जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चेनाब रेल्वे पूलची यशस्वी चाचणी; पुलाच्या उभारणीत कोकण रेल्वेचे महत्वपूर्ण योगदान

Indian Railway News :पॅरिसमधील आयफेल टॉवर (Eiffel Tower) पेक्षा 35 मीटर उंच असणारे चेनाब रेल्वे पूल पूर्ण झाले असून काल दिनांक 26 मार्च रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या उपस्थितीत उधमपुर – श्रीनगर – बारामुल्ला या रेल्वे मार्गावर एक चाचणी पण घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरली असून लवकरच हा पूलाचे लोकार्पण करण्याची आशा आहे. 

 जम्मू काश्मीरमधील चिनाब ब्रिज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च (single arch) रेल्वे ब्रिज ठरणार आहे. यामुळे भारताच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान लिहिलं जाणार आहे. ही भारतासाठी मोठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे. या पुलामुळे भारताचा इतर भाग श्रीनगरशी जोडला जाणार आहे.

1315 मीटर लांबीच्या चेनाब रेल्वे ब्रीजच्या बांधकामात सुमारे 30,350 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर आर्चच्या बांधकामात 10,620 MT स्टीलचा वापर झाला आहे आणि 14,504 MT स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला आहे. चेनाब ब्रिजमध्ये, 93 डेक सेगमेंट (deck segment), ज्याचे प्रत्येकी वजन सुमारे 85 टन आहे, एकाच वेळी दरीच्या दोन्ही टोकांवरून शक्तिशाली स्टील आर्चवर बसविले गेले आहेत.

कोकण रेल्वेच्या मदतीनं पुलाची उभारणी

उत्तर रेल्वे (NR) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) यांची चिनाब ब्रीजच्या डिझाइनला अंतिम रूप देण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यावेळी आलेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेची मदत झाली आहे. तसेच मेथड स्टेटमेंट आणि रेखाचित्रांसाठी मान्यता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या दोघांनी स्थानिक रोजगार निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व रस्ते बांधले. या रस्त्यांमुळे या भागातील दूरवरच्या गावांना जोडणी मिळाली आहे.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search