रत्नागिरी : कोकण रेल्वे महामंडळाच्या वतीने ३३ वा स्थापना दिवस वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात साजरा करण्यात आला. स्थापना दिवसासह राष्ट्राला समर्पित असलेल्या अविरत सेवेची २५ वर्षे देखील कोकण रेल्वेने पूर्ण करून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने कोकण रेल्वे व्यवस्थापनाच्या २५ वर्षांच्या अखंडीत सेवापूर्ती निमित्त महामंडळातील अधिकारी- कर्मचारी यांचा विशेष सत्कार कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग (फायनान्स), संतोष कुमार झा (ऑपरेशन्स, कमर्शिअल ), आर. के.हेगडे (वे-वर्कस्) व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कोकण रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) गिरीश करंदीकर, कार्यकारी संचालक (प्रकल्प) एल. प्रकाश, डेप्युटी लेखा अधिकारी अरूप बागुई यांच्यासह विविधविभागातउल्लेखनीय काम केलेल्या विभागांना तसेच वैयक्तिक कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात उल्लेखनीय कामासाठी कोकण रेल्वे जनसंपर्क विभागाला देखील पुरस्कार देऊन सन्मानित भ करण्यात आले. सदर सोहळ्यास कोकण रेल्वेच्या सर्व विभागातील विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
संजय गुप्ता यांनी कोकण रेल्वेने गेल्या १२-१८ महिन्यांत मिळवलेल्या कामगिरीची माहिती खालीलप्रमाणे दिली
- आतापर्यंतचा सर्वाधिक प्रवासी महसूल – ₹962.43 कोटी
- आतापर्यंतचा सर्वाधिक मालवाहतूक महसूल – ₹736.47 कोटी
- आतापर्यंतचा सर्वाधिक प्रकल्प महसूल – ₹3274. 70 कोटी
- आतापर्यंतचा सर्वाधिक एकूण महसूल – ₹५१५२.२३ कोटी
- आतापर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा – ₹२७८.९३ कोटी
- रत्नागिरी येथे कोल्ड स्टोरेज आणि एकात्मिक पॅक हाऊसचे बांधकाम करण्यासाठी महाप्रीटसोबत करार करण्यात आला.
- मे 2023 मध्ये, BSNL सोबत एक करार करण्यात आला, ज्या अंतर्गत BSNL ने 31 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जी फायबर ऑप्टिक लाईनच्या नूतनीकरणासाठी राखून ठेवली जात आहे.
चिपळूण : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पहाटे चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देऊन, मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. पूल कोसळणं ही दुर्देवी घटना आहे. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही, हे फार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या श्री. गुप्ता, श्री. सिन्हा व श्री. मिश्रा या तिघाजणांच्या तज्ज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे काल कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी आज पहाटे केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, राजेश सावंत आदी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, काल झालेली घटना ही दुर्देवी आहे. दोन किलोमीटरचा हा पूल आहे. ही घटना कशामुळे झाली, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाची असणारी तिघा तज्ज्ञ लोकांची समिती याची तपासणी करुन, अहवाल देईल.
प्रवासात रात्री अचानक बस लेन सोडत असल्याचं जाणवलं. समोर जाऊन शैलेश यांनी बघितलं तर ड्रायव्हर चक्क हेडफोन लावून, मोबाईल समोर ठेऊन गाडी चालवत पिक्चर बघत होता.
रस्ता होता समृद्धी महामार्ग.
10-10 सेकंद मान खाली घालत होता. सांगूनही ऐकत नव्हता.नशीब सगळे वाचले.#मृत्यूचामहामार्ग pic.twitter.com/MxHS0dVjbn
— saurabh koratkar (@saurabhkoratkar) October 16, 2023
“मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासियांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा.”
मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला; दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ व्हायरल#kokanaiLiveNews #KonkanNews #mumbaigoahighway pic.twitter.com/HsVdV3jnty
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) October 16, 2023
राजापूर : राजापूर पोस्ट ऑफिस येथे ग्राहकांसाठी रेल्वे आरक्षण सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ रेल्वे प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे औचित्य साधून रेल्वे तिकीट आरक्षण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. राजापूर तालुक्यातील व इतर जवळच्या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिस येथे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी हेड ऑफिस, लांजा, संगमेश्वर या पोस्ट ऑफिसमध्ये भारतीय रेल्वे व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे तिकीट आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिसमार्फत मिळावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत होती. ही सेवा पोस्ट विभागाच्या पुढाकाराने सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.