गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे, गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या उत्साह वाढत चालला आहे. मागील २ वर्षाप्रमाणे काही निर्बंध नसल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जाणार आहेत. कोकण रेल्वेच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग. पण ह्या महामार्गाची आताची अवस्था पाहता ह्या मार्गे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत.
ह्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांची रांगोळी तयार झाली आहे. हि सर्व परिस्थती खूपच चीड निर्माण करणारी आहे. गणेशोत्सव काळात ह्या रस्त्यावर किती रहदारी असते ह्याची कल्पना असून सुद्धा ह्यावर उपाय होत नाही आहे. दरवर्षीचे हे रडगाणे झाले आहे. मुंबई – गोवा महामार्ग तयार होण्याचा कमला पण कमालीची दिरंगाई होताना दिसत आहे.
याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा विषय विधानसभेमध्ये मांडला. कोकणातील सर्वच आमदारांनी या विषयावरुन सरकारला प्रश्न विचारमाऱ्या जाधव यांची पाठराखण केली. अखेर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या महामार्गाचं काम २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलं.
सध्या या रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवून तात्पुरत्या स्वरूपात हा महामार्ग वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी होत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad