सिंधुदुर्ग: तळाशील मालवण येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे मालवण पोलिसांनी कार्यवाही करून व्हेल मासाउलटी सदृश 27 तुकडे जप्त केले आहेत. मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एच व्ही पेडणेकर व सुशांत पवार यांच्या पथकाने गुरुवारी रात्री ही कार्यवाही केली आहे. पंचनामा, जबाब नोंदनों तसेच वन विभागाच्या ताब्यात २७ तुकडे देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मालवण पोलिसांनी सांगितले. सापडलेले तुकडे व्हेल मासा उलटी आहे की नाहीत याचीही तपासणी होणार आहे.
व्हेल माश्याच्या उलटीला एवढे महत्व का?
व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.
उलटी कशी बनते
शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. स्पर्म व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलचे आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ होय. म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचन नाही. तसेच व्हेल कोळंबी खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनेही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटाबरोबर ती तरंगत किनार्याला लागते
उलटी कशी ओळखतात?
स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारख किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात. गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसेच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातील बाहेर टाकलेले घटकांचा गोळाही तयार होतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणीच करता येते.
बंदी का?
या उलटीची किंमत जास्त असल्याने लोक व्हेल माशाला पकडून त्याच्या पोटातून त्याची विष्ठा काढण्याचा प्रयत्न करतील अशी सरकारला भीती वाटते आणि त्यामुळे त्या माशाची जात नष्ट होण्याची भीती वाटते.
Vision Abroad