रत्नागिरी : कोकणातील अनेक लोककला आज लोकप्रिय आहेत. त्यातील नमन आणि जाखडी या लोककलांना राज्य शासनाने मान्यता द्यावी अशा आशयाची मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा नमन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि हरिश्चंद्र बंडबे, श्रीकांत बोंबबों ले यांनी केली होती. या मागणीची तात्काळ दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत उदय सामंत यांच्या विनंतीनुसार ती मागणी तात्काळ मान्य केली.
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील नमन, जाखडी या लोककला आजही येथील मंडळींनी ळीं जीवापाड जपल्या आहेत. पण नमन लोककलेची साधी नोंदही शासकीय दरबारी केली नाही. सध्या नमन कलाकारांची ‘रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा’ अशी वाईट स्थिती आहे. त्यामुळे या लोककलेला राजाश्रयाची खऱ्या अर्थाने गरज आहे.
नमन अनेक नाट्यसंमेलनांच्या माध्यमातून जगभर पोहचले. पण कोकणातील नमन, जाखडी सादर करणारी हजारो मंडळे मात्र दुर्लक्षित होत आहेत आणि ही हजारो मंडळे राजाश्रयाच्या प्रतिक्षेत आहेत. या कलेची शासन दरबारी आजही नोंदनों व्हावी अशी मागणी आहे. कोकणात नमन तथा खेळे, शक्तीतुरा म्हणजे जाखाडी नृत्य या कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील नमन या लोककलेची प्रसिद्धी जगभर पसरली आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad