Author Archives: Kokanai Digital

Block at CSMT: कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्यांचा प्रवास ठाणे-दादरपर्यंतच

   Follow us on        

Konkan Railway: मुंबई सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने या कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉक च्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. या वाढीव ब्लॉक मुळे काही गाड्यांचा प्रवास अलीकडच्या स्थानकांवर संपवण्यात येणार (Short termination) आहे. याबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे

गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास आजपासून दिनांक ३१/०३/२०२५ पर्यंत ठाणे स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक २२१२० मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा प्रवास आजपासून ३१/०३/२०२५ पर्यंत दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसचा प्रवास आजपासून ३१/०३/२०२५ पर्यंत दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

Loading

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचे अपघाती निधन

   Follow us on        

ठाणे, दि.23:-

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या सौ. पल्लवी सरोदे (वय 37 वर्ष) यांचे आज सकाळी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाले. कार्यालयीन मैत्रिणींसह त्या हरिहरेश्वर या ठिकाणी सहली निमित्त गेल्या होत्या. तेथील समुद्रकिनारी त्या लाटेत अचानक ओढल्या गेल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्वांच्याच मनाला चटक लावून गेली.

सौ.पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात 2012 रोजी लिपिक या पदावर रुजू झाल्या होत्या. मार्च 2024 मध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती. त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या.

ठाणे जिल्हा प्रशासनासाठी अत्यंत दुर्दैवी घटना..

ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध असलेल्या, सर्वांना हसतमुखाने सर्व प्रकारची मदत करणाऱ्या, अतिशय सुस्वभावी, मेहनती, प्रामाणिक, कामात तत्पर, चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असलेल्या पल्लवी सरोदे यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, अशी प्रार्थना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्ह्यातील इतर महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि ठाणे जिल्हा प्रशासनातील अन्य विविध शासकीय विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

स्व. सरोदे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे पती, सासू- सासरे आणि मुलगा (वय 13 वर्ष) असा त्यांचा परिवार आहे.

 

Loading

२४ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 29:08:40 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 28:28:06 पर्यंत
  • करण-वणिज – 17:31:01 पर्यंत, विष्टि – 29:08:40 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-परिघ – 16:43:58 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:42
  • सूर्यास्त- 18:49
  • चन्द्र-राशि-धनु – 10:25:52 पर्यंत
  • चंद्रोदय- 27:30:59
  • चंद्रास्त- 13:46:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • World Tuberculosis Day जागतिक क्षयरोग दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1836: कॅनडाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.
  • 1855 : आग्रा आणि कलकत्ता शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
  • 1883 : शिकागो आणि न्यूयॉर्क यांच्यात पहिले दूरध्वनी संभाषण झाले.
  • 1896 : ए.एस. पोपोव्हने इतिहासात प्रथमच रेडिओ सिग्नल प्रसारित केला.
  • 1923 : ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
  • 1929 : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.
  • 1962 : जागतिक क्षय रोग दिन
  • 1977 : मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.
  • 1993: धूमकेतू शूमाकर-लेव्ही-9 चा शोध लागला. हा धूमकेतू जुलै महिन्यात गुरू ग्रहावर आदळला होता.
  • 1998 : टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी 11 ऑस्कर पुरस्कार मिळाले.
  • 2008: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले आणि प्रथमच निवडणुका झाल्या.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1775 : ‘मुथुस्वामी दीक्षीतार’ – तामिळ कवी व संगीतकार यांचा जन्म.
  • 1901 : ‘अनब्लॉक आय्व्रेक्स’ – अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते यांचा जन्म.
  • 1951 : ‘टॉमी हिल्फिगर’ – अमेरिकन फॅशन डिझायनर यांचा जन्म.
  • 1984 : ‘एड्रियन डिसूझा’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
  • 1979 : ‘इमरान हाशमी’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्मदिन.
  • 1984 : ‘एड्रियन डिसूझा’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1603 : ‘एलिझाबेथ पहिली’ – इंग्लंडची व आयर्लंडची राणी
  • 1849 : ‘योहान वुल्फगँग डोबेरायनर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 डिसेंबर 1780)
  • 1882 : ‘एच. डब्ल्यू. लाँगफेलो’ – अमेरिकन नाटककार व कवी यांचे निधन. (जन्म: 27 फेब्रुवारी 1807)
  • 1905 : ‘ज्यूल्स व्हर्न’ – फ्रेन्च लेखक यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1828)
  • 2007 : ‘श्रीपाद नारायण पेंडसे’ – मराठी कथालेखक व कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1913)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर “धर्मवीर आनंद दिघे विशेष एक्सप्रेस” चालविण्यात यावी

   Follow us on        

ठाणे: कोकण रेल्वे मार्गावर गणेशोस्तव २०२५ साठी ठाणे ते सावंतवाडी दरम्यान “धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस” गाडी सेवा सुरू करण्यासंबंधीचे निवेदन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे यांच्यावतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काल दिनांक २२ मार्च रोजी सुपूर्त केले.

मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचे स्थानक गणले जाते. त्यातच ठाणे येथील सर्वेसर्वा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे ठाणे, हे ठाणे वासियांसाठी श्रद्धास्थान आहे. आणि ठाणे स्थानकातून कोकण रेल्वे मार्गावर जाणारे-येणारे कोकणवासी यांचे प्रवासी स्थानक ही आहे. दैनंदिन कोकणवासीय, कोकण प्रवासी या स्थानकातून कोकणात मोठ्या संख्येने प्रवास करीत असतात. गाड्यांची संख्या मुबलक प्रमाणात असली तरी प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महोदय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे कार्य ठाणे शहरास नवीन नाही. आपले सर्वतोपरी योगदान आणि समाजकार्यात मोठ्या प्रमाणात समाजसेवा घडवीत ठाण्यातील जनतेत आपले अढळ स्थान ठामपणे प्रखरतेने उमटवले होते ना आहेच ते न मिटण्यासारखे आहे. अशा थोर समाज सेवकास खरी आदरांजली देण्याकरिता गेली सतत तीन (३) वर्षे करीत असलेली मागणी ठाण्यातील लहानातल्या लहान संघटनेपासून राज्य पातळीवरील संघटना, कोकणवासिय, कोकण रेल्वे प्रवासी यांच्या जोरदार आणि प्रचंड मागणीनूसार कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ रजि ठाणे संघटना आपणांकडे सदर विषयांतर्गत निवेदन सादर करीत या वर्षांतरी कोकण वासियांना “धर्मवीर आनंद दिघे” एक्सप्रेस गाडी चा लाभ घेता येईल हीच अपेक्षा आहे. अशा आशयाचे निवेदन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि)प्रमुख सल्लागार राजू कांबळे, अध्यक्ष सुजित लोंढे, सहसचिव अजिंक्य नार्वेकर, सल्लागार निलेश चव्हाण आणि संपर्कप्रमुख प्रमोद घाग, नामदेव चव्हाण सभासद साहिल सकपाळ हनुमंत निकम उपस्थित होते

यापूर्वीही कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि)यांच्या वतीने खासदार नरेश मस्के, खासदार संजीव नाईक, मा. खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर यांना भेटून या मागणी संबधी निवेदने देण्यात आली आहेत. यावर्षी या मागणीचा विचार करण्यात येवून “धर्मवीर आनंद दिघे” एक्सप्रेस यावर्षीच्या गणेशोत्सवात धावेल अशी आशा संघटनेने व्यक्त केली आहे.

 

Loading

Konkan Railway: मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसवर कन्नडीगांचा डोळा

   Follow us on        
Mumbai Goa Vande Bharat Express:
मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस पुढे मंगुळुरूपर्यंत विस्तारित करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावत असलेली मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आणि मडगाव मंगुळुरु एक्सप्रेस या दोन्ही गाड्या एकत्र करून  मुंबई – मंगुळुरु अशी अखंड वंदे भारत एक्सप्रेस चालविण्याबाबत रेल्वे प्रशासन योजना आखत असल्याचे वृत्त मातृभूमी या आघाडीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.  कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्नशील आहेत.
मुंबई मंगुळुरु वंदे भारत अशी अखंड वंदे भारत सेवा सुरु झाल्यास हे अंतर १२ तासांत कापता येईल आणि कर्नाटक कोस्टल भागातील प्रवाशांना एक जलद वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. सध्या कोकण रेल्वे मार्गावरील दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसचा एकत्रित विचार करता त्या सरासरी ७० टक्के क्षमतेने धावत आहेत. मात्र मुंबई मंगुळुरु वंदे भारत अशी अखंड वंदे भारत सेवा सुरु झाल्यास हाच रेट १००% होईल असा युक्तिवाद करून ही मागणी करण्यात येत आहे.
सध्या मंगळुरू-गोवा वंदे भारत हा सर्वात कमी गर्दीच्या मार्गांपैकी एक आहे, ज्यामध्ये प्रवाशांची संख्या ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे. यावर उपाय म्हणून, रेल्वेने सुरुवातीला कोझिकोडपर्यंत सेवा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तथापि, कर्नाटकातील राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे ही योजना रद्द करण्यात आली. मुंबई-गोवा वंदे भारतचा प्रवास दर (Occupancy Rate)सुमारे ९० टक्के होता, परंतु त्यानंतर तो सुमारे ७० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. रेल्वेचा असा विश्वास आहे की मुंबई-गोवा आणि मंगळुरू-गोवा सेवा एकाच मुंबई-मंगळुरू मार्गात विलीन केल्याने पूर्ण प्रवासी क्षमता साध्य होण्यास मदत होईल.
सध्या, मुंबई-गोवा वंदे भारत सकाळी ५:२५ वाजता मुंबईहून निघते आणि दुपारी १:१० वाजता गोव्यात पोहोचते. प्रस्तावित वेळापत्रकानुसार, ती नंतर मंगळुरूला पोहोचेल तिथे संध्याकाळी ६:०० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे, मंगळुरू-गोवा वंदे भारत सकाळी ८:३० वाजता मंगळुरूहून निघते आणि दुपारी १:१० वाजता गोव्यात पोहोचेल. जर ट्रेन मुंबईकडे निघाली तर ती रात्री ९:०० वाजता पोहोचेल अशी अपेक्षा आहे. तथापि, या वेळी मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दीमुळे आव्हान निर्माण होऊ शकते. कारण याच वेळी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या याच  वेळी मुंबईला येतात. मध्य रेल्वेने मुंबई-मंगळुरू वंदे भारत वेळापत्रकात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सूचित केले आहे.
वरील वृत्त मातृभूमी या आघाडीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. महाराष्ट्रातील कोकण रेल्वे  प्रवासी संघटनांनी याला विरोध केला आहे. . मुंबई-गोवा वंदे भारतचा प्रवास दर (Occupancy Rate) सुमारे ७० टक्क्यांपर्यंत आला असल्याची बातमी खोटी असून सध्या तो ९०% च्या वर आहे.  सध्याची मुंबई  गोवा वंदे भारत एक्सप्रेस तशीच ठेवून मुंबई ते मंगुळुरु दरम्यान स्लीपर वंदे भारत चालू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील कोकण रेल्वे  प्रवासी संघटनांनी केली आहे.

मुंबई गोवा मार्ग पुढील ६ महिन्यात पूर्ण होणार; प्रकल्पाचा खर्च १९,४६९ कोटी रुपयांपर्यंत वाढणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

   Follow us on        
Mumbai Goa Highway:
संपूर्ण गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग-६६ चे चौपदरीकरण पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या मार्गाचे जवळजवळ ४६३ किमी लांबीचे काम आधीच पूर्ण झाले आहे, त्यामुळे संबंधित राज्य सरकारांशी झालेल्या चर्चेनंतर प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रलंबित समस्या सोडवण्यात आल्या आहेत.
मुंबई आणि गोवादरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे हे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे या प्रदेशातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल. तथापि, विविध समायोजन आणि व्याप्ती बदलांमुळे संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १९,४६९ कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे वाहतूक कार्यक्षमता सुधारेल, आर्थिक फायदे मिळतील आणि गोवा आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एकूण प्रवास अनुभव वाढेल अशी अपेक्षा आहे असे ते पुढे म्हणालेत.

मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु

   Follow us on        
सिंधुदुर्ग:
गेले काही महिने चिपी विमानतळ मुंबई ते सिंधुदुर्ग बंद असेलेली विमानसेवा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. अलीकडेच खा. नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची यांची भेट घेतली. मंत्री के.राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल असे खा. नारायण राणे यांना आश्वासीत केले आहे.
Recently, MP Narayan Rane met with Civil Aviation Minister K. Ram Mohan Naidu and Minister of State for Civil Aviation Muralidhar Mohol. Minister K. Ram Mohan Naidu assured MP Narayan Rane that the Mumbai-Singhudurg airline service will be restarted very soon.
अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्गा-मुंबई दरम्यान उड्डाणे सुरू केली होती. आरसीएस चा कालावधी ३ वर्षांचा होता, जो ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला. उड्डाण सेवा थांबवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे. मुंबई ते चिपी सेवा कार्यान्वित असताना पर्यटकांना, जिल्हावासीयांना मोठा लाभ होत होता. स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारि उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गासाठी आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गासाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी. अशी भुमिका खा. राणे यांनी स्पष्ट केली. ही सेवा पुनः मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सेवा सुरु करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे यासाठी खा. नारायण राणे आग्रही आहेत.

धक्कादायक! राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गाच्या दिशादर्शक फलकांवरील गावांची नावे चक्क हिंदीत.

   Follow us on        
महाराष्ट्र:-
मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र राज्यात मराठीचे महत्व कमी करून त्याजागी हिंदीचा वापर होत असल्याने मराठी भाषिक जनता दुखावली जात आहे. असाच एक प्रकार नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर घडला आहे.
या महामार्गाच्या फलकावरची नावे चक्क हिंदीत छापण्यात आली आहेत. उदाहरणार्थ जंबारगांवच्या जागी जंबारगाँव, करंजगावच्या जागी करंजगाँव तर हडस पिंपळगांवच्या जागी  हडस पिंपलगाँव अशा नावाचे फलक लावण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे समृद्धी महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत न येत तो राज्य सरकारच्या अखत्यारीत येत आहे. असे असूनही इथे मराठी भाषा डावलली जात असल्याने मराठी भाषिक जनता दुखावली गेली आहे. या महामार्गावरील सर्व फलकांवरची  नावे ताबडतोब मराठीमध्ये करण्यात यावीत अशी मागणी करण्यात येत आहे.

Konkan Railway Disruption: मुंबईहून कोकणात जाणार्‍या दोन गाड्या उशिरा सुटणार

   Follow us on        

Konkan Railway 07:45 PM:

कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली स्थानका जवळ ओव्हरहेड सपोर्ट वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. परिणामी (पेअरींग गाड्या उशिराने धावत असल्याने) मुंबईहून गोव्यासाठी सुटणार्‍या दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक २२ मार्च रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस २३ मार्च रोजी पहाटे ४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.

एलटीटी मुंबई या स्थानकावरून दिनांक २३ मार्च रोजी ००:४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक ११०९९ एलटीटी मडगाव एक्सप्रेस ही गाडी २३ मार्च रोजी सकाळी ०४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.


Konkan Railway 06:15 PM:

कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली जवळ ओव्हरहेड वायरला सपोर्ट करणारी वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ बंद झाली होती. वायर तुटल्याने मंगला एक्स्प्रेस व मांडवी व अन्य काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या.

आता ही वायर जोडण्यात आली असून रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. तरी देखील त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला असून कोकण रेल्वेच्या गाड्या अजूनही सुमारे दोन ते तीन उशिराने धावत आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सध्याची स्थिती.. (06:15 pm) 

सीएसएमटी मडगाव मांडवी एक्सप्रेस वैभववाडी स्थानकावर पोहोचली असून ती सुमारे ४ तास उशिराने धावत आहे तर मडगाव सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस आडवली स्थानकावरून नुकतीच निघाली असून ती सुमारे चार तास उशिराने धावत आहे. दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आताच आडवली स्थानकावर आली असून ती सुमारे साडेतीन तास उशिराने धावत आहे. मडगाव एलटीटी सिंधुदुर्ग स्थानकावर असून ती तीन तास उशिराने धावत आहे.

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि अन्य मागण्यांसाठी खासदार रविंद्र वायकर यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत भेट

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे तसेच महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार वायकर यांनी काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची लोकसभेतील त्यांच्या दालनात भेट घेतली. रेल्वेशी निगडीत विविध विषयांचे त्यांना निवेदन दिले. यात जोगेश्वरी येथे नव्याने टर्मिनल बनवण्यात येत आहे, या टर्मिनलला हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टीमोडेल कनेक्टीविटीने जोडण्यात यावे. येथे पार्किंग, हॉटेल्स तसेच मॉल्सची सुविधा करण्यात यावी.

कोकण रेल्वेच्या दुपदरी कामासाठी बैठक घेण्यात येईल असे आश्वासन बजेट मध्ये देण्यात आले होते. पण हो बैठक अद्याप घेण्यात आली नसल्याकडे लक्ष वेधत कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे (३७० किलो मीटर) काम सुरु करण्यात यावे. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले तरी गोवा व महाराष्ट्र सरकारने भारतीय रेल्वे मध्ये विलीनिकरणास तयारी दर्शवली आहे अशी माहिती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांनी दिली.

माननीय मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात मांडलेल्या काही महत्त्वाच्या समस्या : 

  • जोगेश्वरीला जंक्शन हे हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीने जोडलेले असावे. तसेच तिथे कार पार्किंग, हॉटेल, मॉल आदी सुविधा उपलब्ध असाव्या .
  • रेल्वे स्थानकांवरील, विशेषतः कल्याणच्या पुढच्या स्थानकांच्या, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. दुर्गंधी, पाण्याचा अभाव, स्तनपान कक्षांची अनुपलब्धता इत्यादी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
  • मराठी भाषेला आता राजभाषेचा दर्जा मिळाला असल्याने महाराष्ट्रात सर्वच कारभारात, विशेषतः रेल्वेच्या कारभारात मराठी भाषा अनिवार्य असावी.
  • एसी लोकलची फ्रिक्वेन्सी किंवा एसी गाड्यांची संख्या वाढवण्यात याव्या
  • उपनगरीय रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डबा असूनही कित्येकदा इतर नागरिक त्या डब्यात प्रवास करत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना उभे राहून प्रवास करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या या गैरसोयींवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

कोकण रेल्वे

  • प्रवाशांची वाढती गर्दी आणि कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक यामुळे होणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून कोकण रेल्वे डबल ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करून हा प्रकल्प पुढे नेण्यात यावा.
  • अनेक स्थानकांची स्वच्छता अत्यंत निकृष्ट आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांची स्थितीही समाधानकारक नाही. आजही अनेक स्थानकांवर छत नसल्याने प्रवाशांना नाहक ऊन, पावसाचा सामना करावा लागत आहे.
  • कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर सोलर पॅनल बसवावेत.
  • कोकण रेल्वे मार्गावरील सर्व जुने बोगदे व पुलांचे सर्वेक्षण करून वेळोवेळी आवश्यकतेनुसार दुरुस्तीचे काम करण्यात यावे.
  • मालगाड्यांचे वेळापत्रक अशा प्रकारे ठरवावे की त्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात अडथळा येणार नाही.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search