Category Archives: मुंबई

एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली; डझन चे दरही आवाक्यात…..

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी कोकणचा हापूस व इतर राज्यातील मिळून ११०४३ पेट्यांची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ४०० ते १ हजार रुपये डझन दराने आंबा विकला जात आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांमध्ये या वर्षी आंब्याचे पीक मुबलक आले आहे. प्रत्येक वर्षी मार्चपासून नियमित आवक सुरू होत असते. परंतु, या वर्षी फेब्रुवारीमध्येच आवक सुरू झाली आहे. सोमवारी देवगड व इतर ठिकाणांवरून हापूसची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ४ ते ८ डझन पेटीची २ हजार ते ६ हजार रुपयांना विकली जात आहे. कर्नाटकमधून बदामी व लालबागचीही आवक होत आहे. बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आंबा हंगाम या वर्षी चांगला होईल अशी चिन्हे आहेत. आवक वाढू लागली आहे. मार्चमध्ये आवक अजून वाढून दरही सामान्य नागरिकांच्या नियंत्रणात येतील. हापूसला ग्राहकांचीही पसंती मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >आता कोकणातही बॅकवॉटर आणि हाऊसबोट चा अनुभव घेता येईल; कोकणातील तरुणाचे पर्यटन व्यवसायात एक पाऊल पुढे…

Loading

ब्रेकिंग – लोकल ट्रेनचे 3 डब्बे रुळावरून घसरले;बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प

नवी मुंबई |बेलापूरहून खारकोपर स्टेशनला जाणाऱ्या लोकल ट्रेनचे 3 डब्बे खारकोपर स्टेशनमध्ये प्रवेश करताना रुळावरून घसरले. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही इजा नाही. रिलीफ ट्रेन घटनास्थळी पोहचल्या असून गाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

फक्त बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गांवरील वाहतूक बंद आहे. हार्बर , मेन लाईन आणि इतर मार्गांवरील वाहतूक सुरुळीत चालू आहे

 

Loading

मुंबई लोकल ट्रेन – आजपासून ‘हा’ महत्वाचा बदल.

मुंबई :मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठा व महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार आज, २० फेब्रुवारी २०२३ पासून मध्य रेल्वेवरील जलद मार्गाच्या गाड्या या १२ डब्ब्यांऐवजी १५ डब्याच्या स्थानी थांबतील. कामाला जाताना आयत्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून हा नवा बदल नेमका काय आहे हे आधीच सविस्तर जाणून घेऊयात.

प्राप्त माहितीन्वये, जलद मार्गावरील रेल्वे अप व डाऊन दिशेने ज्या १२ डब्यांची रेल्वे गाडी पहिल्या प्लॅटफाॅर्मवर जिथे थांबत होती ती आता १५ डब्यांची रेल्वे जिथे थांबते त्या जागी थांबणार आहे. म्हणजेच १२ डब्यांच्या पुढील पहीला मोटर मॅन डब्बा आता ३ डब्बे पुढे जाऊन १५ डब्यांचा मोटर मॅन डबा जिथे थांबत होता तिथे थांबेल. कल्याण, डोबिंवली , दिवा , ठाणे , मुलुंड , भाडूंप , घाटकोपर , कुर्ला , दादर , भायखळा या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे बदल लागू असतील.

दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या स्थानकात हे नवे बदल अंमलात आणण्यात आले आहेत. या स्थानकांवरील गर्दी पाहता अनेकदा प्रवाशांनी मध्य रेल्वेने सरब लोकल गाड्या या १२ ऐवजी १५ डब्याच्या कराव्यात अशी मागणी केली होती. अद्यापही या मार्गावर काही ठराविकच गाड्या १५ डब्याच्या आहेत. विशेषतः लांब पल्ल्याच्या म्हणजेच कर्जत- कसाराकडे जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे प्रचंड गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. सध्या तरी मध्य रेल्वेने १२ डब्याच्या गाडीचे स्थान बदलले आहे पण सर्व गाड्या १५ डब्याच्या करण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.

Loading

पत्रकाराने वाचवलेत आजीचे प्राण!

नवी मुंबई | प्रतिनिधी :  खारघर स्टेशन,सकाळचे ११ वाजले होते. स्टेशनवर ठाण्याला जाणारी लोकल आली आणि काही सेकंदात प्लॅटफाॅर्मवरून ती लोकल निघाली, तेवढ्यात लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. समोर एक ६५-७० वर्षांची प्रवासी लोकल आणि प्लॅटफाॅर्मच्यामध्ये अडकून घासत जात होती. तिचा एक पाय लोकल आणि प्लॅटफाॅर्मच्या फटीत अडकला होता आणि एक पाय लोकलमध्ये होता. लोकल वेगाने पुढे जात होती.
प्लॅटफॉर्मवरील प्रवासी आजीला वाचावण्यासाठी धावले. त्यात सर्वात पुढे होता विलास बडे नावाचा एक तरुण. त्याने धावत जाऊन आजीला पकडले. सुदैवाने त्या आजीने हॅंडलचा हात सोडला आणि ते दोघे  प्लॅटफाॅर्मवर कोसळले. जेमतेम पाच सेकंदात हे सगळं घडलं. घडलेल्या प्रसंगाने आज्जी प्रचंड भेदरली होती पण सुखरूप आहे.
विलास बडे IBN लोकमत मध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ह्या धाडसामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. घडलेल्या प्रसंगाने आजी प्रचंड भेदरल्या होत्या पण सुखरूप आहे.
Watch This Video 

Loading

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी…. पीक अवरलाच मेट्रो बंद

Mumbai Metro News:संध्याकाळी ऑफिस ते घर असा मेट्रो रेल्वेने प्रवाशांची उद्या मोठी गैरसोय होणार आहे. कारण उद्या संध्याकाळी 5:45 ते 7:30 दरम्यान मेट्रो सेवा बंद रहाणार आहे. काही ऑपरेशनल आणि प्रशासकीय कारणास्तव मेट्रो बंद करण्यात येणार असल्याचं मुंबई मेट्रो प्रशासनाच्या वतीनं सांगितलं आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी यावेळी त्यांच्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही मेट्रोकडून करण्यात आलं आहे.

नेमक्या ऑफिसेस सुटण्याच्या वेळात मेट्रो बंद राहणार असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

 

Loading

पश्चिम रेल्वे मार्गावरील १२ लोकल्स उद्यापासून १५ डब्यांसह धावणार..


Mumbai News :पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या १२ लोकल्सचा  १५ डब्यांपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारानंतर प्रत्येक लोकलमध्ये २५ टक्के अतिरिक्त आसनक्षमता वाढणार आहे. उद्यापासून म्हणजे गुरुवार ११ जानेवारी २०२३ पासून या गाड्या १५ डब्यांसहित धावणार आहेत. जलद मार्गावर ६ लोकल्स आणि धीम्या मार्गावर ६ लोकल्स मध्ये हा बदल करण्यात आला आहे.
सध्या ह्या मार्गावर १५ डब्यांच्या १३२ लोकल फेऱ्या होत्या त्याची संख्या १४४  होणार आहे.  असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.१५ डब्यांचा विस्तारामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading

एसी लोकलने प्रवास करता यावा ह्यासाठी वापरला जात आहे चक्क बनावट पास

Mumbai Local News:एसी लोकलने प्रवास करता यावा यासाठी प्रवासी चक्क बनावट Fake पास वापरत असल्याचे प्रकार उघडकीस यायला लागले आहेत. चर्चगेट ते विरार ह्या मार्गावर  दोन दिवसांपूर्वी तिकीट तपासणीसांच्या एका गस्त पथकाने अशाच एका बनावट पास धारकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपीवर फसवणूकी संबधित कलमे लावून अटक केली आहे.
चौकशीत त्याने तो पास विरारला एका मोबाईल रीचार्ज शॉप मधून 600 रुपयांना विकत घेतला होता असे कबूल केले आहे. विरार ते चर्चगेट एसी  प्रवासभाडे वर वर पाहता हा पास खरा वाटत असला तरी काही बारकाईने निरीक्षण केल्यास फरक लक्षात येतो. तिकीट तपासणीसाने जेव्हा ह्या बनावट पासधारकास पास दाखविण्यास सांगितले तेव्हा एका प्लास्टिक कव्हरमध्ये ठेवलेला तो पास दाखवला. थोडीसी शंका आल्याने तपासणीसाने तो प्लास्टिक कव्हर मधून बाहेर काढला आणि साधारण एका मिनिटच्या बारीक निरीक्षणाने तो पास बनावट असल्याचे त्याचा लक्षात आले.
विरार ते चर्चगेट एसी लोकल चे प्रवासभाडे महिना 2005 एवढे आहे तर हा बनावट पास 600 रुपयामंध्ये बनवून भेटत आहे.

Loading

उर्फी जावेद रुपी स्त्री देहाचा बाजार रोखा…..चित्रा वाघ यांचे आयुक्तांना पत्र

मुंबई :नुकताच चित्र वाघ यांनी ट्वीट करत उर्फी जावेदला कपड्यांवरुन सुनावले होते. आता त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहित उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आपल्या हटके आणि अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती सोशल मीडियावर सतत रिविलिंग ड्रेस घालून व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिने अनेकवेळा कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. पण उर्फी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करते. आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला कपड्यांवरुन सुनावले. आता उर्फीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण चित्रा यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेत उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली.

चित्रा वाघ मुंबईतील महिलांवर होणारा अत्याचार असो किंवा राजकारणातील काही गणित ते नेहमी परखड मत मांडताना दिसतात. सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना त्यांनी सोशल मीडियावर रिविलिंग ड्रेसमधील व्हिडीओ शेअर करत असल्याने संताप व्यक्त केला आहे.

त्यांनी आपल्या पत्रात असे म्हंटले आहे…

‘उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार, स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही’ 

पुढे पत्रात त्यांनी, ‘मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरुर करावे, मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे’

 

 

Loading

नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती..

Mumbai News:मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालय दंत विविध संवर्गात कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर आहे. नियुक्त उमेदवारांना पालिकेच्या नियमानुसार वेतन दिले जाईल.

पुढील पदांकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

डाटा ऑपरेटर : एकूण पदे ५
शैक्षणिक अर्हता : बारावी उत्तीर्ण, मराठी व इंग्रजी टंकलेखन उत्तीर्ण,
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष

एक्स रे टेक्निशियन : १ पद
शैक्षणिक अर्हता : बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा क्ष किरण विषयातील बीपीएमटी हा पूर्णवेळ ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम व सहा महिन्यांची इंटर्नशीप,
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष

अधिपरिचारीका : ४ पदे
शैक्षणिक अर्हता : बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग अधिक मिडवायफरी डिप्लोमा धारक असावा कंवा साडेतीन वर्षाँचा कालावधी पूर्ण झालेला अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा तसेच उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

बहुउद्देशीय कामगार : १२ पदे
शैक्षणिक अर्हता : इयत्ता आठवी उत्तीर्ण असावा, मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता यावी.
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

सुतार (कारपेंटर) : १ पद
शैक्षणिक अर्हता: आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा त्याबाबतचा अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
नळ कारागीर (प्लंबर) : १ पद
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा त्यासंदर्भातील अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
एसी टेक्निशियन : १ पद
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्ल्यूडी परवाना बंधनकारक
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

इलेक्ट्रीशियन : १ पद
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्लूडी परवाना बंधनकारक
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

वायरमन कम लिफ्टमन
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्लूडी परवाना बंधनकारक
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

इलेक्ट्रीकल हेल्पर
शैक्षणिक अर्हता : किमान आठवी पास व विद्युत कामाचा अनुभव असणे आवश्यक, मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे
वयाची अट : १८ ते ३८

अधिक माहितीसाठी ईथे क्लिक करा 👉🏻 MAHANAGAR PALIKA VACANCY.pdf

Loading

दादर येथील श्री सिद्धिविनायक मंदिरातील श्रींच्या मुर्तींचे दर्शन ५ दिवस बंद राहणार.

 

मुंबई :श्री सिध्दीविनायक गणपती मंदिरातील श्रीच्या मूर्तीला येत्या बुधवारी १४ ते रविवार १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात भाविकांना श्रींच्या मुर्तींच्या दर्शन घेता येणार नसून याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

   Follow us on        

श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे भाविकांना आवाहन करत बुधवार दिनांक १४ डिसेंबरपासून ते रविवारी दिनांक १८ डिसेंबर २०२२च्या कालावधीमध्ये श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या कालावधीमध्ये भाविकांना प्रत्यक्ष श्रींच्या मूर्तींचे दर्शन बंद असेल, याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन घेता येईल असे श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.

 

या सिंदूर लेपनानंतर सोमवार १८ डिसेंबरला दुपारी एक वाजल्यापासून नेहमीप्रमाण गाभाऱ्यातून भाविकांना श्रींच्या मूर्तींचे दर्शन घेता येईल,असे न्यासाने कळवले आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search