रत्नागिरी: हंगामात खाजगी बस वाहतूकदारनकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या RTO राज्य परिवहन प्राधिकरणने पाउले उचलली आहेत. मुंबई-पुण्यासाठीच्या खाजगी बसेसचे दरपत्रक ठरवून देण्यात आले असुन बस वाहतूकदारांना या दरांच्या ५०% जास्त भाडे आकारण्यास परवानगी दिली आहे. या दरांपेक्षा जर कोणी बस व्यावसायिक अतिरिक्त दर आकारत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमी अंतराला अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार हमखास घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने मुंबई,ठाणे आणि पुण्यासाठीच्या बसेसच्या भाड्याचे दरपत्रक ठरवून जाहीर केले आहे. या दरापेक्षा अधिक दर एखादा वाहतूकदार आकारत असल्यास त्याच्या विरोधात तक्रार 02352 – 225444 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर नोंदविण्यात यावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. तक्रार नोंदविताना वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/rto.pdf”]
Facebook Comments Box