konkan Railway News :कोंकण रेल्वेमार्गावर धावणारी अजून एक गाडी आता आरामदायक एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) सहित धावणार आहे. १९२६०/१९२५९ भावनगर- कोचुवेल्ली- भावनगर हि गाडी २० डिसेंबर पासून नव्या लाल, पांढऱ्या रूपासह रुळावर धावताना दिसणार आहे. सध्या हि गाडी IRS डब्यांसहित चालवली जात आहे.
ह्या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत पण खालीलप्रमाणे बदल केला आहे.
जनरेटर कार – ०१ + एसलआर – ०१ + सेकंड सीटिंग – ०३ + स्लीपर – ०८ + थ्री टायर एसी – ०६ + टू टायर एसी – २ + पॅन्टरी कार – ०१ असे मिळून एकूण २२ डबे
ह्या गाडीचे मडगाव पर्यंतचे कोकणातील थांबे
वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, थिवीम आणि मडगाव
एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) कोच ची वैशिष्ट्ये
- एलएचबी कोच प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित व प्रशस्त असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित असतात.
- मजबूत आणि वजनाने हलके असल्यामुळे गाडीचा वेगही वाढतो.
- इतर कोचच्या तुलनेत एलएचबी कोचची लांबी ही १.५ मी. जास्त असल्याने त्यात स्लीपर आणि थ्री टायर एसी डब्यात ८ बर्थ जास्त बसतात तर टू टायर एसी डब्यात ४ बर्थ जास्त बसतात. त्यामुळे अधिक प्रवासी क्षमता.
- अधिक सुरक्षित- अपघात झाल्यास डबे एकमेकांवर चढत नाही त्यामुळे कमी हानी होते.
- बोगींना डिस्कब्रेक असल्याने सुरक्षितता वाढते.
- आधुनिक स्वरूपाची प्रसाधने.
Facebook Comments Box
Vision Abroad