निष्ठेचे प्रमाणपत्र हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही.. आमदार राजन साळवी

राजापूर:शिवसेनेचा कोकणातील आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी कालपासून जोर धरला होता. शिंदे गटात जाऊ शकणारा हा शिवसेनेचा आमदार दुसरा-तिसरा कोणी नसून राजन साळवी हे आहेत ह्या आशयाच्या बातम्या काल प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेला अजून एक धक्का बसतो की काय अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. अधिवेशन सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि राजन साळवी यांची भेट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राजन साळवी आता शिंदे गटात प्रवेश करतील, या चर्चेने जोर धरला होता.

पण आज ट्विटर च्या माध्यमातून ह्या बातम्या खोट्या आहेत असे जाहीर केले आहे. ”आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी….काल आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे फक्त… ”

”निष्ठेचे प्रमाणपत्र दि.15 ऑक्टोबर 2002 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही….” ह्या ट्विट सोबत त्यांनी स्व. बाळासाहेबांसोबतचा आपला फोटो पोस्ट केला आहे.

राजन साळवी हे कोकणातील लांजा-राजापूर-साखरपा ह्या मतदार संघातून सलग 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत.

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search

Join Our Whatsapp Group.