Mumbai Goa Highway News: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहेया अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे,
ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येत असताना कार जोरदार धडकला. यात कारमधील लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला पाच पुरूषांचा समावेश आहे. माणगावपासून जवळच रेपोली इथं पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
गोरेगाव पोलीस तातडीने अपघात स्थळी दाखल झालेत. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदत कार्य सुरु केले आहे. या अपघातात जखमी झालेल्या मुलाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
Konkan Railway News 18/01/2022 :कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वे मध्यरेल्वेच्या साहाय्याने कोंकण रेल्वेमार्गावर मुंबई सीएसमटी ते मडगाव दरम्यान एक एकेरीमार्गी गाडी चालवणार आहे.
Train No. 01471 Mumbai CSMT – Madgaon Jn. Special
ही विशेष गाडी मुंबई सीएसमटी येथून शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल ती मडगाव जंक्शन येथे दिवशी दुपारी १२:१५ वाजता पोहोचेल.
पेण: २५ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई ठाणे ह्या शहरांतून पालीसाठी दहा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जादा गाड्यांसाठी प्रवाशांनी आजच आपले आरक्षण निश्चित करण्याचे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अष्टविनायकांपैकी एक स्थान असणाऱ्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी माघी गणेशोत्सवाला मोठी यात्रा भरत असते. त्यातच यंदा २५ जानेवारी रोजी हा उत्सव साजरा होत असल्याने दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने या यावर्षी दरवर्षी पेक्षा भक्तांची जास्त गर्दी अपेक्षित आहे. याचा विचार करून एसटी महामंडळाने दहा जादा गाड्या मुंबई-ठाणे ह्या शहरातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच दहा गाड्यांव्यातिरिक्त पेण आगारातील चार बसेस, रोहा आगारातील दोन बसेस, अलिबाग आगारातील दोन बसेस आणि कर्जत आगारातील दोन बसेस अशा एकुण आणखी दहा बसेस पाली बस स्थानकातून लोकल प्रवासासाठी सज्ज ठेवण्याचा निर्णय देखील एसटी महामंडळाने घेतला आहे.
जादा गाड्यांचा प्रवाशांनी पुरेपूर वापर करून घ्यावा आणि आपले आरक्षण लवकरात लवकर निश्चित करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या आरक्षणासाठी प्रवाशांनी एमएसआरटीसी मोबाईल ॲप आणि msrtc च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन आरक्षण निश्चित करावे असे एसटी महामंडळाकडून सूचित करण्यात आले आहे.
रत्नागिरी:चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या वतीने चिपळूणमध्ये लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या लोककला महोत्सवाचा शुभारंभ सोहळा होणार आहे.
कोकणातील लोप लावत चाललेल्या सर्व प्रकारच्या लोककला, खाद्य संस्कृती आणि पर्यटन संस्कृतीचा जागर दिनांक ५ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणाऱ्या अनुभवायला मिळणार आहे.
पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत चा लोककला आणि खाद्य संस्कृतीचा समावेश देखील या लोककला महोत्सवात असणार आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत लोककला महोत्सवाचे स्वागाध्यक्षपद तर संयोजन समिती अध्यक्ष म्हणून डॉ तानाजीराव चोरगे हे जबाबदारी सांभाळणार आहेत
पुढील महिन्यात 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत लोककला महोत्सवाला होणार सुरवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली
या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी रमाईनगर परिसरात काल काळ्या Black Panther वाघाचे दर्शन घडल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल येथील ग्रामस्थ गुरू परब आपल्या शेतात जात असताना त्यांना हा दुर्मिळ जातीचा काळा वाघ दिसला.
गेल्या वर्षी कुडाळ तालुक्यातील गोवारी ह्या गावात काळ्या वाघाचा सव्वा वर्षाचा बछडा एका विहिरीत सापडला होता. सावंतवाडी तालुक्यात या आधी पण ब्लॅक पँथर दिसून आल्याने ह्या जातीच्या वाघाचे अस्तित्त्व परिसरात निश्चित झाले आहे.
कुडाळ येथील गोवारी गावात सापडलेला काळ्या वाघाचा बछडा
सिंधुदुर्ग :कुणकेरी येथे कुणकेरी क्रीडा आणि कला विकास मंडळाच्या वतीने आज दिनांक १५ जानेवारीपासून जिल्हास्तरीय निमंत्रित दशावतार नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा ७ दिवस चालणार असून त्याची सांगता शनिवार दिनांक २१ जानेवारीला होणार आहे.
ह्या स्पर्धेत संध्याकाळी ७ ते १० ह्या वेळेत खालील दशावतार नाटक कंपन्या आपले प्रयोग सादर करतील.
Konkan Railway News : राज्यातील वाढणार्या थंडीचा परिमाण आता कोकण रेल्वे वर होऊ लागला आहे. कोकण रेल्वेमार्गावर मडगाव पेण नजीक काल सकाळी रेल्वे रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग थंडीमुळे तुटल्यामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परीणाम झाला होता. रेल्वे कर्मचार्याच्या सतर्कतेमुळे सुदैवाने अपघात टळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेणवरून पनवेलला जाणार्या रेल्वे रुळाला जिते ते आपटा या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग तुटला होता. शुक्रवारी पहाटे हा प्रकार निदर्शनास आला. या मार्गावर रेल्वे जाण्यापूर्वी रेल्वे कर्मचारी रुळाची पाहणी करीत असताना त्यांना सदर प्रकार सकाळी 6 वाजून 22 मिनिटांच्या दरम्यान आढळला. याबाबत रेल्वे कर्मचार्यानी रेल्वेच्या अधिकार्यांना तातडीने सूचित केले.
रेल्वे अधिकार्यांनी तातडीने सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी दिवा स्थानकातून सुटणारी रोहा-दिवा या मेमु रेल्वेला जिते रेल्वे स्थानकानजीक थांबविले. यानंतर मडगाव-नागपूर स्पेशल रेल्वे, पेण येथून सकाळी 6.45 ला सुटणारी पेण-दिवा मेमु रेल्वे व मँगलोर-मुंबई रेल्वे या चार गाड्यांना रोखण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. सकाळी 7.30 वाजता रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. 10 ते 30 किलोमीटर प्रतितास या वेगाने सदर रुळावरून रेल्वे पुढे पाठविण्यात आल्या. थंडीमुळे रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रकार घडत असतात, अशी माहिती यावेळी रेल्वे प्रशासनाकडून कडून देण्यात आली.
Mumbai Goa Highway News:जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हातिवली येथील टोलनाक्यावर टोलवसुली केली जाऊ नये असे निर्देश रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित एजन्सीला दिले आहेत. तसेच ह्या टोल नाक्यापासूनच्या १२ किलोमीटर अंतरावरील वाहनांना टोलमाफी देण्यात येईल असे पण त्यांनी जाहीर केले आहे.
मागे ह्या टोलनाक्यावर टोलवसुली चालू झाली होती. ह्या वसुलीस स्थानिक ग्रामस्थानकडून मोठा विरोध झाला होता, स्थानिक ग्रामस्थांनी आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मिळून ह्याविरोधातआंदोलन केले होते, त्यामुळे हि टोलवसुली थांबवली होती. आता पुन्हा ही टोलवसुली चालू करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप करून जोपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली केली जाऊ नये असे स्पष्ट आदेश त्यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत
सिंधुदुर्ग:केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बीएसएनलचे ११० मोबाईल टॉवर मंजूर केले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेलिकम्युनिकेशनचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना नोव्हेंबर महिन्यात पत्र दिले होते. त्या पत्रात त्यांनी जिल्ह्यासाठी १०३ टॉवरची मागणी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता मोबाईल टॉवरची असलेली गरज लक्षात आणून दिली होती. त्यानुसार त्यांनी मागणी केलेल्या १०३ टॉवरला मंजुरी मिळालेली आहे.
Konkan Railway News | 12/01/2023: कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या एर्नाकुलम – निजामुद्दीन-एर्नाकुलम (२२६५५ / २२६५६) या गाडीला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हि गाडी थ्री टायर एसी श्रेणीच्या दोन अतिरिक्त कोच सहित चालविण्यात येणार आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे या गाडीच्या एकूण डब्यांची संख्या एकूण २२ झाली आहे.
खालील तारखेपासून हा बदल करण्यात येणार आहे.
२२६५५ – एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक : १८/०१/२०२३ बुधवारपासून
२२६५६ – हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस