Author Archives: Kokanai Digital

मुंबईचा चाकरमानी ‘वेटिंग’वरच! महापालिका निवडणुकीत कोकण रेल्वेच्या अन्यायाचा हिशोब होणार?

”आम्ही मुंबई घडवली, पण गावी जाताना आम्हालाच वाली कोणी नाही. निवडणुकीत मत मागण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना आता आम्ही जाब विचारणार आहोत.” – एक चाकरमानी

   Follow us on        

मुंबई/रत्नागिरी: गणपती असो वा होळी, कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या तिकिटांसाठी मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्याची होणारी ओढाताण काही नवीन नाही. मात्र, आता हा प्रश्न केवळ प्रवासापुरता मर्यादित न राहता राजकीय वळण घेताना दिसत आहे. “स्वतःच्या हक्काच्या मातीत आणि हक्काच्या रेल्वेत जागा का नाही?” असा संतप्त सवाल आता चाकरमानी विचारू लागला आहे.

जनावरांसारखा प्रवास आणि प्रशासकीय अनास्था

दरवर्षी सणासुदीला कोकण रेल्वेची तिकिटे काही सेकंदात ‘हाऊसफुल्ल’ होतात. परिणामी, हजारो चाकरमान्यांना आपल्या बायका-मुलांसह जनरल डब्यात अक्षरशः कोंबून, जनावरांसारखा प्रवास करावा लागतो. आरक्षित तिकीट न मिळाल्याने आणि खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडल्याने, रेल्वेचा हा ‘कष्टप्रद’ प्रवास चाकरमान्यांच्या पाचवीलाच पुजला आहे.

या निवडणुकीत ‘कोकण कार्ड’ चालणार?

मुंबईत कोकणी मतदारांचा टक्का मोठा असून अनेक प्रभागांमध्ये ते किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. आतापर्यंत केवळ ‘भावी नगरसेवक’ म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांना चाकरमान्यांच्या या डोळ्यातील पाण्याची जाणीव होणार का?

जो आमच्या प्रवासाची सोय करेल, त्यालाच आमचे मत,” अशी भूमिका अनेक चाकरमानी संघटनांनी घेतल्याचे समजते. मात्र हीच भावना सर्वच चाकरमान्यांचा मनात रुजणे गरजेचे आहे.

प्रमुख प्रश्न जे आजही अनुत्तरित आहेत:

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण संथ गतीने का सुरू आहे?

सणासुदीला जाहीर होणाऱ्या स्पेशल गाड्यांचे नियोजन ऐनवेळी का केले जाते?

कोकणकरांना त्यांचे हक्काचे टर्मिनस कधी भेटणार?

दक्षिणेकडील राज्यात जाणार्‍या गाड्यांत खूपच कमी कोटा उपलब्ध होत आहे. कोकणात टर्मिनस नसल्याने कोकणातील जनतेच्या हक्काच्या गाड्या मिळत नाहीत. त्यामुळे अजूनही त्यांना कोकणातील आपल्या गावी जाताना खूप हालअपेष्टा सहन करून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे टर्मिनस होणे ही तमाम कोकण करांची ईच्छा आहे.

सावंतवाडी टर्मिनसचे अस्तित्व नाकारणाऱ्या झा यांचा धिक्कार! टर्मिनससाठी कोकण रेल्वे संस्थापकीय सदस्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

मराठी माणसाला आणि नेत्यांना याची चीड का येत नाही?”

   Follow us on        

बेलापूर/सावंतवाडी: कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) संतोष कुमार झा यांनी सावंतवाडी टर्मिनसच्या अस्तित्वाबाबत दिलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः कोकणात संतापाची लाट उसळली आहे. “सावंतवाडी टर्मिनस अस्तित्वातच नाही,” असे विधान करून झा यांनी केवळ कोकणवासीयांचाच नव्हे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याचा आरोप होत आहे.

नेमका वाद काय?
नुकत्याच एका मुलाखतीत संतोष कुमार झा यांनी सावंतवाडी टर्मिनसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या टर्मिनसचे उद्घाटन स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, त्याबद्दल असे विधान करणे हा राजकीय नेतृत्वाचा आणि कोकण रेल्वेसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे बोलले जात आहे.

या संदर्भात संताप व्यक्त करताना कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री सुरेंद्र नेमळेकर म्हणाले की, “ज्या कोकण रेल्वेसाठी महाराष्ट्राने जमिनी दिल्या, ज्यांच्या पैशावर ही रेल्वे उभी राहिली, तिथेच परप्रांतीय अधिकारी येऊन महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. मराठी माणसाला आणि नेत्यांना याची चीड का येत नाही?”

प्रमुख मागण्या आणि आरोपांचे स्वरूप:
अधिकारी शाहीचा उद्धटपणा: परप्रांतीय अधिकारी महाराष्ट्रात येऊन येथील प्रकल्पांना नाकारत आहेत, हा महाराष्ट्राच्या विद्वत्तेचा आणि अस्मितेचा अपमान आहे.

नोकरभरतीत अन्याय: कोकण रेल्वेमध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांची भरती केली जात असून महाराष्ट्राला गाड्यांच्या बाबतीतही सापत्न वागणूक मिळत आहे.

सावंतवाडी टर्मिनसचे नामकरण: दिवंगत मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सावंतवाडी टर्मिनसचे नाव ‘मधु दंडवते टर्मिनस’ करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी.

२६ जानेवारीला आमरण उपोषणाचे हत्यार
संतोष कुमार झा यांच्या विधानाचा निषेध म्हणून आणि सावंतवाडी टर्मिनसच्या मागणीसाठी श्री नेमळेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

“जर २१ जानेवारी २०२६ पर्यंत सावंतवाडी टर्मिनसचे काम प्रत्यक्ष सुरू झाले नाही, तर २६ जानेवारीला बेलापूर येथील कोकण रेल्वे भवनासमोर मी आमरण उपोषणाला बसणार आहे.”

ज्येष्ठ नागरिक आणि मधु दंडवते यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांनी सर्व राजकीय पक्ष, प्रवासी संघटना आणि मराठी माणसाला या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “मंत्र्यांना झोपायचे असेल तर झोपू द्या, पण एक नागरिक म्हणून अन्यायाविरुद्ध एकत्र या,” अशी साद यावेळी घालण्यात आली आहे.

सोशल मीडियावर मोहिमेचे आवाहन
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी हा संदेश जास्तीत जास्त व्हायरल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून उपोषणाची वेळ येण्यापूर्वीच सरकार आणि रेल्वे प्रशासन खडबडून जागे होईल.

वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना चाखता येणार स्थानिक खाद्यपदार्थ

   Follow us on        

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रदेश-विशेष स्थानिक खाद्यपदार्थ (Regional Cuisine) सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांचा अनुभव अधिक समृद्ध करणे, ज्या भागातून रेल्वे प्रवास करते तिथली सांस्कृतिक ओळख आणि पाककृतींमधील विविधता दर्शवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. रेल्वेतील ऑन-बोर्ड सेवा सुधारण्यासाठी आणि स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना टप्प्याटप्प्याने सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांपर्यंत वाढवली जाईल.

आयआरसीटीसी (IRCTC) तिकीट प्रणालीतील सुधारणा:

रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसी (IRCTC) तिकीट प्लॅटफॉर्मवरील सेवांच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. कठोर ओळख पडताळणी आणि प्रगत तपास यंत्रणा लागू केल्यामुळे बनावट युजर खात्यांवर मोठी कारवाई करण्यात यश आले असून, आतापर्यंत ३.०३ कोटी बनावट खाती निष्क्रिय करण्यात आली आहेत. या सुधारणांमुळे दररोज तयार होणाऱ्या नवीन युजर आयडीची संख्या एक लाखावरून सुमारे ५,००० पर्यंत खाली आली आहे, ज्यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणे अपेक्षित आहे.

आरोंदा भटपावणी येथे दोन बच्छड्यांसह पट्टेरी वाघाचे दर्शन

   Follow us on        

सावंतवाडी: आरोंदा भटपावणी येथे शनिवारी रात्री १०.३० वाजता दुचाकीने घरी जाताना येथील युवकाला अगदी जवळून दोन बच्छड्यांसह वाघाचे दर्शन झाले. आरोंदा रेडी मुख्य रस्त्या जवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळे नजीक सदर वाघ रस्ता ओलांडत असल्याचे निदर्शनास आले.

भटपावणी येथील साईल विद्याधर नाईक व तुषार नाईक दुचाकीने रात्री साडेदहा वाजता घरी जात असताना दोन बच्चड्यांसोबत वाघ रस्ता पार करत असताना समोर आला.

दुचाकी गाडीची लाईट तोंडावर पडताक्षणी वाघाने डरकाळी फोडून दुचाकीच्या दिशेन धावत आला व मोठी डरकाळी फोडली.

सदर दुचाकीस्वार भयभीत होऊन त्यांनी गाडी जोरात चालवून तिथून पळ काढला.सदर वाघ भटपावणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दिशेन डोंगरात गेल्याचे साईल नाईक यांनी सांगितले.

अंगावर आल्याने छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला नसल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेबाबत आरोंदा उपसरपंच गोविंद केरकर यांनी दुजोरा दिला.

दरम्यान, सदर डोंगर परिसरात प्राथमिक शाळा आहे. याठिकाणी वाघाचाnसंचार असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागातील पाळीव प्राणी ,कुत्र्यांनाही वाघाने लक्ष केल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितले.त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.तरी वन विभागाने याची दखल घेऊन बंदोबस्त करण्याची नागरिकांतून मागणी केली जात आहे.

संगमेश्वर तालुक्यातील युवा नेतृत्व, ‘रेल्वे मॅन’ पत्रकार संदेश सुरेश जिमन यांना “कोकण रत्न” पुरस्कार प्राप्त

   Follow us on        

रुपेश मनोहर कदम / सायले: स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या वतीने सातत्यपूर्ण सामाजिक कार्यासाठी संगमेश्वरचे ‘रेल्वे मॅन’ म्हणून ओळखले जाणारे पत्रकार संदेश सुरेश जिमन यांना “कोकण रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, या सन्मानामुळे संगमेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई येथील मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा संस्थापक अध्यक्ष श्री. संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार व संपादक श्री. सचिन कळझुनकर उपस्थित होते. याशिवाय विविध क्षेत्रांतील मान्यवर व अन्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींनीही उपस्थिती लावली.

या पुरस्कारामुळे संगमेश्वर तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून, पत्रकार संदेश जिमन यांच्या कार्याचा हा गौरव सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरत आहे. प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असतो; मात्र काही व्यक्ती चाकोरीबद्ध आयुष्याला छेद देत समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतात. संदेश जिमन यांचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या निस्वार्थ कार्याची पावती असून, तरुण पिढीसाठी तो निश्चितच प्रेरणादायी क्षण ठरतो.

वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय घोगळे कोकणरत्न पदवीने सन्मानित

   Follow us on        

मुंबई: वेंगुर्ल्याचे सुपुत्र लेखक, व्यंगचित्रकार तसेच अप्पर कोषागार अधिकारी श्री. संजय गोविंद घोगळे यांना ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्री. सचिन कळसुळकर यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे कोकणरत्न पदवी प्रदान करून सत्कार करण्यात आला.

​श्री घोगळे यांनी मुंबई तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून गौरवस्पद कामगीरी केली असून यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांचे दोन वेळा प्रशासकीय कामामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आलेले आहे.

​व्यंगचित्रकार म्हणून त्यांची दखल अमेरिकन वेबसाईटवर सुद्धा घेण्यात आली असून लेखक म्हणूनही त्यांची ख्याती आहे.

​या पुरस्कार सोहळ्याला स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक श्री संजय कोकरे, मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, राजेंद्र सुर्वे, दिलीप लाड, सुभाष राणे हे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

​कोकणरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री घोगळे यांचे सर्व स्तराववरून अभिनंदन होत आहे.

Kokanai Exclusive: मुंबई पोलिसांकडून बेपत्ता मुलांविषयीच्या अफवांवर स्पष्टीकरण

९८% अल्पवयीन मुलांचे यशस्वी पुनर्मिलन

   Follow us on        

मुंबई: सोशल मीडियावर मुंबईतून मुले बेपत्ता होत असल्याच्या कथित घटनांविषयी दिशाभूल करणारे संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असताना, मुंबई पोलिसांनी आज एक निवेदन जारी करून या संदेशांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, बेपत्ता मुलांच्या प्रकरणांवर पोलीस किती गांभीर्याने आणि सहानुभूतीने कारवाई करतात, यावरही त्यांनी भर दिला आहे.

​अफवांवर विश्वास ठेवू नका!

​मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, बेपत्ता मुलांविषयी सोशल मीडियावर फिरणारे संदेश खऱ्या तथ्यांवर आधारित नाहीत. मुंबई पोलीस प्रत्येक बेपत्ता मुलाच्या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने हाताळते.

​अपहरण म्हणून नोंदणी बंधनकारक

​सर्वोच्च न्यायालयाच्या ‘बचपन बचाओ आंदोलन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया’ या महत्त्वपूर्ण निकालानुसार, १८ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता प्रकरणांची नोंद थेट ‘अपहरण’ (Kidnapping) म्हणून केली जाते. यामुळे या प्रकरणांची तत्काळ दखल घेतली जाते.

​९८% अल्पवयीन मुलांचे पुनर्मिलन

​पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत बेपत्ता झालेल्या ९८% अल्पवयीन मुलांना यशस्वीरित्या त्यांच्या कुटुंबाशी एकत्र आणले गेले आहे. ही आकडेवारी पोलिसांच्या अथक प्रयत्नांची साक्ष देते.

​उत्कृष्ट कामगिरीचे उदाहरण:

सहा महिन्यांपूर्वी मुंबईतून बेपत्ता झालेल्या एका चार वर्षांच्या मुलीला एमआरए मार्ग पोलीस स्टेशनच्या पथकाने नुकतेच वाराणसीतून सुखरूप शोधून तिच्या कुटुंबीयांना सुपूर्द केले आहे. पोलिसांचे प्रयत्न अखंडपणे सुरू असून, शोध लागेपर्यंत तपास थांबत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

​विशेष पथके कार्यरत

​बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी आणि त्वरित कारवाई सुनिश्चित करण्यासाठी गुन्हे शाखा (Crime Branch), स्थानिक युनिट्स (Local Units) आणि विशेष कक्ष (Special Cells) यासह अनेक विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

​नागरिकांना विनंती

​पोलीस आयुक्त कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा ती पुढे पसरवू नये. नागरिकांनी केवळ अधिकृत पोलीस स्रोतांवर विश्वास ठेवून पोलिसांच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.

Mumbai Local: स्वयंचलित दरवाजांच्या दोन नॉन-एसी लोकल लवकरच मध्य रेल्वेच्या ताफ्यात

   Follow us on        

मुंबई: उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कचे आधुनिकीकरण करण्यासाठी मोठी योजना आखण्यात आली आहे. यानुसार, स्वयंचलित दरवाजे (Automatic Door Closure System) असलेले दोन नॉन-एसी लोकल ट्रेनचे रॅक (Wagons) कारखान्यात बांधणीच्या (Manufacturing) प्रक्रियेत आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.

​मुंबई लोकलमध्ये होणारी गर्दी आणि प्रवासात होणारे अपघात टाळण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. ​लोकल ट्रेनमध्ये गर्दीमुळे होणारे अपघात आणि प्रवासादरम्यान डब्याच्या दरवाज्यातून खाली पडण्याचे प्रकार यामुळे थांबतील.

​या नवीन रॅकमध्ये स्वयंचलित दरवाजे, डिजिटल डिस्प्ले युनिट आणि दरवाजे बंद असताना व्हिज्युअली (दृश्यात्मक) आणि ऑडिओ (श्राव्य) इशारा देणारी प्रणाली (इंटरकनेक्टेड प्रणाली) असेल.

​रेल्वेने काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेसाठी कार्यान्वित झालेल्या एका लोकल रॅकचे ‘ऑटोमॅटिक डोअर’ लावून चाचणी (Automatic Door Trial) घेतलेली आहे.

​तसेच, पुढील पाच वर्षांत मुंबईसाठी मोठ्या प्रमाणात नव्या एसी लोकल खरेदी करण्याची योजना आहे.

​या नवीन सुधारणांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल, अशी अपेक्षा रेल्वेने व्यक्त केली आहे.

तब्बल २७ बोगदे असलेल्या कोकण रेल्वेसारख्या अजून एका रेल्वेमार्गाला गती मिळणार

   Follow us on        

Sindhudurg: तब्बल 28 कि.मी. लांबीचे एकूण 27 बोगदे आणि रस्त्यावरील 55 उड्डाणपूल असणाऱ्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करा, असे आदेश गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून होणार्‍या या मार्गासाठी राज्य सरकारच्या हिश्श्याची तरतूद करा, असेही आदेश त्यांनी दिले. या निर्णयामुळे पावणेदहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या मार्गाला अखेर चालना मिळाली आहे.

निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा मार्ग आहे. सर्वात मोठा बोगदा 3.96 कि.मी. लांबीचा आहे. 2 कि.मी.पेक्षा जादा लांबीचे 3, तर त्यापेक्षा कमी लांबीचे 24 बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील 55 उड्डाणपूल, रस्त्याखालील 68 पूल असतील. यासह छोटे पूल 74, तर मोठे पूल 55 असतील. या मार्गावर एकूण 10 स्थानकेही प्रस्तावित केली आहेत.

विधानभवनातील मंत्री परिषदेच्या सभागृहात बंदरे विकास विभागाची आढावा बैठक झाली, या बैठकीत कोकणातील जयगड, आंग्रे, रेडी व विजयदुर्ग या बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाची गरज आहे, असे सांगत फडणवीस म्हणाले, हा रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून उभारला जाणार आहे. याकरिता या मार्गासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाची तरतूदही करा, असेही आदेश त्यांनी दिले. बैठकीस मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आदींसह अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या निर्णयाची माहिती मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. हा निर्णय केवळ कोकणासाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे विकासाची असंख्य दालने उघडणार आहेत. प्रामुख्याने कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या वाहतुकीला चालना मिळेल. पर्यटनात वाढ, पूर आणि भूस्खलनाच्या काळात दळणवळणाची पर्यायी सुविधा म्हणून हा मार्ग उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

27 बोगदे, 55 उड्डाणपूल

या मार्गावर 28 कि.मी. लांबीचे एकूण 27 बोगदे असतील. यासह रस्त्यावरील 55 उड्डाणपूल आहेत. निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा मार्ग आहे. सर्वात मोठा बोगदा 3.96 कि.मी. लांबीचा आहे. 2 कि.मी.पेक्षा जादा लांबीचे 3, तर त्यापेक्षा कमी लांबीचे 24 बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील 55 उड्डाणपूल, रस्त्याखालील 68 पूल असतील. यासह छोटे पूल 74, तर मोठे पूल 55 असतील. या मार्गावर एकूण 10 स्थानकेही प्रस्तावित केली आहेत.

Christmas Special: कोकण रेल्वे मार्गावर अजून एका गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेशी समन्वय साधून खालील विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत:

​गाडी क्र. ०८२४१ / ०८२४२ बिलासपूर – मडगाव जं. – बिलासपूर एक्स्प्रेस स्पेशल

​गाडी क्र. ०८२४१ बिलासपूर – मडगाव जं. एक्स्प्रेस स्पेशल

​प्रस्थान: बिलासपूर येथून दर शनिवारी दुपारी १४:४५ वाजता.

​प्रवासाच्या तारखा: २० आणि २७ डिसेंबर २०२५, तसेच ०३ आणि १० जानेवारी २०२६.

​पोहोचणार: मडगाव जंक्शन येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ०२:१५ वाजता.

​गाडी क्र. ०८२४२ मडगाव जं. – बिलासपूर एक्स्प्रेस स्पेशल

​प्रस्थान: मडगाव जंक्शन येथून दर सोमवारी पहाटे ०५:३० वाजता.

​प्रवासाच्या तारखा: २२ आणि २९ डिसेंबर २०२५, तसेच ०५ आणि १२ जानेवारी २०२६.

​पोहोचणार: बिलासपूर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी १६:०० वाजता.

थांबे (महाराष्ट्र आणि कोकण भागातील महत्त्वाचे):

​गाडी क्र. ०८२४१ आणि ०८२४२ चे महत्त्वाचे थांबे खालीलप्रमाणे आहेत:

​०८२४१ (बिलासपूर – मडगाव): नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी स्थानके.

​०८२४२ (मडगाव – बिलासपूर): वरील सर्व स्थानके आणि इगतपुरी स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल.

​डब्यांची रचना (Composition):

​एकूण १८ LHB डब्बे:

​एसी २ टायर: ०१

​एसी ३ टायर: ०८

​एसी ३ टायर इकोनॉमी: ०२

​स्लीपर: ०२

​जनरल: ०३

​SLR/D: ०१

​जनरेटर कार: ०१

​तिकिट आरक्षण:

​गाडी क्र. ०८२४२ साठीचे आरक्षण १४/१२/२०२५ रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search