रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीमधील कशेडी घाटात आज सकाळी ११:५० वाजता टँकर आणि एसटी बस मध्ये अपघात झाला. या अपघातात ८ प्रवासी जखमी झाले असून त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर कशेडी घाटात ठाणे ते चिपळूण जाणारी एसटी बसक्र. MH-14-BT-2635 वरील चालक योगेश दादाजी देवरे वय ३५ वर्षे हे कशेडी घाट उतरत असताना समोरुन वाकवली तालुका दापोली ते मुंबई जाणारा टँकर क्रमांक UP-70-HT-7551 वरील चालक दिनानाथ हिरालाल यादव वय ५५ वर्षे राहणार घाटकोपर, मुंबई यांना डोळआ लागल्याने गाडी चुकीच्या साईडला जाऊन समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकली. या अपघातामध्ये सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर आणि पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत अपघात ग्रस्तांना मदत केली.
अपघातामधील एसटी बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. त्यापैकी ८ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या जखमींपैकी अनंत दत्तात्रेय विंचू यांना जास्त प्रमाणात दुखापत झाल्याने खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालय इथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी इथे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
Facebook Comments Box
Vision Abroad