आंबोली |काल आंबोली येथील ‘बाहुबली’ या धबधब्याचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मंत्री दीपक केसरकर आणि इतर पाहुणे मंडळी येण्याच्या अगोदरच पारपोली येथील ग्रामस्थांनी या धबधब्याचे उदघाटन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पारपोली गावचे सरपंच कृष्णा नाईक,इतर सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत पारपोली गावचे सरपंच कृष्णा नाईक यांच्याशी संवाद साधला आता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. हा धबधबा आंबोली गावच्या हद्दीत न येत पारपोली या गावच्या हद्दीत येत असून सुद्धा उदघाटनपत्रिकेवर पारपोली गावचे किंवा या गावच्या सरपंचाचे नाव कुठेही नमूद केले नाही आहे किंवा उदघाटनाचे आमंत्रण दिले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पारपोली ग्रामपंचायतीने उदघाटनाला शुभेच्छा देणारा बॅनर आंबोलीकरांनी फाडून टाकण्याचा निंदनीय प्रकार पण घडला आहे. जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी या विषयात आंबोली ग्रामपंचायच्या बाजूने असून हा पारपोली ग्रामस्थांवर अन्याय करताना दिसत आहेत. मतांच्या राजकारणामुळे परपोली गावावर अन्याय होत आहे हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही आहे. धबधबा आमच्या गावाच्या हद्दीत येत असून त्याची संगोपनाची जबाबदारी आणि इतर हक्क आमच्या गावचे असायला पाहिजेत. अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
Facebook Comments Box
Vision Abroad