पुणे | १५/०३/२०२३ : राज्यात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने पूर्ण राज्यात ‘येलौ’ अलर्ट जाहीर केला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचं आणि फळांचे नुकसान होणार आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस. होसालीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात येत्या चार दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यासाठी IMD द्वारे अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता आहे.
कोकणात पावसाचा इशारा
आज १५ मार्च आणि उद्या १६ मार्चला कोकणच्या सर्व जिल्ह्याला ‘येलौ’ अलर्ट दिला गेला आहे. तर परवा दिनांक १७ रोजी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ाला ‘येलौ’ अलर्ट आहे.
हवामान खात्याचे इशारे Alert
रेड अलर्ट – कृतीची वेळ Red Alert
ऑरेंज अलर्ट – तयार रहा Orange Alert
यलो अलर्ट – सतर्क रहा Yellow Alert
ग्रीन अलर्ट – इशारा नाही
14 march: Alerts issued by IMD for coming 5 days in Maharashtra for Thunderstorms with lightning, Gusty winds associated with light to mod rains. At few places there is possibility hailstorm too.
Warnings below are from 15-18 Mar.
Today also TS warnings are issued for Maharashtra pic.twitter.com/fZluDxL7SJ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 14, 2023
Vision Abroad