Author Archives: Kokanai Digital




सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळा बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोकणातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाच्या विकासास आता गती मिळण्याची शक्यता आहे. पुढील चार महिन्यांत चिपी विमानतळावर नाइट लँडिंगसाठी परवानगी मिळणार असून, या विमानतळावरून मुंबई सेवाही अखंडित सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.
नुकतीच मंत्रालयात चिपी विमानतळासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत, विमानतळ विकासासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुविधांच्या उभारणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विमानतळाच्या सुशोभीकरणासाठी DPDC (District Planning and Development Council) मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, “मुंबई ते चिपी दरम्यानची सेवा कुठल्याही परिस्थितीत खंडित होता कामा नये. विमानतळाच्या सर्व सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात. खास करून रात्री लँडिंगला अनुमती मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबवावी”
चिपी विमानतळासंदर्भात लवकरच विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार
तसेच, विमानसेवा अधिक सुलभ आणि नियमित करण्यासाठी नवीन मार्ग आणि कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही लवकरच होणार आहे. या अनुषंगाने विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली.




Mumbai Amrit Bharat Express : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, देशाच्या आर्थिक राजधानीला अमृत भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन येत्या काही महिन्यांनी मुंबईवरून सुरू होणार आहे. मुंबई ते बिहार दरम्यान ही गाडी चालवली जाणार असून यामुळे बिहार मधून मुंबईला आणि मुंबईमधून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यापासून बिहार ते मुंबई दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाईल अशी शक्यता आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा बिहारला भेट देतील तेव्हा ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे.
दरम्यान ही नवीन अमृत भारत ट्रेन सहरसा आणि मुंबई दरम्यान धावणार आहे. यामुळे मुंबई ते सहरसा हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर बिहारला या आधी सुद्धा अमृतभारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे.
बिहार मधील पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन दरभंगा ते आनंद विहार टर्मिनल (ANVT) या मार्गावर धावत आहे. आता या मार्गानंतर, मुंबई ते सहरसा या मार्गावर अमृत भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता असून ही बिहारची दुसरी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन असेल.
आजचे पंचांग
- तिथि-नवमी – 18:16:32 पर्यंत
- नक्षत्र-श्रवण – 12:45:22 पर्यंत
- करण-तैतुल – 06:44:50 पर्यंत, गर – 18:16:32 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-शुभ – 21:12:40 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 06:19
- सूर्यास्त- 18:56
- चन्द्र-राशि-मकर – 24:32:34 पर्यंत
- चंद्रोदय- 26:49:59
- चंद्रास्त- 13:33:00
- ऋतु- ग्रीष्म
- आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन
- राष्ट्रीय आयटी सेवा प्रदाता दिन National IT Service Provider Day
- 1056 : क्रॅब नेब्युलामध्ये सुपरनोव्हा स्फोट.
- 1948 : अरब-इस्त्रायली युद्ध – अरबांनी हैफा हे प्रमुख इस्रायली बंदर काबीज केले.
- 1970 : पृथ्वी दिन प्रथमच साजरा करण्यात आला.
- 1977 : टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी ऑप्टिकल फायबरचा प्रथम वापर.
- 1997 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील ओमप्रकाश भसीन पुरस्काराने घोषित करण्यात आले.
- 2006 : कौटुंबिक वादातून प्रवीण महाजन यांनी भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यावर गोळी झाडली.
- 2016 : पॅरिस करारावर स्वाक्षरी झाली, ग्लोबल वार्मिंगशी लढा देण्यासाठी एक करार.
- 1698 : ‘शिवदिननाथ’ – नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष यांचा जन्म.
- 1724 : ‘एमॅन्युएल कांट’ – जर्मन तत्त्ववेत्ता यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 1804)
- 1812 : भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1860)
- 1870 : ‘व्लादिमीर लेनिन’ – रशियन क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 21 जानेवारी 1924)
- 1904 : ‘जे. रॉबर्ट ओपेनहायमर’ – अणुबॉम्बचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 18 फेब्रुवारी 1967)
- 1914 : ‘बलदेव राज चोपडा’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 5 नोव्हेंबर 2008)
- 1916 : ‘काननदेवी’ – अभिनेत्री आणि गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1992)
- 1916 : व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन यांचा जन्म. (मृत्यू: 12 मार्च 1999)
- 1929 : चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ ‘उषा किरण’ यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 2000)
- 1929 : ‘प्रा. अशोक केळकर’ – भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक यांचा जन्म.
- 1935 : ‘भामा श्रीनिवासन’ – भारतीय-अमेरिकन गणितज्ञ यांचा जन्म.
- 1945 : ‘गोपाळकृष्ण गांधी’ – भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांचा जन्म.
- 1971 : ‘सुमित राघवन’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म
- 1933 : ‘हेन्री रॉयस’ – रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 27 मार्च 1863)
- 1980 : ‘फ्रिट्झ स्ट्रासमान’ – जर्मन भौतिकशात्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1902)
- 1994 : ‘आचार्य सुशीलमुनी महाराज’ – विचारवंत, समाजसुधारक यांचे निधन.
- 1994 : ‘रिचर्ड निक्सन’ – अमेरिकेचे 37 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 9 जानेवारी 1913)
- 2003 : ‘बळवंत गार्गी’ – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1916)
- 2013 : ‘लालगुडी जयरामन’ – व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक यांचे निधन. (जन्म: 17 सप्टेंबर 1930)
- 2013 : ‘जगदीश शरण वर्मा’ – भारताचे 27 वे सरन्यायाधीश यांचे निधन. (जन्म: 18 जानेवारी 1933)




चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात आता पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात खाडी सफारीचा आनंद घेता येणार आहे. शासनाच्या पर्यटन प्रोत्साहन उपक्रमांतर्गत मालदोली येथील अग्निपंख महिला विभाग संघास देण्यात आलेली हाऊसबोट चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. गोळकोट येथे तिचे आवश्यक जोडणीचे काम सुरू असून, लवकरच ती खाडीत सोडण्यात येणार आहे.या उपक्रमामागचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यटन उद्योगातून महिला बचत गटांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हे आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी हाउसबोट प्रकल्प सुरू होत आहे. त्यामध्ये चिपळूण येथील वाशिष्ठी दाभोळ खाडीचाही समावेश आहे. या खाडीतील जैवविविधता, मगर सफारी, पांडवकालीन लेणी, गरम पाण्याचे कुंड, कांदळवणाची बेटे, नारळी पोफळीच्या बागा या निसर्गरम्य परिसराचा अनुभव या हाउसबोटीतून घेता येईल. एक कोटी खर्चाच्या या हाउसबोटमध्ये दोन वातानुकूलित खोल्या असून, त्यात प्रशस्त बेड, सोफा, बाथरूमची व्यवस्था आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी सहभागी ३६ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.सर्वसाधारण हाउस बोटिंगमध्ये पर्यटकांसाठी खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. वर्षाकाठी एक ते दीड कोटींची उलाढाल या प्रकल्पातून अपेक्षित आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेदच्या अधिकाऱ्यांनी, तसेच सहभागी महिलांनी केरळमधील हाउस बोट प्रकल्पाची पाहणी केली आहे.
मालदोली येथील अग्निपंख महिला प्रभाग संघ हा प्रकल्प राबवणार आहे. या प्रभाग संघात ३५५ स्वयंसाहाय्यता समूह १८ ग्रामसंघ, तर ३,८४७ महिला सहभागी आहेत. सिंधुरत्न योजनेतून हा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी या महिलांच्या व्यवस्थापन, देखरेख, विपणन, लेखा अशा चार समित्यांच्या स्थापना केल्या आहेत.
वाशिष्ठी दाभोळखाडीत नयनरम्य असा निसर्ग परिसर आहे. पर्यटकांनी हाउस बोटमधून निसर्गाची पाहणी केल्यास पुन्हा ते सातत्याने इकडे आकर्षित होतील, अशी निसर्गाची उधळण येथे पाहायला मिळते. हा प्रकल्प यशस्वीपणे आम्ही राबवू, असा आम्हाला विश्वास आहे. – दीपिका कुळे, अध्यक्ष, अग्निपंख महिला प्रभाग संघ, मालदोली
आजचे पंचांग
- तिथि-सप्तमी – 19:03:51 पर्यंत
- नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 11:48:59 पर्यंत
- करण-विष्टि – 06:49:12 पर्यंत, भाव – 19:03:51 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-सिद्ध – 24:11:26 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:19
- सूर्यास्त- 18:56
- चन्द्र-राशि-धनु – 18:05:04 पर्यंत
- चंद्रोदय- 25:22:59
- चंद्रास्त- 11:35:59
- ऋतु- ग्रीष्म
- भारतीय नागरी सेवा दिन
- जागतिक क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन दिन World Creativity And Innovation Day
- 753 : ईसा पूर्व: रोमची स्थापना रोम्युलसने केली.
- 1944 : फ्रान्समध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला.
- 1960: ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरोचे उद्घाटन झाले.
- 1972: अपोलो 16 अमेरिकन अंतराळवीर जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक चंद्रावर उतरले.
- 1997: भारताचे 12वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी पदभार स्वीकारला
- 2000: सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आश्रित विधवांना देखील पालकांच्या मालमत्तेचा हक्क आहे.
- 2019 : श्रीलंकेतील चर्च, हॉटेल आणि इतर ठिकाणी आठ बॉम्बस्फोट; 250 हून अधिक लोक मारले गेले.
- 1864 : ‘मॅक्स वेबर’ – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 जून 1920)
- 1922 : ‘अॅलिएस्टर मॅकलिन’ – स्कॉटिश साहसकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1987)
- 1926 : ‘एलिझाबेथ (दुसरी)’ – इंग्लंडची राणी यांचा जन्म.
- 1934 : ‘डॉ. गुंथर सोन्थायमर’ – महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक यांचा जन्म.
- 1945 : ‘श्रीनिवासराघवन वेंकटराघवन’ – भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर यांचा जन्म.
- 1950 : ‘शिवाजी साटम’ – हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
- 1509 : ‘हेन्री (सातवा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 28 जानेवारी 1457)
- 1910 : ‘मार्क ट्वेन’ – अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1835)
- 1938 : ‘सर मुहम्मद इक्बाल’ – पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 नोव्हेंबर 1877)
- 1946 : ‘जॉन मायनार्ड केन्स’ – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 5 जून 1883)
- 1952 : ‘सर स्टॅफोर्ड क्रिप्स’ – इंग्लिश राजकारणी यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1889)
- 2013 : ‘शकुंतलादेवी’ – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1929)




Mansoon Updates: यंदाचा उन्हाळा यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला आहे. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. वातावरणातील या बदलाचा परीणाम मान्सूनच्या आगमनावर करणारा ठरणार आहे. यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. गेल्या आठवडय़ात वातावरणात मोठे बदल झाले असून, मान्सूनच्या हालचाली अंदमानात दिसण्यास सुरुवात होत आहे.
यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला. थंडी कमी अन् ऊन जास्त, असे वातावरण होते. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. त्यापाठोपाठ मार्च आणि एप्रिलमध्येही तीच स्थिती आहे. मार्चमध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला तसेच सरासरी पाऊस कमीच झाला. त्यामुळे मार्च महिना पूर्ण उष्ण ठरला.एप्रिलची सुरुवातही खूप कडक उष्ण झळांनी झाली. गत अनेक वर्षांतील यंदाचा एप्रिल उष्ण ठरत आहे. हे वातावरण मान्सूनच्या तयारीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक असे आहे.
हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा खूप कडक उन्हाळा आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे. ढगांची निर्मिती वेगाने होते असून, सॅटेलाइट इमेज पाहिल्यावर असे लक्षात येते की, मान्सून आपल्या तयारीला लागला आहे. संपूर्ण देशाला ढगांनी वेढले आहे. बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असून, ते आपल्या देशाकडे येत आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
शास्त्रज्ञांनी सांगितले की, मान्सूनच्या हालचाली या समुद्रातील पाण्याचे तापमान, वार्याची दिशा, हवेचे दाब यावर अवलंबून असतात. सध्या अरबी समुद्रातील तापमान 31, तर हिंदी महासागराचे तापमान 30 अंश सेल्सिअस इतके आहे. पाणी खूप तापल्याने वेगाने बाष्पीभवन होत आहे. हवेचे दाब सध्या समुद्रावर 1005 ते 1010 हेक्टा पास्कल इतके आहेत.
देशात हवेचे दाब 1005 ते 1008 दरम्यान आहेत. देशातील दाब कमी झाले की वारे समुद्राकडून देशाच्या दिशेने वाहू लागतात. अंदमानात मान्सून हा तयारीला यंदा लवकर लागला आहे. काही दिवसांतच त्याच्या हालचाली सॅटेलाइट इमेजवर दिसण्याची शक्यता आहे.
यंदा एप्रिलमध्ये पारा 43 ते 44 अंशांवर गेल्याने समुद्रातील पाणी वेगाने तापले. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढल्याने देशाभोवती सर्व बाजूंनी बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार झाल्याचे सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे.
” यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता जास्त आहे. कारण, सर्व लक्षणे अनुकूल दिसत आहेत. कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने बाष्प वेगाने तयार होऊन मान्सूनपूर्व पावसाची तयारी सुरू झाली आहे. तसेच हवेचा दाब, वार्याची दिशा अन् समुद्राचे तापमान, ही मान्सूनसाठी पोषक असणारी लक्षणे यंदा अनुकूल दिसत आहेत. त्यामुळे मान्सून यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होऊ शकेल, अशी शक्यता आहे.”
– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे




डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात संपुष्टात आणण्यासाठी कल्याण पश्चिमेतील सर्वात वर्दळीच्या सहजानंद चौकामध्ये केडीएमसी आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांतर्फे फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग राबविण्यात येत आहे.
सहजानंद चौकात असलेले 5 रस्त्यांचा विचार करता याठिकाणी सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील महिनाभर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्यातून येणाऱ्या निष्कर्षानंतर अभ्यास करून केडीएमसीतर्फे याठिकाणी कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सहजानंद चौकात कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मात्र इथल्या वाहतुकीचा, वर्दळीचा आणि वाहनांच्या संख्येचा अभ्यास न करता सिग्नल यंत्रणा बसवली गेल्यास केडीएमसीचा पैसा वाया जाऊ शकतो. कल्याणकरांच्या कराचा हा पैसा विचारात घेऊन कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील 1 महिनाभर त्याद्वारे इथल्या वाहतुकीचा अभ्यास करण्यात येणार त्यासोबतच कोणते रस्ते वन वे करणे, कोणता डिव्हायडर मागे घेणे, कोणता हायमास्ट शिफ्ट करणे आदींचा विचारही केला जाणार आहे. आणि मग त्यानंतर या चौकाच्या आणि इथल्या वाहतुकीच्या अनुषंगाने कायमस्वरुपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. अशाच प्रकारची सिग्नल यंत्रणा नागपूर शहरात सुरू असून त्याचे चांगले रिझल्ट मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.