रायगड : हवामान खात्याने IMD दिलेल्या अतिदक्षतेच्या इशाऱ्यामुळे तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.त्यामुळे, धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडले जात असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील 24 तासांतही शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
IMD ने आज दिनांक 19 जुलै रोजी पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ‘रेड’ अलर्ट तर ठाणे, मुंबई, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.
Vision Abroad