मुंबई:अधिवेशनाचा पहिल्या दिवशी विरोधक नवीन सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यावर धारेवर धरतील अशी चर्चा होत होती. पण पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस विशेष चर्चित राहिला तो विरोधकांनी सभागृहाबाहेर केलेल्या विविध घोषणांनी.
घोषणाबाजी मध्ये सर्वात आघाडीवर होते ते शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे.
विरोधकांची पाहिली घोषणा होती. शिंदे गटासाठी
50 खोके… एकदम ओके..
दुसरी घोषणा होती ती पण शिंदे गटासाठी
आलेरे आले…. गद्दार आलेत.
विरोधकांची तिसरी घोषणा भाजपासाठी, नुकतेच कॅबिनेट मंत्री बनलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्यावरुन होती आणि उपरोधिक होती.
सुधीर भाऊंना चांगले खाते न देणार्या या सरकारचा धिक्कार असो…..
चौथीही घोषणा भाजपसाठी, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात करण्यात आलेल्या आशीष शेलार यांच्यावरुन होती. अर्थात ही घोषणा पण उपरोधिक होती.
आशिष शेलार यांना मंत्रिपद न देणार्या या सरकारचा विजय असो…
यासारख्या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दाणादाण करून सोडला होता.
Facebook Comments Box
Vision Abroad