मुंबई: शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांना ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत?संबंधित शाळा बंद करण्याबाबत विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर सुरु आहे? याचा आढावा घेण्यास सांगितले आहे. राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा लवकरच बंद होणाची शक्यता आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयाला पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यावेळी मात्र, ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाने याबाबतचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.
शिक्षण हक्क कायदा काय सांगतो?
शिक्षण विभागाच्या आधीच्या निर्णयानुसार पहिली ते पाचवीच्या शाळा या विद्यार्थ्यांसाठी एक किलोमीटर अंतरावर असाव्यात तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळा तीन किलोमीटर अंतरावर असाव्यात असा आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत आणि शाळा जवळ असावी असा शिक्षण हक्क कायदा सांगतो, त्यामुळे अशा प्रकारच्या शाळा बंद झाल्यास शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होईल असं तज्ञांचा म्हणणं आहे त्यामुळे पुन्हा एकदा अशा शाळा बंद करायला विरोध केला जाण्याची शक्यता आहे.
सरकारद्वारे अशा शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना जवळपासच्या शाळांपर्यंत चांगली वाहतूक सुविधा देता येईल का याचा पूर्ण आढावा कदाचित घेऊन काही निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Vision Abroad