Mumbai-Goa Highway News | मुंबई-गोवा महामार्ग रखडल्यामुळे आणि महामार्गावर होणाऱ्या दुय्यम कामामुळे येथे होणाऱ्या अपघातांस सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे माणगाव येथील लोणेरे येथील भीषण अपघातात बळी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी मुंबई गोवा जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
दिनांक १९/०१/२०२३ रोजी पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रक समोरासमोर आढळून भीषण अपघात झाला होता. या अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. जर महामार्ग वेळेत पूर्ण झाला असता तर हा अपघात टळला असता. या अपघातास पूर्णपणे सरकार जबाबदार आहे त्यामुळे सरकारतर्फे त्वरित नुकसान भापाई जाहीर करण्यात यावी अशी समितीची मागणी आहे.
कोकणातील जनतेसोबत दुजाभाव का?
चार दिवसापूर्वी तिरूपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील चौघांचा मृत्यू आणि पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली होती . चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली होती .सदर घटना घडल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्वरित 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. ईतरांना मदत जाहिर होते तर कोकणाला का नाही? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.
कोकणाला आणि कोकणातील जनतेला नेहमीच दुय्यम स्थान देणार असाल तर आता कोकणकर शांत बसणार नाही .या अपघातात निधन झालेल्याना लवकरात लवकर मदत जाहिर करावी तसेच शिमग्यापूर्वी कामाला सुरुवात करून प्रवासासाठी प्रवासायोग्य महामार्ग करावा अन्यथा विविध संघटना,मंडळ आणि कोकणकर लवकरच मुंबईत आणि शिमग्यानंतर रस्त्यावर उतरून कोकणातील आजी माजी नेत्यांच्या नावे शिमगा करतील अशी चेतावणी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे देण्यात आली आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad