Category Archives: मुंबई

मुंबई :नुकताच चित्र वाघ यांनी ट्वीट करत उर्फी जावेदला कपड्यांवरुन सुनावले होते. आता त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहित उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आपल्या हटके आणि अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती सोशल मीडियावर सतत रिविलिंग ड्रेस घालून व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिने अनेकवेळा कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. पण उर्फी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करते. आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला कपड्यांवरुन सुनावले. आता उर्फीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण चित्रा यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेत उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली.
चित्रा वाघ मुंबईतील महिलांवर होणारा अत्याचार असो किंवा राजकारणातील काही गणित ते नेहमी परखड मत मांडताना दिसतात. सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना त्यांनी सोशल मीडियावर रिविलिंग ड्रेसमधील व्हिडीओ शेअर करत असल्याने संताप व्यक्त केला आहे.
त्यांनी आपल्या पत्रात असे म्हंटले आहे…
‘उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार, स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही’
पुढे पत्रात त्यांनी, ‘मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरुर करावे, मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे’
मुंबई च्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या #उर्फीजावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी
मुंबईचे मा.@CPMumbaiPolice तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली @MumbaiPolice @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/M3HHpvTyMB— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 1, 2023
Mumbai News:मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालय दंत विविध संवर्गात कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर आहे. नियुक्त उमेदवारांना पालिकेच्या नियमानुसार वेतन दिले जाईल.
पुढील पदांकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
डाटा ऑपरेटर : एकूण पदे ५
शैक्षणिक अर्हता : बारावी उत्तीर्ण, मराठी व इंग्रजी टंकलेखन उत्तीर्ण,
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष
एक्स रे टेक्निशियन : १ पद
शैक्षणिक अर्हता : बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा क्ष किरण विषयातील बीपीएमटी हा पूर्णवेळ ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम व सहा महिन्यांची इंटर्नशीप,
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष
अधिपरिचारीका : ४ पदे
शैक्षणिक अर्हता : बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग अधिक मिडवायफरी डिप्लोमा धारक असावा कंवा साडेतीन वर्षाँचा कालावधी पूर्ण झालेला अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा तसेच उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
बहुउद्देशीय कामगार : १२ पदे
शैक्षणिक अर्हता : इयत्ता आठवी उत्तीर्ण असावा, मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता यावी.
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
सुतार (कारपेंटर) : १ पद
शैक्षणिक अर्हता: आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा त्याबाबतचा अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
नळ कारागीर (प्लंबर) : १ पद
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा त्यासंदर्भातील अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
एसी टेक्निशियन : १ पद
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्ल्यूडी परवाना बंधनकारक
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
इलेक्ट्रीशियन : १ पद
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्लूडी परवाना बंधनकारक
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
वायरमन कम लिफ्टमन
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्लूडी परवाना बंधनकारक
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
इलेक्ट्रीकल हेल्पर
शैक्षणिक अर्हता : किमान आठवी पास व विद्युत कामाचा अनुभव असणे आवश्यक, मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे
वयाची अट : १८ ते ३८
अधिक माहितीसाठी ईथे क्लिक करा MAHANAGAR PALIKA VACANCY.pdf
मुंबई :श्री सिध्दीविनायक गणपती मंदिरातील श्रीच्या मूर्तीला येत्या बुधवारी १४ ते रविवार १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात भाविकांना श्रींच्या मुर्तींच्या दर्शन घेता येणार नसून याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
Follow us on



श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे भाविकांना आवाहन करत बुधवार दिनांक १४ डिसेंबरपासून ते रविवारी दिनांक १८ डिसेंबर २०२२च्या कालावधीमध्ये श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या कालावधीमध्ये भाविकांना प्रत्यक्ष श्रींच्या मूर्तींचे दर्शन बंद असेल, याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन घेता येईल असे श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.
या सिंदूर लेपनानंतर सोमवार १८ डिसेंबरला दुपारी एक वाजल्यापासून नेहमीप्रमाण गाभाऱ्यातून भाविकांना श्रींच्या मूर्तींचे दर्शन घेता येईल,असे न्यासाने कळवले आहे.
मुंबई :दादर रेल्वे स्थानका फलाट क्रमांक-४ आणि ५ क्रमांक फलाटाला दुहेरी जोडणी देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. फलाट क्रमांक-४ आणि ५ यांच्यामध्ये फलाट क्रमांक ‘४ ए’ उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दादर स्थानकावरील गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने ह्या हालचाली सुरू केल्या आहेत.
स्थानकातील फलाट क्रमांक-३वरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल थांबतात. फलाट ४ आणि ५ यांच्यामध्ये लोखंडी जाळीचे कुंपण आहे. ते हटवून लोकल पकडण्यासाठी फलाट ५चा देखील पर्याय खुला करून देण्याचे काम सुरू आहे. सर्व तपासणीअंती आणि रेल्वेगाड्यांची वाहतूक अबाधित ठेवून हे शक्य झाल्यास फलाट क्रमांक ‘४ ए’ या नव्या फलाटावरून प्रवाशांना लोकल पकडणे शक्य होईल, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फलाट ५वरून अगदी मोजक्याच मेल-एक्स्प्रेस धावतात. या गाड्यांच्या वेळा वगळता अन्य वेळेत या फलाटावर शुकशुकाट असतो. आपत्कालीन स्थितीत या फलाटावर लोकल वाहतूक होते. यालगत असलेल्या फलाट-४वर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी प्रवाशांची मोठी गर्दी असते. मुख्य पुलाच्या आणि स्वामी नारायण मंदिरदिशेकडे उतरणाऱ्या पुलांच्या पायऱ्यांची जोडणी फलाट ५वर आहे. फलाटावर ठाण्याच्या दिशेला लिफ्ट आणि बंद अवस्थेत रेल्वे कार्यालय आहे. कार्यालय आणि लिफ्टची नव्या ठिकाणी उभारणी आणि पुलांच्या पायऱ्या ही प्रमुख आव्हाने रेल्वे प्रशासनासमोर आहेत. संबंधित तज्ज्ञ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
फलाट ४वरील स्टॉल, अकार्यान्वित पाणी देणारे मशिन आणि प्रवासी वर्दळीसाठी अडथळे असणारी अन्य बांधकामे हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे फलाट ३ आणि ४वर अधिक जागा उपलब्ध होणार आहे. मार्च २०२३अखेर हे काम पूर्ण होणार आहे.

Vision Abroad

मुंबई – पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या डब्यातून कायम दाटीवाटीचा आणि असह्य वाटणारा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर, या प्रवाशांचा प्रवास लवकरच गर्दीमुक्त होणार आहे. पश्चिम रेल्वेने बारा डब्ब्यांची लोकल आता १५ डब्यांचा लोकलमध्ये परावर्तीत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या आठवड्यापासून 15 डब्बांच्या 26 लोकल पश्चिम मार्गावर धावणार असून, यापैकी १० सेवा जलद मार्गावर मार्गावर धावणार आहे. या निर्णयामुळे लोकलमधील प्रवाशी वहन क्षमता २५ टक्यांनी वाढणार आहे. २१ नोव्हेंबर २०२२ पासून हा निर्णय लागू होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,एकुण २६ उपनगरीय लोकलला आता 13 ऐवजी 15 डब्बे लावले जाणार आहे. या निर्णयामुळे प्रत्येक लोकलची आसन क्षमता २५ टक्यांनी वाढेल. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात सध्या १५ डब्यांच्या एकूण उपनगरीय लोकल सेवांची संख्या १०६ आहे. आता सोमवारपासून पंधरा डब्याचा २६ लोकल सेवांची भर पडल्यानंतर या निर्णयामुळे आता पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या एकूण उपनगरीय लोकल सेवांची संख्या १३२ वर पोहचणार आहे. परंतु एकूण उपनगरीय लोकल सेवांमध्ये कोणताही बदल होणार नाही, म्हणजे ६९ एसी लोकल सेवांसह दररोज १३८३ सेवा असणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये अतिरिक्त जागा उपलब्ध होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहेत.

मुंबई :अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज ठाकरेंनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन केलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र आवाहन राज ठाकरेंनी ट्वीट केलं आहे.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis pic.twitter.com/78nfA21hDP
— Raj Thackeray (@RajThackeray) October 16, 2022
मुंबई :कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. मुंबईत कारमधून प्रवास करणऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमामध्ये वाहतूक विभागाकडून मोठा बदल करण्यात आला आहे. आता मुंबईमध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट वापरणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी कारमध्ये आवश्यकते बदल करण्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
सीट बेल्ट बांधणे टाळून या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर १ नोव्हेंबर २०२२ पासीन मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ १९४(ब)(१) अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Vision Abroad
