सिंधुदुर्ग | रस्त्यांमुळे विकास होतो; गाव आणि शहर यातील अंतर कमी होऊन रोजगाराच्या संधी वाढतात हे खरे असले तरी मुंबई-गोवा महामार्गामुळे एका गावाच्या रोजगारावर पर्यायाने येथील गावकऱ्यांच्या उत्पन्नावर नकारात्मक परिणाम झाला आहे. . मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणामुळे या गावातील अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बिबवणे गाव आहे. मुंबई-गोवा महामार्ग दोन पदरी असताना या गावातील येथील शेतकरी खुश होता. त्याचे कारण असे की या गावात मोठ्या प्रमाणात कलिंगडे पिकवली जात होती आणि ती या महार्गावर दुतर्फा विकली जात होती. महामार्गाचा विस्तार सुरू होण्यापुर्वी हे गाव हायवेलगतचे कलिंगड विक्रीचे मोठे केंद्रच बनले होते. पुर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडे होती. तसेच गावकऱ्यांनी तात्पुरती दुकाने उभी केली होती. तात्पुरती बैठक व्यवस्था कलिंगड उत्पादकांनी हायवेलगत केली होती. प्रवाशांच्या गाड्या यायच्या, येथे विसावा घ्यायच्या आणि कलिंगड खाऊन, खरेदी करून पुन्हा प्रवासाला मार्गी लागायच्या. तेव्हा येथे दुकांनांची संख्याही अधिक होती. येथील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे रोजगार या कलिंगड विक्रीद्वारे मिळत असे.
मात्र आता चित्र पालटले आहे. गेल्या काही वर्षात हा महामार्ग चौपदरी झाला आणि तेव्हापासून या गावाचे उत्पन्नही घटू लागले. कारण आता या महामार्गावरून गाड्या सुसाट जातात. आता येथे गाड्या क्वचितच थांबतात. त्यामुळे कमी प्रतिसादामुळे अनेक दुकाने बंद करण्याची नामुष्की येथील शेतकऱ्यांवर आली आहे. आता काही मोजकीच दुकाने येथे राहिली आहेत. या शेतकऱ्यांचे उत्पन्न पण कमालीचे घसरले आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad