Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर उद्या गुरुवार दिनांक ०७ सप्टेंबर रोजी चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी सकाळी ७:३० ते १०:३० असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या ३ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 01139 Nagpur – Madgaon Jn. Special
दिनांक ०६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान १०० मिनिटे उशिराने धावणार आहे.
२) Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Janshatabdi Express
दिनांक ०७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान सुमारे ४० मिनिटे उशिराने धावणार आहे.
३)Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express
दिनांक ०६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान सुमारे ४० मिनिटे उशिराने धावणार आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad