मुंबई : एसटीची मुंबई ते बांदा अशी नवीन शयनयान बस सेवा आजपासून म्हणजे दिनांक 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होत आहे. ही गाडी संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मुंबई सेंट्रल या स्थानकावरून सुटणार आहे. दुसर्या दिवशी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी ती बांदा या ठिकाणी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ती बांदा शहरातून संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून ती मुंबई सेंट्रलला ९ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल
ही गाडी मुंबई गोवा महामार्गावरून न चालविता पुणे सातारा मार्गे चालविण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणातील फक्त सिंधुदुर्ग जिल्हय़ातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
मुंबई ते बांदा या मार्गावरील प्रवासासाठी 1246 रुपये तिकीट दर असणार आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला प्रवाशांसाठी असलेल्या तिकीट सवलती या विना वातानुकूलीत शयनयान बसला देखील लागू होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई सेंट्रल – बोरीवली – बांदा या मार्गावर ही शयनयान बसस धावणार आहे. त्यानंतर गोव्यातील पणजीपर्यंत या बसेचा विस्तार करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन पन्नास विना वातानुकूलित शयनयान बसेस ( sleeper coach ) येणार आहेत.
या गाडीचे थांबे
Facebook Comments Box
Vision Abroad