गोव्याप्रमाणे आता कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरसुद्धा ‘बीच शॅक्स’ दिसणार

रत्नागिरी –आता गोव्यातील समुद्र किनाऱ्याप्रमाणे कोकणातील  समुद्रकिनाऱ्यांवर ‘बीच शॅक्स’ अर्थात चौपाटी कुटी दिसणार आहेत. पर्यटन वाढविण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर ‘बीच शॅक्स’ उभारण्यासंदर्भातील धोरणास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या असलेल्या या कुट्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड येथील समुद्र किनाऱ्यांवर उभारल्या जातील.
सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या आठ किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधीकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल.
चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाचे पुढील नियम असतील 
  • या चौपाटी कुटीस सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा वेळेत सुरू ठेवता येईल. 
  • तसेच संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. 
  • प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरादेखील असेल.
  • एका चौपाटीवर कमाल १० कुट्या उभारता येतील.
  • यातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी ८० टक्के जागा राखीव असतील.
  • कालावधी – या कुट्यांचे तीन वर्षांकरिता वाटप करण्यात येईल.
  • आकार – त्यांचा आकार १५ फूट लांबी, १५ फूट रुंद आणि १२ फूट उंच असेल
  • बैठक –  गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी २० फूट लांब आणि १५ फूट रुंद छत टाकता येईल.
  • परवाना मूल्य – कुटी मिळणाऱ्या व्यक्तीला परवान्यासाठी १५ हजार रुपये अर्जाचे ना परतावा मूल्य असेल.
  • वार्षिक शुल्क – या कुटीसाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार रुपये वार्षिक शुल्क राहील.
  • अनामत रक्कम – याशिवाय ३० हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

3 thoughts on “गोव्याप्रमाणे आता कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरसुद्धा ‘बीच शॅक्स’ दिसणार

  1. Hemangi says:

    निसर्गाचं सौंदर्य बघवत च नाही का ? जिथे तिथे जाऊन पर्यटनाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडायच हेच करणार का आपण ? निसर्ग स्वतःचा विकास करायला समर्थ आहे .. त्याला माणसाची गरजच नाहीये

  2. राजेंद्र शिरसाट says:

    आता हे बीच शाँक्स चा लिलाव होईल. राजकीय गुंड ते खरेदी करतील. आणि परप्रांतीयांना चालवायला देतील.आणि कोकणचा गोवा होणार. स्थानिक लोकांनी विरोध करावा. आलेल्या पर्यटकांना कोकणी माणूस उत्तम सेवा देतो.परंतु यामुळे भैय्या/बि हारी घुसणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search