रत्नागिरी : एप्रिल महिन्यात गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांना वीस लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ही मदत शासनाकडून देण्यात आले आहे.
चिपळूण तालुक्यातील तळसरगावातील तुकाराम बडदे यांच्यावर २३ एप्रिल २०२३ रोजी गवा रेड्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्यात ते गंभीर प्रमाणात जखमी झाले होते. त्यांच्यावर अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे सात ते आठ दिवस उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. मृत व्यक्तीच्या वारसांना शासनाच्यावतीने दिली जाणारी मदत तातडीने मिळावी यासाठी आमदार शेखर निकम व वन विभागाचे अधिकारी यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर २० लाख रुपयांची मदत शासनाकडून प्राप्त झाली. प्राप्त झालेली मदत मृताच्या वारसांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी वन विभागीय अधिकारी दिपक खाडे, वनपाल चिपळूण राजेश्री किर, सहाय्यक वनरक्षक वैभव बोराटे, वनपाल चिपळूण दौलत भोसले, वनक्षेत्रपाल रामपूर राजाराम शिंदे, वनरक्षक कोळकेवाडी राहुल गुंठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, प्रदेश सचिव जयंत खताते, तालुकाध्यक्ष अबु ठसाळे, मिडीयाध्यक्ष सचिन साडविलकर उपस्थित होते.
Facebook Comments Box