आंबोली हे जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण कोकणातील पर्यटनाचा केंद्रबिंदू मानला जातो. पावसाळ्यात धबधबे आणि निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी राज्यातून आणि आजूबाजूच्या राज्यातून पर्यटक भेट देत असतात. ह्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने स्थानिकांना रोजगार प्राप्त होत आहे.
आज हल्ली मद्यधुंद तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे हे ठिकाण बदनाम होत आहे. मोठ मोठ्याने ओरडणे, एकमेकांना नको त्या भाषेत शिवीगाळ करणे रस्त्यात नाचून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे असे प्रकार वाढले आहेत. ह्या सर्व प्रकारांमुळे महिला आणि कुटुंबासमवेत भेट देणार्या पर्यटकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. आणि ह्या प्रकारांना आता आळा नाही घातला तर पुढे काहीतरी गंभीर घटना घडण्याची शक्यता पण नाकारता येत नाही.
आमच्या माहितीनुसार महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस असतात पण त्यांची संख्या कमी असते. जिल्हा प्रशासनाने ही संख्या खासकरून सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवार ह्या दिवशी वाढविली पाहिजे. त्याचप्रकारे ह्या दिवशी एक गस्तपथक नेमले पाहिजे जेणेकरून सर्व ठिकाणांवर नजर ठेवता येईल.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणुन घोषित झाला आहे. इथल्या निसर्गामुळे पर्यटक ईथे आकर्षित होतो. पर्यटन व्यवसायात आता अनेक तरुण उतरले आहे. प्रशासनाने अशा प्रकारच्या गोष्टींना घातला नाही तर त्याचा फटका प्रत्यक्षरित्या पर्यटनाला आणि अप्रत्यक्षपणे ह्या व्यावसायिकांना बसेल हे निश्चित.
Vision Abroad