चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील रखडल्या प्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी कोंडमळा येथे महामार्ग रोखत शुकवारी आंदोलन केले होते. याप्रकरणी बेकायदा जमाव केला व महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्यासह २७ कार्यकर्त्यांवर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावरील कोंडमळा येथे भुयारी मार्ग बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. शिवाय शेतकरी, जनावरे, विद्यार्थी, तसेच बाजारपेठ व रेशन दुकानावर ये-जा करताना महामार्गाचा अडथळा निर्माण होत आहे. येथे वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत; तसेच सावर्डे, असुर्डे, वहाळफाटा आदी ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या प्रश्नी राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa National Highway) विभागाकडे, तसेच ठेकेदार कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र पाठपुरावा करूनही दाद घेतली गेली नाही. त्यामुळे याबाबात शिवसेना (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कोंडमळा येथे महामार्ग रोखत ठेकेदार कंपनीविरोधात जोरदार घोषणा केली.
याप्रकरणी बेकायदेशीर जमाव करून महामार्ग अडवून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तालुकाप्रमुख सावंत यांच्यासह अन्य २७ कार्यकर्त्यांवर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद विनोद सहदेव आंबेरकर यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. संदीप शिवराम सावंत (वय ५१), प्रीतम नंदकुमार वंजारी (३२), सागर सुशील सावंत (५६), साहिल संजय शिर्के (२३), संदीप सीताराम राणे (४२), शैलेश पांडुरंग कांबळी (३८), प्रशांत संजय सावंत (२९) या सात जणांसह अन्य २० कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad