कोणतेही वाहन थांबले किंवा एखादी व्यक्ति जवळ येत आहे असे वाटले तर हा बैल चटदिशी त्या दिशेकडे आपली मान वळवून बघतो. कदाचित आपला मालक आपल्याला न्यायाला आला असेल अशी एक आशा त्याच्या मनात प्रज्वलित होते. पण दुसर्याच क्षणी त्याचा हिरमोड होऊन डोळ्यात अश्रू येतात.
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : हल्लीच सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे गावात एक बैल सापडला आहे. या बैलाच्या पाठीवर व्यंग असलेला पाचवा पाय असल्यामुळे हा बैल विशेष चर्चेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यालगतच्या कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील लोक देवाचा बैल (पांगुळ बैल) घेऊन कोकणात आपल्या उपजीविकेसाठी येतात अशापैकी कोणाच्या मालकीचा हा बैल असून त्याची मालकाबरोबर ताटातूट झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हा बैल कारिवडे येथील ग्रामस्थ संजय जाधव यांच्या घरी बांधून ठेवण्यात आलेला आहे. या बैलाच्या चारा व पाण्याची व्यवस्था समाजसेवक आणि माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर तसेच रवी परब व इतर ग्रामस्थांनी केली आहे. बैल सापडल्याची बातमी त्यांनी पत्रकारांना देऊन या बैलाच्या मालकाने संपर्क साधून तो घेऊन जावा असे आवाहन केले होते. पण १० ते १२ दिवस उलटले तरी अजून या बैलाच्या मालकाचा पत्ता लागला नाही आहे.
सर्वात मोठी समस्या म्हणजे हा बैल येथील ओली चार आणि सुके गवत किंवा पेंड खात नाही. त्याला लागणारा चारा येथील आजूबाजूच्या गावी सध्या उपलब्ध नाही आहे. त्यामुळे तो मालवण तालुक्यातील धामापूर येथून तो आणावा लागतो. कारिवडे ते धामापूर हे अंतर जवळ जवळ ४० किमी आहे. चारा जास्त दिवस टिकत नसल्याने दर २ दिवसांनी तो आणावा लागतो. दुसरे म्हणजे या बैलाला असे सोडून देऊ शकत नाही कारण त्याची उपासमार होईल. पुढील काही महिने येथील नद्यांचे पाणी पण आटते त्यामुळे पाणीपण त्याला भेटणार नाही.
कोणतेही वाहन थांबले किंवा एखादी व्यक्ति जवळ येत आहे असे वाटले तर हा बैल चटदिशी त्या दिशेकडे आपली मान वळवून बघतो. कदाचित आपला मालक आपल्याला न्यायाला आला असेल अशी एक आशा त्याच्या मनात प्रज्वलित होते. पण दुसर्याच क्षणी हिरमोड होऊन डोळ्यात अश्रू येतात. प्राण्यांना भावना असतात हे ऐकण्यात आले होते पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती येथील ग्रामस्थ घेत आहेत.
कारिवडे गावचे मंगेश तळवणेकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी या बैलाला असाच वाऱ्यावर न सोडता त्याची जबाबदारी घेऊन भूतदया आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
ही बातमी सर्वदूर पोहचवा जेणेकरून मूळ मालकापर्यंत हि बातमी पोहोचेल आणि आणि या बैलाची त्याच्या मालकाशी भेट होईल. जो कोणी मालक असेल त्यांनी ९४२१२६९४४४ या नंबरवर संपर्क साधावा. इथे येऊन ओळख पटल्यानंतरच हा बैल सुपूर्त करण्यात येईल. त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च करण्यात येईल असे मंगेश तळवणेकर म्हणाले आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad