Konkan Railway News|कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर दरम्यान 741 किमी पूर्ण नेटवर्कवर धावणारी पहिली प्रवासीसेवा गाडी मत्स्यगंधा एक्सप्रेस येत्या मे महिन्यामध्ये २५ वर्षाची होणार आहे. ट्रेन क्रमांक १२६१९/६२० मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरु सेंट्रल-मुंबई एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेसला १ मे १९९८ रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान ए.बी. वाजपेयी आणि रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी ही गाडी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला समर्पित केली होती.
ही गाडी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते कर्नाटकातील मंगळूर स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस मुंबई ते मंगळूर दरम्यानचे १,१८६ किमी अंतर १६ तासांत पूर्ण करते. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशामधून जात असलेल्या ह्या गाडीला येथील मासेमारी उद्योगाशी निगडीत मत्स्यगंधा हे नाव दिले गेले आहे.
कुंदापुरा रेलू प्रयाणिकारा हितरक्षण समिती (कर्नाटक) या निमित्ताने या गाडीचा रौप्यमहोत्सव साजरा करणार आहे. त्यामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोकण रेल्वेचा प्रवास, सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना यावर चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्याची समितीची योजना आहे.
Facebook Comments Box