Konkan Railway News: मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी अशी कोकण रेल्वे मार्ग रोज धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस दि. 4 नोव्हेंबरच्या प्रवासासाठी मुंबई सीएसएमटी ऐवजी पनवेलपर्यंत धावणार आहे.
मध्य रेल्वेच्या हद्दीत विद्याविहार स्थानजीक गर्डर चढवण्याच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी प्रवास सुरू होणारी मंगळूर मुंबई (12134) सुपरफास्ट एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकातच संपणार आहे. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान ही गाडी या दिवसाच्या प्रवासापुरती रद्द करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग: हवामान खात्याने गोवा आणि सिंधुदुर्गात येत्या तीन दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्याने गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर येत्या तीन दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोवा आणि सिंधुदुर्गात येत्या तीन दिवसात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्याने वारे तेलंगणा, कर्नाटकातून दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी गोव्यात काही ठिकाणी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या होत्या. त्यानंतर येत्या तीन दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Konkan Railway News : एकच उपनगरीय विभाग असल्यामुळे आरक्षण प्रणालीत किंवा IRCTC वेबसाईटवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, वांद्रे टर्मिनस, वसई, कल्याण यांसारख्या मुंबई विभागातील स्थानकांतून गाड्या शोधल्यास संबंधित स्थानकावर गाडी थांबत नसल्यास जवळील स्थानकांवरून किंवा गाडी सुटण्याच्या सुरुवातीच्या स्थानकावरून गाड्या दाखवल्या जातात. उदा. कल्याण ते माणगावसाठी गाड्या शोधल्यास ०११३९ नागपूर मडगाव एक्सप्रेस कल्याणयेथून तर ११००३ तुतारी एक्सप्रेस कल्याणवरून जात नसल्यामुळे दादरपासून दाखवली जाते. त्यात १०१०५ दिवा सावंतवाडी एक्सप्रेस पकडण्यासाठी कल्याणवरून दिवा जवळ असले तरीही ती पनवेलपासून दाखवली जात असे. यामुळे दिवा सावंतवाडी एक्सप्रेस पनवेलवरूनच सोडली जाते असा काही प्रवाशांचा गैरसमज होत असे. कदाचित दिव्यावरून एकच गाडी असल्यामुळे दिव्याचा समावेश मुंबई विभागात करणे राहून गेल्यामुळे हे घडत होते.
ही चूक रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय मधुकर महापदी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ती दुरुस्ती करून घेण्यासाठी प्रयत्न केले व त्यांना त्यात यशही आले. दिनांक २५ ऑक्टोबर, २०२३ ला ईमेल व सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी ही गोष्ट मध्य रेल्वेच्या लक्षात आणून दिली होती. संबंधित विभागाने ती तक्रार तातडीने २७ ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली. त्यानुसार रेल्वेने सकारात्मक कारवाई केली व आजपासून मुंबईतील स्थानकांवरून गाडी शोधल्यास दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेसचे सुरुवातीचे व शेवटचे स्थानक दिवा दाखवले जाते. यामुळे भविष्यात प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही आहे.
ओरोसः महाविद्यालयीन विद्यार्थीनींचे व महिलांचे चोरुन आक्षेपार्ह छायाचित्र काढल्याप्रकरणी कसाल गांगोची राई येथील नंदकुमार लक्ष्मण वनकर (वय ५०) याच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ढोकमवाडी (ता.कुडाळ) येथील एका महिलेने तक्रार दाखल केली आहे.
कसाल बाजारपेठ येथे आज सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला आहे. फिर्याद देणाऱ्या महिलेने संबंधित महिलांचे छायाचित्र काढत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली असता ते तेथून पळून गेले. त्यानंतर याबाबत त्या महिलेने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित वनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमती नागरगोजे या अधिक तपास करीत आहेत.
सिंधुदुर्ग : ओसरगाव येथे ज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने काल एक मोठी कारवाई केली आहे. सरपणाच्या आडून कंटेरनमधून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कऱ्हाड येथील एकाला ओसरगाव येथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ७० लाखांच्या दारूसह सरपण व १६ चाकांचा कंटेनर असा तब्बल एक कोटी २६ लाख ३२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने केली. या प्रकरणी लक्ष्मण अर्जुन ढेकळे (वय ३४, रा. बेघरवस्ती-पाडळी ता. कऱ्हाड) याला ताब्यात घेतले. गेल्या चार दिवसांत कोटींचा मुद्देमाल जप्त करण्याची ही दुसरी कारवाई आहे.
याबाबत पथकाने दिलेली माहिती अशी ः दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) ओसरगाव येथे आज सकाळी सापळा रचण्यात आला. यावेळी १६ चाकी कंटेनर (एनएल ०१ एजी ३८२०) तपासणीसाठी थांबविण्यात आला. चालकाकडे चौकशी केली असता त्याने आतमध्ये सरपणाच्या गोण्या असल्याचे सांगितले. अधिक तपासणीत गोण्यांमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा आणि बियर बॉक्स आढळून आले.
पुठ्ठ्याच्या खोक्यात विदेशी मद्याच्या ७५० मिलीलिटरच्या नऊ हजार ६६० बाटल्या, १८० मिलीलिटरच्या ११ हजार ४० बाटल्या, ५०० मिलीलिटरच्या बियरच्या २ हजार ८०८ बाटल्या आढळल्या. पथकाने एकूण एक हजार १५२ खोके जप्त केली. ती सर्व सरपण गोण्याच्या मागे लपविली होती. पथकाने ७० लाख ८० हजार ३६० रुपये किमतीची दारू, ५५ लाखांचा कंटेनर आणि इतर साहित्य ५२ हजार ५०० रुपये असा एकूण एक कोटी २६ लाख ३२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर भरारी पथकातील निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, योगेश शेलार, राहुल सकपाळ यांनी कारवाई केली. श्री. येवलुजे तपास करीत आहेत.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर आज दिल्ली – एर्नाकुलम अमृतकलश विशेष गाडी धावणार आहे. ही गाडी दिल्ली ते एर्नाकुलम दरम्यान चालविण्यात येणार आहे.
Konkan Railway News : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा यावर्षीच्या डिसेंबर अखेरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी २७/१०/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा २९/१२/२०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी ३०/१०/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०१/०१/२०२४ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
सिंधुदुर्ग : भारतीय रेल्वेमागचं दुष्टचक्र थांबण्याचं नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून लांब पल्ल्यांच्या गाड्यांना आग लागणं, डी रेल होणं किंवा अपघात अशा घटना समोर येत आहेत. आज कोकण रेल्वे मार्गावर मडगांव मांडवी एक्सप्रेसला अचानक आग लागली.
कोकण रेल्वे मार्गावर मांडवी एक्सप्रेसला अचानक आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. मडगाव येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसला अचानक आग लागल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी स्थानकाजवळ घडली.
मडगावहून मुंबईला जात असताना शेवटच्या डब्याने (जनरेटर डबा) अचानक पेट घेतला. माहितीनुसार सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आग विझवण्यात आली. ब्रेकमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रत्नागिरी: कोकण रेल्वेच्या वेळापत्रक आज दिनांक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. आजपासून नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत. पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी दरवर्षी गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात येतात. त्यामुळे वेळापत्रक बदलण्यात येते. कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या पावसाळी वेळप्रत्रकानुसार चालविण्यात येत असतात. हे पावसाळी वेळापत्रक दि. १ नोव्हेंबरपासून समाप्त होत आहे आणि नवीन वेळापत्रकानुसार सर्व गाड्या चालविण्यात येणार आहेत.
दिनांक ०१ नोव्हेंबर पासूनचे काही महत्वाच्या गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे..
Konkan Railway News : दिवाळी आणि ख्रिसमससाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावर दिवाळी आणि ख्रिसमस साठी एक द्विसाप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी विशेष (अतिरिक्त) तिकीट भाड्यासहित चालविण्यात येणार आहे.
Train No. 09057 / 09058 Udhna Jn. – Mangaluru Jn. – Udhna Jn. Bi- Weekly Special on Special Fare:
Train no. 09057 Udhna Jn. – Mangaluru Jn. Weekly Special
ही गाडी दि. ३ नोव्हेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शुक्रवारी आणि रविवारी चालविण्यात येणार आहे. उधाणा येथून सायंकाळी १९:४५ वाजता सुटून ही गाडी दुसर्या दिवशी मंगळरू येथे संध्याकाळी १९:१० या वेळेस पोहचेल.
Train no. 09058 Mangaluru Jn. – Udhna Jn. Weekly Special
ही गाडी दि. ४ नोव्हेंबर २०२३ ते ०१ जानेवारी २०२४ पर्यंत आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवारी आणि सोमवारी चालविण्यात येणार आहे. मंगुळुरु येथून रात्री २१:१० वाजता सुटून ही गाडी दुसर्या दिवशी उधाणा येथे रात्री २१:३० या वेळेस पोहचेल.