Old Memories MSRTC – सन २००० साली, रत्नागिरी आगारामार्फत सुरू झालेल्या ‘भक्ती दर्शन’ या विशेष बससेवेचे महत्त्व अनन्यसाधारण होते. आगारातीलच एका निम-आराम बसला खास रंगसंगतीत रंगवून तिच्या दोन्ही बाजूला ‘भक्ती दर्शन’ असे ब्रँडिंग करून ही बस पर्यटकांना मार्लेश्वर, कृष्णेश्वर मंदिर, संभाजी स्मारक समाधी, परशुराम मंदिर, चिपळूण, डेरवण येथील प्रति शिवसृष्टी आणि थिबा पॉईंट येथील अरबी समुद्रातील नयनरम्य सुर्यास्ताचे दर्शन घडवत असे.
सकाळी ८ ते संध्याकाळी साडे ६ पर्यंत, एवढी सर्व प्रेक्षणीय स्थळे अगदी माफक दरात दाखवल्यामुळे, वेळ न मिळणाऱ्या मुंबईकरांना आपल्या गावी आल्यावर या बसचा प्रवास म्हणजे फार मोठी पर्वणीच होती. संगीताचा आस्वाद घेत प्रवास घेत करणे, चालक/वाहकांचे सौजन्यपूर्ण वर्तन तसेच प्रवासात मिळणारी वृत्तपत्रे यावर प्रवासी बेहद खुश होता. कालांतराने महाराष्ट्रात अश्या अनेक दर्शन फेऱ्यांचे एसटीने नियोजन केले आणि या फेऱ्यांना प्रवाश्यांनी चांगला प्रतिसाद देखील दिला.
आज पर्यटनाच्या व्याख्या बदलल्या असून, अनेक नवनवीन ठिकाणांची भर यात पडत आहे, तसेच पर्यटकांची संख्या देखील प्रचंड वाढली असून, एसटीने पुन्हा एकदा पर्यटनाची संधी पाहता याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
बाहेर फिरायला आलेला व्यक्ती हा प्रवासी भूमिकेत नसून, तो पर्यटक भूमिकेत असल्याने यासाठी नेमकं आपल्याला काय काय करावे लागेल, नियोजन कसे करावे लागेल, यासाठी एसटीने एक स्वतंत्र विभाग तयार केला, तर एसटीच्या आर्थिक स्रोतात अधिकची भर पडून, प्रवाश्यांना देखील किफायतशीर पर्यटनाचा आनंद घेता येईल, यात तिळमात्र शंका वाटत नाही.
लेखक – रोहित धेंडे.
भक्ती दर्शन : एक अनोखी संकल्पना 🌸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सन २००० साली, रत्नागिरी आगारामार्फत सुरू झालेल्या 'भक्ती दर्शन' या विशेष बससेवेचे महत्त्व अनन्यसाधारण होते.आगारातीलच एका निम-आराम बसला खास रंगसंगतीत रंगवून तिच्या दोन्ही बाजूला 'भक्ती दर्शन' असे ब्रँडिंग करून
(१/६) pic.twitter.com/B9eTedWb5b— Rohit Dhende (@avaliyapravasi) May 8, 2023
Vision Abroad
Vision Abroad