बांधकामाच्या दर्जाविषयी प्रशचिन्ह उपस्थित
चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असेलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील उड्डाणपुलाचा गर्डर तुटण्याचा प्रकार घडला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेला नाही. मात्र, महाकाय लाँचरचे काही भाग तुटल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.या दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ देखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान बांधकाम सुरू असताना अचानक मोठा आवाज होऊन पुलाचा काही भाग तुटल्याचा प्रकार घडला आहे. यादरम्यान पुलाच्या खाली नागरिकांची एकच पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ही घटाना घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे.
पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली. घटनेनंतर स्थानीक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला; दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ व्हायरल#kokanaiLiveNews #KonkanNews #mumbaigoahighway pic.twitter.com/HsVdV3jnty
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) October 16, 2023
Facebook Comments Box
Vision Abroad