत्त्वाच्या घटना:
  • १७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
  • १७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.
  • १८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
  • १८४६: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.
  • १९५८: कॉपीराईट चा नियम आजच्या दिवशीच लागू केला गेला.
  • १९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट
  • १९७२: मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.
  • २०००: ’फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
  • २००९: भारतीय वायुसेनेचे सूर्यकिरण नावाच्या एका प्रशिक्षण विमानाचा कर्नाटक च्या बिदर येथे अपघात झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८८२: वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (मृत्यू: २० जुलै १९४३)
  • १८९४: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९)
  • १९१०: शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार. ’भाग्यरेखा’, ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ वगैरे अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. ’संत तुकाराम’ चित्रपटातील ’आधी बीज एकले’ हा अभंग त्यांनी रचला आहे. परंतु लोकांना हा अभंग तुकारामांचाच आहे असे वाटते. (मृत्यू: २ मे १९७५)
  • १९२२: पंजाब चे माजी मुख्यमंत्री हरचरण सिंग ब्रर यांचा जन्म.
  • १९२४: प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५)
  • १९४३: प्रसिद्ध भारतीय लेखिका प्रतिभा राय यांचा जन्म.
  • १९५२: भारतीय चित्रपट अभिनेता प्रदीप रावत यांचा जन्म.
  • १९५३: पॉल अ‍ॅलन – मायक्रोसॉफ्टचा एक संस्थापक
  • १९८६: भारतीय चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९३: लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २३ ऑगस्ट १७५४)
  • १९०१: अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (जन्म: २ ऑगस्ट १८३५)
  • १९२४: ब्लादिमिर लेनिन – रशियन क्रांतिकारक (जन्म: २२ एप्रिल १८७०)
  • १९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. (जन्म: २३ मार्च १९२३)
  • १९४५: रास बिहारी घोष – क्रांतिकारक (जन्म: २५ मे १८८६)
  • १९५०: एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (जन्म: २५ जून १९०३)
  • १९५९: सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक
  • १९६३: ला भारतीय प्रसिद्ध कादंबरीकार शिवपूजन सहाय यांचे निधन.(जन्म: १२ ऑगस्ट १८८१)
  • १९६५: हरिकीर्तन कौर ऊर्फ ’गीता बाली’ – अभिनेत्री (जन्म: ? ? १९३०)
  • १९९७: ला भारताचे माजी नौदल प्रमुख सुरेंद्रनाथ कोहली यांचे निधन.
  • १९९८: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (जन्म: २१ जून १९१६)
  • २०१६: ला भारताची प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा निष्फळ, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी २६ जानेवारीला रेल रोको आंदोलन करण्यावर ठाम.

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानकावर परिपूर्ण रेल्वे टर्मिनस व्हावे, या ठिकाणी नवीन टर्मिनस प्लॅटफॉर्म आणि बिल्डिंग व्हावी, या स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेत करावा तसेच सावंतवाडी स्थानकावरून कोरोना काळात काढून घेण्यात आलेला १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस व १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा इत्यादी मागण्यांसाठी येत्या २६ जानेवारीला कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ही अराजकीय संघटना रेल रोको आंदोलन करणार आहे. त्याबाबत ची नोटीस संबंधित प्रशासनाला दिलेली होती त्याचाच भाग म्हणून रेल्वे प्रशासनाकडून क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री शैलेश आंबर्डेकर यांनी आज कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि रेल रोको करू नये असा आशयाचे पत्र संघटनेला सुपूर्द केले.परंतु कोकण रेल्वेने दिलेल्या पत्रात संघटनेच्या मागण्यांसंदर्भात एकही सकारात्मक बाब नसल्याने संघटनेने आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत अशा आशयाचे पत्र क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री आंबर्डेकर यांना सुपूर्द केले. तसेच आमच्या मागण्यांसंदर्भात बेलापूर येथे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांचा अध्यक्षतेखाली २३ जानेवारीच्या अगोदर बैठक आयोजित करावी अशी विनंती संघटनेने केली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍड श्री संदीप निंबाळकर, सचिव श्री मिहिर मठकर, सल्लागार श्री सुभाष शिरसाट आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पद एवढे महत्वाचे कां?

   Follow us on        

विश्लेषण: महाराष्ट्र राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची नुकतीच घोषणा झाली. यादी निघाल्या नंतर काही मंत्र्यांकडून नाराजीचा सूर निघायला सुरुवात झाला. यावरून महायुतीतील सुद्धा घमासान सुरू झाले. हा वाद एवढा टोकाला गेला की दोन जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा निर्णय विद्यमान सरकारला स्थगित करावा लागला. पालकमंत्री पदासाठी एवढी मारामारी कशाला हा प्रश्न साहजिकच पडतो.

महाराष्ट्रातील राजकारणात पालकमंत्री पद अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे कारण या पदाच्या माध्यमातून राज्य सरकार स्थानिक प्रशासनावर थेट नियंत्रण ठेवते. पालकमंत्री हा जिल्ह्याचा मुख्य शासकीय प्रतिनिधी असतो आणि त्याला त्या जिल्ह्याच्या विकासाबाबत जबाबदारी असते.

प्रशासनिक नियंत्रण:
पालकमंत्री जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यकाळासाठी एक प्रमुख प्रशासनिक व्यक्ती म्हणून कार्य करतो.तो जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा अधिकारी,आणि इतर सरकारी विभागांच्या कामकाजावर देखरेख ठेवतो.

विकासकामांचे नियोजन व अंमलबजावणी:
जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि योजनांच्या अंमलबजावणीला चालना देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे. यात ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो.

राजकीय प्रभाव:
स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव असलेला पालकमंत्री त्या जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर नियंत्रण ठेवतो, त्यामुळे त्याच्या समर्थनाच्या आधारावर शासकीय कामे व इतर निर्णय होतात.

कायदा व सुव्यवस्था:
पालकमंत्री हा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही घेतो. त्याच्या अधीन असलेल्या जिल्ह्यातील भागात शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याला विशेष अधिकार मिळतात.

जिल्ह्याच्या सर्व विकासात्मक आणि प्रशासकीय निर्णयांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका:

कोणत्याही जिल्ह्यातील सरकारी योजनांचे निर्णय घेण्यास आणि त्या क्षेत्रातील आवश्यक निर्णय घेण्यास पालकमंत्री प्रमुख भूमिका निभावतो.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search