आधारकार्ड – पॅनकार्ड लिंक करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक | स्मार्टफोनवर करू शकता लिंक; जाणून घ्या प्रोसेस…

नवी दिल्ली :सरकारने PAN आणि Aadhaar Card लिंक करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही जर आतापर्यंत ही दोन्ही कागदपत्रं लिंक केली नसल्यास ३० जून २०२३ ही शेवटची तारीख आहे. ३० जून २०२३ पर्यंत आधार – पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड काम करणार नाही. असे पॅन कार्ड पुनः कार्यरत करण्यासाठी पुढील एक महिन्यासाठी अवधी भेटू शकतो मात्र मोठ्या रकमेचा दंड बसू शकतो. त्यामुळे आजच आपले आधार – पॅन लिंक करून निश्चित व्हा. 

आधार – पॅन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस खूपच सोपी असून, तुम्ही घरबसल्या मिनिटात हे करू शकता. यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही www.incometax.gov.in ला देखील ओपन करू शकता. वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला क्विक लिंकमध्ये Link Aadhaar या पर्यायावर जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला वेबपेजच्या उजव्या बाजूला दिसेल. यावर टॅप केल्यानंतर पॅन नंबर, आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.

आता तुम्हाला लिंक आधार हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल. जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल. तसेच, तुम्ही आधीच आधार कार्ड व पॅन लिंक करण्याची रिक्वेस्ट केली असल्यास उजव्या बाजूला दिलेल्या Link Aadhaar Status वर क्लिक करून माहिती पाहू शकता. यानंतर आधार व पॅन नंबर देवून View Link Aadhaar Status वर क्लिक करा. या प्रोसेसनंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. दरम्यान, PAN आणि Aadhaar Card लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.  

 

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search