मुंबई :विद्यमान सरकारने आजच घरगुती गॅस सिलिंडर दरात २०० रुपयाने मोठी कपात करण्याचा सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. या निर्णयाविषयी जाणते कडून तसेच विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. ३१ मार्च २०१४ ला सिलिंडर ४१० रुपये होती. निवडणुकीच्या तोंडावर जनतेला खुश करण्यासाठी या निर्णय घेण्यात आला आहे. खरेतर ही दरकपात यापूर्वीच करायला हवी होती. रशिया युक्रेन युद्धामुळे रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल दिले. त्याचा फायदा ग्राहकाला मिळाला नाही. फेब्रुवारी २०२१ पासून सिलिंडर दारात १३ वेळा वाढ करण्यात आली. एकूण वाढ ३७९.५० झाली; त्यामुळे दरकपात होऊनही सिलिंडर १७९.५० रुपयाने महागच आहे.
याला म्हणतात जुमला!
गॅस सिलेंडर स्वस्त. आनंद झाला असेल. थांबा ✋सरकारनं फेब्रुवारी २०२१ पासून सिलेंडरची १३ वेळा किंमत वाढवून ३७९.५० रुपयांनी महाग केला. दर कमी झाला २०० रुपयांनी. तरीही १७९.५० रुपयांनी महागच! याला म्हणतात जुमला! #Cylinder pic.twitter.com/e96ZcE8icw
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 29, 2023
Facebook Comments Box
Related posts:
पुढील चार दिवसांत राज्यात मान्सून 'कोसळणार'.... 'या' जिह्यांना हवामान खात्याचा दक्षतेचा इशारा
महाराष्ट्र
संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्या...
कोकण
सावधान! राज्यात शांतता कालावधी सुरू; राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी... नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर क...
महाराष्ट्र
Vision Abroad